बेळंब
?बेळंब महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | उमरगा |
जिल्हा | उस्मानाबाद जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
बेळंब हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६४० मिलीमीटर असते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
जिल्हा परिषद शाळा
[संपादन]जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लमाण तांडा, बेळंब ही उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील एक प्रयोगशील शाळा आहे.
शाळेत मुखत्वे कन्नड मिश्रीत लमाणी बोलीभाषिक विद्यार्थी येतात. २००८ नंतर शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मातृभाषेचा सराव करून विद्यार्थ्यांशी मराठी सोबतच त्यांच्या मातृभाषेतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला, शाळेत शिकविले गेलेले घटक, विद्यार्थी गट बनवून लमाणी भाषेतून एकमेकांना समजावून सांगतात. परिणामी शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढून २००८-०९ मध्य शाळेचा तालुक्यात गुणवत्तेत पहिला क्रमांक आला व २००९-१० मध्ये शाळेला जिल्हा आदर्श शाळा पुरस्कार मिळाला.
लोकांनी लोकवाटा जमवून सन २०१४-१५ मध्ये शाळा ई-लर्निंग व डिजिटल केली आहे. गतवर्षी शाळा नवोपक्रम शील शाळा म्हणून निवड झाली होती. सध्या शाळा ई-लर्निंग झाल्यापासून लमाणी भाषेतच इंग्रजी व मराठी भाषेशी सलंग्न असे व्हिडीओ बनवले आहेत. यामुळे मुलांना शाळेत अजून रुची निर्माण झाली व विद्यार्थ्यांचे पालक उसतोडणीच्या काळात रोजंदारीसाठी स्थलांतर करणारे असून सुद्धा शाळेने १००% विद्यार्थी उपस्थिती निश्चीत करण्यात यश मिळवले आहे.