तिलक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


तिलक हा केवळ संप्रदायाची ओळख, धार्मिकतेची छाप किंवा कपाळाची शोभा नाही तर खऱ्या अर्थाने पाहता ते बुद्धिपूजेचे प्रतीक आहे. मानवाला ईश्वरापर्यंत पोहचविणारे श्रेष्ठ साधन बुद्धी आहे. म्हणून ईश-पूजनानंतर तत्काळ बुद्धीचे निवासस्थान अशा मस्तकाचे पूजन करायचे. प्रथम साध्याचे म्हणजे ईश्वराचे पूजन आणि त्यानंतर साधनाचे म्हणजे बुद्धीचे पूजन. कठोपनिषदात बुद्धीला आपल्या जीवन रथाच्या सारथ्याची उपमा देण्यात आली आहे. बुद्धिरूपी सारथी जर तेजस्वी, समर्थ आणि दक्ष असेल तरच ह्या जीवनरथाला ध्येयापर्यंत पोचवील.

बहीण भावाच्या मस्तकावर तिलक लावते त्याचे आणखीनच आगळे महत्त्व आहे. बहिणीच्या हाताने भावाच्या कपाळावर लावलेला तिलक भावाला त्रिलोचन बनवतो. तिसऱ्या डोळ्यात कामदहनाची शक्ती असते. जगातील स्त्रीजातीकडे वासनेच्या दृष्टीने न पाहता भावदृष्टीनेच पहा असे बहीण भावाला तिलक रूपाने समजावीत असते.

तिलक हे आस्तिकतेचेही प्रतीक आहे. भक्त भगवंताच्या नावाने तिलक लावतो. खरा भक्त कधी निराश होत नाही. निराशा ही नास्तिकता आहे, प्रभूवरचा अविश्वास आहे. कपाळावरचा सौभाग्य-तिलक पुसला गेल्यानंतर स्त्रीला जसे दुसरे अलंकार शोभा देत नाहीत, तसेच ज्याच्या जीवनातून प्रभुप्रेमाचा तिलक पुसला गेला आहे त्याच्या जीवनात वैभव, सत्ता, कीर्ती वगैरे अलंकार निस्तेज, फिक्के आणि हास्यापद वाटतात.

हेदेखील पहा[संपादन]

वैदिक प्रतीक-दर्शन