तवांग बौद्ध मठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तवांग मठ

तवांग बौद्ध मठ (Tawang monastery) हा भारतातल्या अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्याच्या तवांग शहरामध्ये असलेला एक मठ आहे. हा भारतातील सर्वात मोठा बौद्ध मठ असून पोटाला पॅलेस (ल्हासा, तिबेट) या बौद्ध मठानंतरचा हा जगातील सर्वात मोठा मठ आहे. हा मठ हा तवांग नदीच्या खोऱ्यात, तवांग कसब्याजवळ आहे.

तवांग मठातील प्रमुख बौद्ध विहार - दुखंगमधील बुद्ध मूर्ती

या मठाला बौद्ध भिक्खू आंतरराष्ट्रीय ठेवा मानतात. हा मठ इ.स. १६८० दशकाच्या सुमारास मराक लामा लोद्रे ग्यास्तो यांनी बनवला. या मठामध्ये ५७० पेक्षा अधिक बौद्ध भिक्खू राहतात. समुद्रसपाटीपासून १०,००० फूट उंचीवरील तवांग चू घाटामध्ये असलेल्या या मठात जगभरातील बौद्ध भिक्खू आणि पर्यटक येतात. डोंगरावर बनवला असल्याने मठातून पूर्ण तवांग घाटाची सुंदर दृश्ये दिसतात.

तवांग बौद्ध मठ हा दुरून एखाद्या किल्ल्यासारखा दिसतो. त्याच्या प्रवेशद्वाराचे नाव 'काकालिंग' आहे. हे दार डोंगरासारखे दिसते, त्याच्या दोन दगडी भिंतींवर सुंदर चित्रे काढली आहेत. ही चित्रे पाहून पर्यटक खूश होतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत