सावंतवाडी संस्थान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सावंतवाडी संस्थान
[[मराठा साम्राज्य|]] Flag of the Maratha Empire.svg इ.स. १६२७इ.स. १९४७ Flag of India.svg
Flag of the Maratha Empire.svgध्वज Sawantwadi State CoA.pngचिन्ह
Bombay Prov south 1909.jpg
राजधानी सावंतवाडी
सर्वात मोठे शहर सावंतवाडी
शासनप्रकार राजतंत्र
राष्ट्रप्रमुख पहिला राजा : खेमराजे सावंत
अंतिम राजा: शिवराम सावंत भोसले (इ.स. १९३७-४७)
अधिकृत भाषा मराठी भाषा
लोकसंख्या 250,589 (इ.स.१९३१)
–घनता 104.6 प्रती चौरस किमी


सावंतवाडी संस्थान हे ब्रिटिश काळात मुंबई इलाख्यातील बेळगाव एजन्सीमधील एक संस्थान होते. या संस्थानाचे संस्थानिक खेम सावंत भोसले हे होते. आताचे सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ आणि उत्तर गोव्यातील काही गावे मिळून हे संस्थान बनले होते.[१]

चतुःसीमा[संपादन]

सावंतवाडी संस्थानच्या प्रदेशाला लागून उत्तरेला व पश्चिमेला तत्कालीन रत्‍नागिरी जिल्हा म्हणजेच सध्याचा मालवण व कणकवली तालुक्यांचा काही भाग, दक्षिणेला गोवा, पूर्वेला कोल्हापूर संस्थान व बेळगाव जिल्हा होता.

स्वातंत्र्योत्तर काळ[संपादन]

भारत स्वतंत्र झाल्यावर हे संस्थान भारतात विलीन झाले. सावंतवाडी हा सध्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक तालुका आहे.

सावंतवाडी संस्थान हे लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध होते.

  1. ^ http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/146850/6/06_chapter%203.pdf