इस्ना अशरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इस्ना अशरी (Twelver/ Ithnā‘ashariyyah) हा शिया इस्लाम या पंथातला सगळ्यात मोठा समुदाय आहे. जगभरातल्या शिया पंथियांपैकी ७५ टक्के मुसलमान याच समुदायाचा भाग आहेत. त्यांचे पहिले इमाम हजरत अली आहेत तर शेवटचे आणि बारावे इमाम महदी आहेत. इस्ना अशरी समुदायाचे समर्थक अल्ला, कुराण आणि हदीस यांचे पालन करतात. पण, त्यांच्या इमामांच्या माध्यमातून आलेल्या हदीसचं हा समुदाय पालन करतो. कुराणानंतर 'नहजुल बलागा' आणि 'अलकाफी' हे दोन धर्मग्रंथ या समुदायासाठी महत्त्वाचे आहेत. इस्ना अशरी समुदाय जाफरियावर विश्वास ठेवतात. इराण, इराक, भारतासह पाकिस्तान तसेच जगभरात या समुदायाचे अनुयायी आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]