जिल्हा परिषद प्राथमीक शाळा, लमाण तांडा, बेळंब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लमाण तांडा, बेळंब हि उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील एक प्रयोगशील शाळा आहे.

बोली भाषेतून शिक्षण आणि प्रगती[संपादन]

शाळेत मुखत्वे कन्नड मिश्रीत लमाणी बोलीभाषीक विद्यार्थी येतात. २००८ नंतर शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मातृषाषेचा सराव करून विद्यार्थ्यांशी मराठी सोबतच त्यांच्या मातृभाषेतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला, शाळेत शिकविले गेलेले घटक, विद्यार्थी गट बनवून लमाणी भाषेतून एकमेकांना समजावून सांगतात. परिणामी शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढून २००८-०९ मध्य शाळेचा तालुक्यात गुणवत्तेत पहिला क्रमांक आला व २००९-१० मध्ये शाळेला जिल्हा आदर्श शाळा पुरस्कार मिळाला.

लोकांनी लोकवाटा जमवून सन २०१४-15 मध्ये शाळा ई-लर्निंग व डिजिटल केली आहे. गतवर्षी शाळा नवोपक्रम शील शाळा म्हणून निवड झाली होती. सध्या शाळा ई-लर्निंग झाल्यापासून लमाणी भाषेतच इंग्रजी व मराठी भाषेशी सलंग्न असे व्हिडीओ बनवले आहेत. यामुळे मुलांना शाळेत अजून रुची निर्माण झाली व विद्यार्थ्यांचे पालक उसतोडणीच्या काळात रोजंदारीसाठी स्थलांतर करणारे असून सुद्धा शाळेने १००% विद्यार्थी उपस्थिती निश्चीत करण्यात यश मिळवले आहे. [ दुजोरा हवा]

* या झाकलेल्या लेख विभागा ज्ञानकोशीय परिघा बाहेरील व्यक्तिगत कार्यानुभव नमुद केला गेल्याचे दिसते
विकिपीडिया हा एक ज्ञानकोश असून सहसा त्रयस्थ माध्यमातील आलेल्या संदर्भातून माहिती दिली जाते. ग्रामीण भागातील नोंदी घेणाऱ्या माध्यमांची अनुपलब्धता लक्षात घेऊन निम्नलिखीत माहितीवर ह्या लेखातील परिच्छेद लेखन केले गेले आहे. या झाकलेल्या लेख विभागा ज्ञानकोशीय परिघा बाहेरील व्यक्तिगत कार्यानुभव नमुद केला गेल्याचे दिसते.
 
लहान भाषा श्रवण,भाषण, वाचन व लेखन या चार टप्प्यातून शिकत असते. मुल हे आईच्या पोटात असल्यापासून शिकत असते. श्रवण म्हणजेच ऐकणे मुल आईच्या पोटात असल्यापासूनच करत असते. म्हणजेच मुल बोली भाषा शिकत असते. आई जे जे शब्द ऐकत असते, ते ते मुल ऐकत असते.जेंव्हा मुल जन्माला येते.तेंव्हा ते प्रत्यक्षात श्रवण करण्यास सुरुवात करते. घरात जि भाषा बोलली जाते, ती भाषा मुल ऐकत असते. यापासूनच मुल भाषा शिकण्यास प्रारंभ करते.
मुल जे ऐकते ते बोलण्याचा प्रयत्न करते.यापासूनच मुल भाषण म्हणजेच बोलण्यास सुरुवात करते. मुल त्याच्या कानावर पडणाऱ्या भाषेमध्येच पहिल्यांदा बोलायला शिकते . कारण घर हि त्याची पहिली शाळा आणि आई हि पहिला गुरु असते. घरात मुख्यत: अजूनही आपपली बोली भाषाच बोलली जाते.


परंतु जेंव्हा मुल शाळेत जाते व जर त्याची बोली भाषा मराठी सोडून असेल तर आपल्या महाराष्ट्रात त्याला शिक्षणास निश्चितच अडचणी येतात. उदा. जर मुलाची बोली भाषा लमाणी असेल आणि मुल जर मराठी शाळेत शिकायला आले तर त्याला निश्चितच शिकताना अडचणी येतात. हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. अशा बऱ्याच बोली भाषा आहेत. त्यामुळे मुलांना सुरुवातीची वर्षे शिक्षण घेताना अडचणी निर्माण होतात.


याबाबतीत मी माझ्या शाळेत आलेला अनुभव व त्यावर काढलेला मार्ग आपल्यासोबत शेअर करत आहे. मी 15 जून २००७ रोजी जि.पं.प्रा.शाळा लमाण तांडा बेळब ता. उमरगा जि.उस्मानाबाद येथे रुजू झालो. जेंव्हा मी शाळा पाहायला गेलो होतो तेंव्हा मला त्या तांड्यातील लोकांनी लमाणी व कन्नड भाषेतच माझ्याशी संवाद साधला होता. मला तर मराठी, हिंदी आणि इंग्लिश याच भाषा येत होत्या. शाळा बदलून मिळेल का यासाठीही मी प्रयत्न केला पण तिथे मला अपयश आले. शेवटी त्याच शाळेत रुजू झालो.


शाळेचा इतिहास पाहता, माझ्या असे लक्षात आले कि, शाळा तालुक्यात गुणवत्तेच्या बाबतीत खालून पाच मध्ये राहते. आणि येथे उपस्थितीचा खूप मोठा प्रश्न होता. यासाठी काय करावे तेच कळत नव्हते. शेवटी मनाचा निश्चय केला व कामाला लागलो. येथील लोक दिवाळीच्या नंतर कारखान्यावर ऊस तोडीसाठी स्थलांतर करतात. यावर उपाय म्हणून लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व आपली मुले त्यांच्या आजी आजोबाकडे ठेवण्यास सांगितले यामुळे उपस्थितीचा प्रश्न बऱ्यापैकी कमी झाला होता. विध्यर्थ्याना त्यांच्याच भाषेत शिक्षण मिळाले तर त्यांमा शाळेत रुची निर्माण होईल व मुले रोज शाळेत उपस्थित राहतील असे आम्हास वाटले. यासाठी मी, माझे सहकारी घोडके सर व वेल्हाळ सर यानी लमाणी भाषा शिकून घेतली व पहिलीत येणाऱ्या मुलांना दिवाळीपर्यंत मराठी समजेपर्यंत लमाणी व मराठी या दोन्ही भाषा बोलण्यासाठी वापरू लागलो. यामुळे मुले शाळेत येऊ लागली व शिकू लागली.


याचाच परिणाम असा झाला सन २००८-०९ मध्य माझी शाळा तालुक्यात गुणवत्तेत पहिला क्रमांक आल व २००९-10 मध्ये शाळेला जिल्हा आदर्श शाळा पुरस्कार मिळाला. हे केवळ आम्ही लमाणी बोलू लागलो म्हणून झाले नाही पण फरक नक्कीच पडला. याबरोबरच आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत होतो. मग पुढे मुल पहिलीत यायच्या अगोदरच म्हणजे पुढील वर्षी पहिलीत येणारी मुले आम्ही शाळेतच बसवून घेत व त्यांना पहिलीच्या मुलांसोबतच शिकवत त्यामुळे मुल पहिलीत येताना ते मराठी भाषेशी एकरूप झालेलं असायचं. अजूनही तो उपक्रम चालू आहे. याबरोबरच आम्ही सकाळी 9 ते 10 या वेळेत मुलांना ग्रुप करून दिलेले आहेत त्या गृपमधे मुले बसतात. हे ग्रुप आम्ही सर्व स्थरातील मुलांचे एकत्र केलेले आहेत. त्यामुळे या वेळेत मुले ज्या मुलांना समजले नाही त्या मुलांना तो घटक लमाणी भाषेत समजावून सांगतात. यामुळे गुणवत्ता वाढीस मदत होत आहे.


आता तांड्यातील लोक जागरूक झाले आहेत. लोकांनी लोकवाटा  जमवून सन २०१४-15 मध्ये शाळा ई-लर्निंग व डिजिटल केली आहे. गतवर्षी शाळा नवोपक्रम शील शाळा म्हणून निवड झाली होतो. सध्या मी शाळा ई-लर्निंग झाल्यापासून लमाणी भाषेतच इंग्रजी व मराठी भाषेशी सलंग्न असे व्हिडीओ बनवले आहेत. यामुले मुलांना अजून शाळेत रुची निर्माण झाली व आता शाळेत 100% उपस्थिती राहते. माझी शाळा आता लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र झाले आहे. म्हणूनच वाटते कि मुलांना समजेपर्यंत तरी त्यांना बोली भाषेशी सलंग्न शिक्षण मिळावे ज्यामुळे मुले शिकतील व टिकतील. 

लेखक :- श्री.खोसे उमेश रघुनाथ ( सहशिक्षक )

जि. प.प्रा.शाळा लमाण तांडा बेळंब

ता.उमरगा जि. उस्मानाबाद

सपर्क :- 9764412501