Jump to content

मॅकडोनेल डग्लस डीसी-१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डी.सी.१० या पानावरून पुनर्निर्देशित)
मॅकडॉनल डग्लस डी.सी. १०

बिमान बांगलादेश एअरलाइन्सच्या ताफ्यातील डी.सी. १० विमान

प्रकार रूंद रचनेचे जेट विमान
उत्पादक देश अमेरिका
उत्पादक मॅकडॉनल डग्लस
पहिले उड्डाण २९ ऑगस्ट १९७०
समावेश ५ ऑगस्ट १९७१ (अमेरिकन एअरलाइन्ससोबत)
सद्यस्थिती मालवाहतूक सेवेत
मुख्य उपभोक्ता फेडेक्स एक्सप्रेस
उत्पादन काळ १९६८-१९८८
उत्पादित संख्या ३८६
उपप्रकार मॅकडॉनेल-डग्लस एमडी-११

मॅकडॉनल डग्लस डी.सी. १० (McDonnell Douglas DC-10) हे मॅकडॉनल डग्लस ह्या अमेरिकन कंपनीने बनवलेले रूंद रचनेचे, मध्यम ते लांब पल्ल्याचे व मध्यम क्षमतेचे प्रवासी विमान आहे. १९६८ ते १९८८ ह्या काळादरम्यान उत्पादित करण्यात आलेले हे विमान सुमारे ३८० प्रवाशांची वाहतूक करू शकते. जगातील बहुतेक सर्व प्रवासी विमान कंपन्यांनी प्रवासी वाहतूकीसाठी हे विमान वापरले होते. सध्या कार्यक्षम असलेली बहुतेक सर्व डी.सी.-१० विमाने केवल मालवाहतूकीसाठी वापरली जातात व फेडेक्स एक्सप्रेस ही कंपनी ह्यांमधील बव्हंशी विमाने वापरते.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: