Jump to content

झांझिबार

Coordinates: 6°08′S 39°19′E / 6.133°S 39.317°E / -6.133; 39.317
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(झांझीबार या पानावरून पुनर्निर्देशित)
झांझिबार
Zanzibar
टांझानियाचा स्वायत्त प्रदेश
ध्वज

झांझिबारचे टांझानिया देशाच्या नकाशातील स्थान
झांझिबारचे टांझानिया देशामधील स्थान
देश टांझानिया ध्वज टांझानिया
राजधानी झांझिबार शहर
क्षेत्रफळ २,६४३ चौ. किमी (१,०२० चौ. मैल)
लोकसंख्या १०,७०,०००

झांझिबार (उच्चार:zænzɨbɑr;फारसी:زنگبار - झंगीबार/जंगीबार, गंजलेला किनारा;अरबी:زنجبار - झंजिबार)हा पूर्व आफ्रिकेतील टांझानिया देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. हा प्रदेश हिंदी महासागरातील टांझानियाच्या किनाऱ्यापासून २५-५० किमी दूर झांझिबार द्वीपकल्पावर वसला आहे. उंगुजा (ज्याला रोजच्या वापरात झांझिबार संबोधले जाते) व पेंबा ही ह्या द्वीपकल्पातील प्रमुख बेटे आहेत. झांझिबारच्या दक्षिणेला कोमोरोसमायोत, आग्नेयेला मॉरिशसरेयूनियों व पूर्वेला सेशेल्स ही बेटे आहेत.

इतिहास

[संपादन]

येथील गुलाम, लवंग, दालचिनी, मिरे इत्यादी मसाल्याच्या पदार्थांच्या शेतीमुळे झंझिबारला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पोर्तुगीजअरब शोधक येथे शोध युगादरम्यान दाखल झाले. अठराव्या व एकोणिसाव्या शतकात झंझिबारवर ओस्मानी साम्राज्याची सत्ता होती. त्यानंतरच्या काळात ब्रिटिश साम्राज्याने झांझिबारवर कब्जा करून तेथे आपली विशेष वसाहत स्थापन केली. १९६३ साली झांझिबारला स्वातंत्र्य मिळाले व त्यादरम्यान झालेल्या हिंसक झांझिबार क्रांतीनंतर झांझिबारने टांझानियामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

6°08′S 39°19′E / 6.133°S 39.317°E / -6.133; 39.317