डेक्कन स्टेट्स एजन्सी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डेक्कन स्टेट्स रीजनल काउन्सिल या पानावरून पुनर्निर्देशित)

डेक्कन स्टेट्स रीजनल काउन्सिल अथवा डेक्कन स्टेट्स एजन्सी (इंग्लिश: Deccan States Agency ;) हे ब्रिटिश भारतातील एक प्रशासकीय एकक होते. इ.स. १९३० च्या दशकात स्थापलेल्या या एजन्सीत पश्चिम भारतातील, प्रामुख्याने विद्यमान महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील राज्ये व संस्थाने समाविष्ट होती. डेक्कन स्टेट्स एजन्सी कोल्हापूर संस्थानाच्या रेसिडेन्सीसोबत प्रशासकीय दृष्ट्या जोडली असल्यामुळे, हिला डेक्कन स्टेट्स एजन्सी व कोल्हापूर रेसिडेन्सी या नावानेही उल्लेखले जाई. या एजन्सीची स्थापना होण्याअगोदर सदर संस्थाने बॉंबे प्रेसिडेन्सी या ब्रिटिश प्रांताच्या आधिपत्याखाली येत. इ.स. १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर रत्नाप्पा कुंभारांच्या अध्यक्षतेत ही संस्थाने भारतात सामील झाली व मुंबई प्रांतास जोडली गेली.

आधिपत्याखालील संस्थाने[संपादन]