जिव्या सोमा म्हसे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जिव्या सोमा मशे 
वारली चित्रकार
Jivya Soma Mashe.jpg
माध्यमे अपभारण करा
Wikipedia-logo-v2.svg  विकिपीडिया
जन्म तारीखमे १९, इ.स. १९३४
नागरिकत्व
व्यवसाय
  • चित्रकार
पुरस्कार
  • प्रिन्स क्लॉज पुरस्कार
  • कलांमध्ये पद्मश्री
अधिकार नियंत्रण
no fallback page found for autotranslate (base=Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext, lang=mr)
Jivya Soma Mashe (es); জিব্যা সোমা মাশে (bn); Jivya Soma Mashe (fr); Jivya Soma Mashe (ast); Jivya Soma Mashe (ca); जिव्या सोमा मशे (mr); Jivya Soma Mashe (de); ଜିଭ୍ୟା ସୋମା ମାଶେ (or); Jivya Soma Mashe (sq); Jivya Soma Mashe (da); Jivya Soma Mashe (sl); Jivya Soma Mashe (sv); Jivya Soma Mashe (nn); ജിവ്യ സോമ മാഷെ (ml); Jivya Soma Mashe (nl); జివ్య సోమ మషే (te); Jivya Soma Mashe (en); Jivya Soma Mashe (nb); Jivya Soma Mashe (ga) artista indio (es); ভারতীয় শিল্পী (bn); artiste indien (fr); India kunstnik (et); pintor indiu (ast); artista indi (ca); वारली चित्रकार (mr); ଭାରତୀୟ କଳାକାର (or); Indian artist (en-gb); نقاش هندی (fa); artist indian (ro); אמן הודי (he); Indiaas kunstschilder (nl); Indian artist (en); భారతీయ కళాకారుడు (te); Indian artist (en-ca); artista indio (gl); فنان هندي (ar); artist indian (sq); ealaíontóir Indiach (ga)

जिव्या सोमा मशे(जन्म : १९ मे इ.स.१९३४; मृत्यू : १५ मे इ.स.२०१८) हे एक मराठी चित्रकार व कलाकार होते. त्यांनी वारली चित्रकलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविले. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले ते पहिले आदिवासी कलावंत आहेत.[१] वारली जमातीत प्रामुख्याने महिलांची कला म्हणून ओळखला जाणारा हा कलाप्रकार म्हसे यांनी वयाच्या तेराव्या वर्षी आत्मसात केला.[२]

जीवन[संपादन]

पालघर भागातील आदिवासींचे वास्तव्य असलेल्या डहाणू तालुक्यातील गंजाड या गावात त्यांचे वास्तव्य होते.

योगदान[संपादन]

कलात्मक वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी व कलाकारांना संधी मिळावी या उद्देशाने भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मोहीम सुरू केली. या मोहिमेत भास्कर कुलकर्णी यांची जिव्या सोमा म्हसे यांच्याशी ओळख झाली, आणि म्हसे यांच्या निमित्ताने वारली चित्रकला समाजासमोर आली.

पारंपरिक वारली चित्रांमध्ये म्हसे यांनी प्राणी, पक्षी, सूर्य, चंद्र, फूल, फळ अशा निसर्गचित्रांना स्थान मिळवून दिले, हे त्यांचे योगदान म्हणून सांगता येईल.[१]

पद्मश्री पुरस्कार[संपादन]

म्हसे यांनी काढलेले वारली चित्र

वारली चित्रकलेला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल भारत सरकारने त्यांना इ.स. २०१६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.[३] इ.स.१९७६ साली म्हसे यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अन्य सन्मान[संपादन]

भारतासह जर्मनी, रशिया, जपान, इटली, इंग्लंड, चीन, बेल्जियम या देशांमध्ये म्हसे यांनी आपली कला सादर केली आहे. बेल्जियमच्या राणीने त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. जपानमधील मिथिला म्युझियमचे संचालक होसेगवा यांच्या हस्तेही म्हसे यांचा गौरव करण्यात आला आहे.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. a b "महाराष्ट टाइम्स". आदिवासी कलेतील अस्सल हिरा. १६/५/२०१८. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "वारलीचे जनक पद्मश्री जिव्या म्हसे काळाच्या पडद्याआड | पुढारी". www.pudhari.news (इंग्रजी भाषेत). 2018-05-16 रोजी पाहिले.
  3. ^ पवार, श्वेता. "वारली चित्रकलेचा जादूगार जिव्या सोमा म्हसे यांचे निधन | Saamana (सामना)". www.saamana.com (इंग्रजी भाषेत). 2018-05-16 रोजी पाहिले.

४. https://www.loksatta.com/lekha-news/artist-jivya-soma-mashe-1682967/[१]

  1. ^ "आदिभारतीय परंपरेतला कलाधर्मी". Loksatta. 2018-05-20. 2018-05-20 रोजी पाहिले.