Jump to content

डोटेली भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डोटेली
डोटेली
स्थानिक वापर नेपाळ
प्रदेश डोटी, सुदूरपश्चिम प्रदेश आणि कर्णाली प्रदेश
लोकसंख्या नेपाळमध्ये ७,९०,००० (२०११ ची जनगणना)
बोलीभाषा बैताडेली,बाजहांगी नेपाळी, दार्चुली आणि डोटेली
भाषाकुळ
लिपी देवनागरी
अधिकृत दर्जा
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-३ dty
नेपाळ मधील अछाम जिल्हयातील एक बाई मटण आणि मासा शिजविण्याबद्दल अछामी बोलीभाषेत बोलतांना

डोटेली किंवा डोतयाली ही सुमारे ८,००,००० भाषिकांनी वापरलेली एक हिंद -आर्य भाषा आहे. या भाषेचे बहुतेक भाषिक नेपाळमध्ये राहतात. ती परंपरेने नेपाळी भाषेची पश्चिम बोली मनाली जाते, आणि देवनागरीलिपीत लिहिली जाते. नेपाळमध्ये नेपाळच्या राज्यघटनेत (२०१५) भाग १ च्या कलम ६ नुसारया भाषेला अधिकृत दर्जा आहे. [१]बैताडेली,बाजहांगी नेपाळी, दार्चुली आणि डोटेली अशा डोतेलीच्या चार मुख्य बोली आहेत. [२] या बोलीभाषांमधील परस्पर सुलभता उच्च आहे आणि डोटेलीच्या सर्व बोली भाषा-आधारित सामग्री सामायिक करण्यास सक्षम आहेत.

जिल्ह्यानुसार भाषेच्या नावासाठी वापरल्या जाणाऱ्या अटी [२]
जिल्हा भाषेच्या नावासाठी वापरल्या जाणाऱ्या अटी
कैलाली बैताडेली, बाजहांगी, नेपाळी
कांचनपूर बैताडेली नेपाळी, नेपाळी
डोटी डोतयाली, डोटेली
डडेलधुरा डोतयाली , डडेलधुरी
बैताडी बैताडी, बैताडेली, डोतयाली
दार्चुला दार्चुलेली, डोतयाली
बाजहांग बाजहांगीनेपाळी, नेपाळी

आरंभ आणि इतिहास[संपादन]

राहुल सांकृत्यायनच्या मते डोटेली ही कुमाऊनी भाषेची एक बोली आहे. ही बोली कुमाऊं प्रांताच्या कत्यूरी राजवंशाच्या काही लोकांनी डोटी मध्ये १७९० पर्यंत राज्य करतांना येथे आणली. कत्यूरी साम्राज्याचे आठ वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागीकरण झाल्यावर डोटी राजवंशाची स्थापना झाली. [३] तथापि, नेपाळमध्ये ती एक नेपाळी बोली म्हणून मानली जाते; स्थानिक अभ्यासकांने आणि डोटीच्या लोकांने आपली भाषा नेपाळच्या राष्ट्रीय भाषांपैकी एक म्हणून ओळखली जावी अशी मागणी घातली आहे . त्यांच्या या मागणीची दिवसेंदिवस चळवळ वाढत आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Constitution Bill of Nepal 2072" (PDF). Archived from the original (PDF) on 2018-01-27. 2020-07-02 रोजी पाहिले.
  2. ^ a b A Sociolinguistic Study of Dotyali. LinSuN Central Department of linguistics, Tribhuvan University, Nepal and SIL International, 2014
  3. ^ "T.R. Vaidya - ADVANCED HISTORY OF NEPAL". web.archive.org. 2005-02-09. Archived from the original on 2005-02-09. 2020-01-08 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]