तब्रिझ
तब्रिझ ( फारसी: تبریز </link> , </link></link> ) हे वायव्य इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांतातील एक शहर आहे. तब्रिझ प्रांत, काउंटी आणि जिल्ह्याची राजधानी आहे. [१]
ताब्रिझ हे इराणच्या ऐतिहासिक अझरबैजान प्रदेशातील कुरु नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे सहंद आणि आयनाली पर्वतांमधील ज्वालामुखीच्या शंक्वाकृती उंच शिखरांच्या मध्ये असलेले तब्रिझ समुद्रसपाटीपासून १,३५०-१,६०० मी उंचीवर आहे.
तब्रिझची लोकसंख्या १७ लाख आसून हे[२] हे वायव्य इराणमधील सर्वात मोठे आर्थिक केंद्र आणि महानगर आहे. येथील लोकसंख्या द्विभाषिक आहे आणि बहुतेक लोक अझेरी ही त्यांची मूळ भाषा आणि फारसी बोलतात.. [३] येथे मोटारगाड्या, मशीन टूल्स, रिफायनरी, खनिज तेल, कापड आणि सिमेंट उत्पादन उद्योग आहेत. [४] हे शहर हाताने विणलेले गालिचे आणि दागिन्यांवरील कलाकुसरीसाठी प्रसिद्ध आहे. स्थानिक मिठाई, चॉकलेट, सुका मेवा आणि पारंपारिक तबरीझी खाद्यपदार्थ इराणमध्ये सर्वोत्कृष्ट गणले जातात.
धर्म
[संपादन]१५०१ मध्ये तब्रिझ येथे राज्याभिषेक झाल्यानंतर, शाह इस्माईल ने शिया इस्लामची इस्रा अशरी शाखा सफवी साम्राज्याचा अधिकृत धर्म म्हणून घोषित केली. याचा परिणाम म्हणून, तबरीझमधील बहुसंख्य सुन्नी लोकसंख्या जबरदस्तीने शिया धर्मात रुपांतरित झाली. [५] [६] सध्या, बहुसंख्य लोक शिया इस्लामचे अनुयायी आहेत.
शहरात ख्रिश्चन धर्माचे अनुसरण करणारे आर्मेनियन अपोस्टोलिक लोक काही प्रमाणात आहेत. येथे एक लहान ज्यू समुदाय होता, परंतु त्यांपैकी बहुतेक लोक तेहरानमध्ये गेले आहेत. [७] शहरात बहाई धर्माचा एक लहान, समुदाय देखील आहे. यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. [८]
जुळी शहरे
[संपादन]तबरीझ हे जुळे आहेत: [९]
संदर्भ
[संपादन]- ^ Habibi, Hassan (7 July 1369). "Approval of the organization and chain of citizenship of the elements and units of the country divisions of East Azerbaijan province centered on the city of Tabriz". Islamic Parliament Research Center (फारसी भाषेत). Ministry of Interior, Defense Political Commission of the Government Board. 4 August 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "[[:साचा:Nq]]". Statistical Center of Iran. 2017-03-14 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2017-03-16 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
- ^ "2011 Census – Natayej" (PDF). Iran: Statistical Centre. 2014-07-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2008-02-27 रोजी पाहिले.
- ^ "Results of national 2007 census". Statistical Center of Iran. 2013-07-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-02-11 रोजी पाहिले.
- ^ John A A Boyle (Editor), Persia: History and Heritage, Routledge, 2011, p:38
- ^ Melissa L. Rossi (2008), What Every American Should Know about the Middle East, Penguin, आयएसबीएन 978-0-452-28959-8,
Forced conversion in the Safavid Empire made Persia for the first time dominantly Shia and left a lasting mark: Persia, now Iran, has been dominantly Shia ever since, and for centuries the only country to have a ruling Shia majority.
- ^ "East Azerbaijan Geography". Iranian Ministry of Education. 2000. 2012-01-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ Phyllis G. Jestice (Edit.), Holy People of the World: A Cross-cultural Encyclopedia, 2004, p. 92.
- ^ "Tabriz and Shanghai agree to be sister cities". tabriz.ir. Tabriz. 2019-05-06. 2021-01-28 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-06-19 रोजी पाहिले.