तपकिरी फटाकडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राखी फटाकडी

तपकिरी फटाकडी किंवा राखी फटाकडी (इंग्रजी: Brown crake, हिंदी: भुरी कुकडी) दक्षिण आशियातील एक पक्षी आहे.

ओळखण[संपादन]

हा पक्षी आकाराने गावा तीत्तीरापेक्षा लहान असतो. त्याची चोच हिरवट असते, वरील भागाचा रंग तपकिरी, पांढरखा गळा, छाती, डोक्याची बाजू आणि मान उदी. पोटाखालून शेपटीपर्यंतचा रंग तपकिरी. डोके तांबडे, पायाचा रंग तपकिरी, जांभळा किंवा तांबडा.

वितरण[संपादन]

तपकिरी फटाकडी भारतात काश्मीर - जम्मूपासून संबार सरोवर, आसाम व आजूबाजूचा प्रांत, मणिपूर बांगला देश, गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यांत आढळतो. प्रामुख्याने मे ते ऑगस्ट आणि मार्च ते ऑक्टोबर (पुणे) या काळात वीण असतात.

निवासस्थाने[संपादन]

हा पक्षी दलदली प्रदेशात आढळतो.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली