रामदुर्ग संस्थान
Appearance
रामदुर्ग संस्थान ರಾಮದುರ್ಗ ಸಂಸ್ಥಾನ | ||||
|
||||
|
||||
राजधानी | रामदुर्ग | |||
शासनप्रकार | राजतंत्र | |||
राष्ट्रप्रमुख | पहिला राजा: योगीराव प्रथम भावे(इ.स. १७४२-१७७७) अंतिम राजा: रामराव तृतीय व्यंकट राव साहेब भावे (इ.स. १९०७-१९४८) |
|||
अधिकृत भाषा | मराठी, कन्नड | |||
लोकसंख्या | ३७८४८ | |||
–घनता | ८६.४ प्रती चौरस किमी |
रामदुर्ग संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्याच्या अंतर्गत डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते. या संस्थानाची राजधानी रामदुर्ग मध्ये होती.
क्षेत्रफळ
[संपादन]रामदुर्ग संस्थानाचे क्षेत्रफळ ४३८ चौरस किमी होते.
इतिहास
[संपादन]रामदुर्ग संस्थान हे इ.स. १७४२ या वर्षी नरगुंड संस्थानापासून वेगळे झाले. हैदर अली आणि टिपू सुलतानाच्या काळात (१७८५-१७९९) हे संस्थान म्हैसूर राज्याचा भाग होता. इ.स. १८२७-१८२९ या काळात रामदुर्ग संस्थान हे ब्रिटिश भारताचा भाग बनले. भारत स्वतंत्र झाल्यावर ८ मार्च, इ.स. १९४८ या दिवशी रामदुर्गच्या संस्थानिकांनी हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले. सध्या हे संस्थान कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.
संस्थानिक
[संपादन]रामदुर्ग संस्थानाचे संस्थानिक भावे घराणे होते. ते हिंदू कोकणस्थ ब्राह्मण आहेत. ते 'राजा' हे शीर्षक वापरत असत.
शासनकाळ (इ.स.) | शासक |
---|---|
१७४२-१७७७ | राजा योगीराव भावे (प्रथम) |
१७७७-१७८५ | राजा रामराव भावे (प्रथम) |
१७८५-१७९९ | म्हैसूर राज्याच्या अंतर्गत |
१८००-१८१० | श्री.बापूराव रानडे - राजप्रतिनिधी |
१८१०-१८२७ | राजा नारायणराव रामराव तथा आप्पासाहेब भावे (प्रथम) |
१८२७-१८२९ | ब्रिटिश प्रशासनाच्या अंतर्गत |
१८२९-१८५७ | राणी राधाबाई भावे |
१८५७-१८७२ | राजा रामराव नारायणराव भावे (द्वितीय) |
१८७२-१८७८ | राजा योगीराव तथा बापूसाहेब भावे (द्वितीय) |
१८७८-१९०७ | राजा व्यंकटराव योगीराव भावे |
१९०७-१९४८ | राजा रामराव व्यंकटराव तथा रावसाहेब भावे (तृतीय) |