जग्गी वासुदेव
जग्गी वासुदेव | |
![]() | |
कार्यक्षेत्र | अध्यात्म |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
जग्गी वासुदेवांना सदगुरूंच्या रूपातही ओळखले जाते. सदगुरू एक योगी आणि दिव्यदर्शी आहे. ते इशा फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. इशा फाऊंडेशन ही लोकहितासाठी काम करणारी लाभरहित संस्था आहे. जी योग शिबीर चालवते. इशा फाऊंडेशन भारतासहित 'अमेरिका, इंग्लंड, लेबनन, सिंगापूर आणि आस्ट्रेलिया या देशातही योगा शिकविते. आणि त्याचबरोबर सामाजिक विकासासाठी योजना राबविते. युनायटेड नेशन्सच्या आर्थिक व सामाजिक परिषदेत (ECOSOC) इशा फाऊंडेशनला विशेष सल्लागार म्हणून मान्यता प्राप्त आहे.
प्रारंभिक जीवन / बालपण[संपादन]
जग्गी वासुदेव यांचा जन्म 3 सप्टेंबर 1957 रोजी कर्नाटक राज्यातील म्हैसूर शहरात एक तेलगू घराण्यात झाला. त्यांचे वडील डाक्टर होते. त्यांच्या आर्इने एका ज्योतिषास त्यांचे भविष्य विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले की, हया मुलाचे आयुष्य अतीशय भाग्यवान असेल म्हणून त्यांचे नाव जगदिश असे ठेवण्यात आले. जग्गी जसे जसे समजूतदार होत गेले तसे तसे त्यांची ओढ ही निसर्गाकडे वाढू लागली व ते जवळपासच्या जंगलात सहलीला जाऊ लागले. कधी कधी दोन तीन दिवसही त्यांचे वास्तव्य जंगलात असे. इतके ते निसर्गाशी एकरूप होत असत. वयाच्या 11व्या वर्षी जग्गी राघवेंद्र राव उर्फ मल्लाडीहल्ली स्वामी यांच्या सहवासात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी योगाभ्यास सुरू केला व मनापासून तो आत्मसात केला.
प्राथमिक शालेय शिक्षणानंतर त्यांनी म्हैसूर विश्वविदयालयातून इंग्रजी भाषा विषयात पदवी मिळवली. विश्वविदयालयात शिकत असताना त्यांना गिर्यारोहणात व मोटरसायकल चालवण्यात रूची वाढू लागली. म्हैसूरमधील चामुंडी टेकडी त्यांचे व त्यांच्या मित्रांचे आवडते ठिकाण होते. ते सर्व तिथे वारंवार जात असत. जग्गी भारतात ठिकठिकाणी मोटारसायकलवर प्रवास करत असत. भारत-नेपाळच्या सीमारेषेवर पासपार्ट नसल्यामुळे आडवण्यात आले तेव्हा त्यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली व त्यांनी अर्थप्राप्ती करून स्वावलंबी होण्याचे ठरवले आणि त्यासाठी काही उदयोगही सुरू केले. उदा: पोल्ट्री फार्म, विटा बनवणे, बांधकाम इ.
अध्यात्मिक अनुभव[संपादन]
वयाच्या पंचविसाव्या वर्षी 23 सप्टें. 1982 रोजी ते चामुंडी टेकडीवर एका दगडावर बसलेले असतांना त्यांना अध्यात्मिक अनुभूती झाली. त्या अनुभवासंदर्भात ते असे सांगतात की, माझ्या आयुष्यात त्या क्षणार्यंत मी स्वतः व सृष्टीत फरक करू शकत होतो. पण त्या आत्मानुभूतीनंतर मी सृष्टीपासून वेगळा समजू शकत नव्हतो. जेथे तेथे मी स्वतःलाच बघू लागलो. जसे दगडात,आकाशात, सगळीकडे. हा अनुभव त्यांना वारंवार येऊ लागला. या घटनेनंतर त्यांची जीवनशैली पूर्णपणे बदलली. त्यांना आलेला अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आपले पूढील जीवन समर्पित करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी इशा फाऊंडेशन आणि इशा योगाची स्थापणा केली.
इशा फाऊंडेशन[संपादन]
इशा फाऊंडेशन हे कोर्इंबतूर मधील वेलींगिरी पर्वताच्या पायथ्याशी एकशे पन्नास एकरमध्ये पसरलेले आहे. ही संस्था दोन लाखांपेक्षाही जास्त स्वयंसेवकांदवारे चालवली जाते. हया संस्थेने पर्यावरण संरक्षणासाठी प्रोजेक्ट ग्रीनहॅंन्डस योजना राबवली आहे. 17 आक्टो. 2006 मध्ये तमिळनाडूतील 27 जिल्हयात लोकांच्या मदतीने 8.52 लाख झाडे लावली. त्यामुळे गिनीजबुकमध्ये एक नविन रेकार्ड बनले. 2008 मध्ये हया महत्त्वपूर्ण कार्यासाठी इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कारही मिळाला.
इशा योगा केंद्र[संपादन]
ध्यानलिंग[संपादन]
ध्यानलिंग इशा योगा केद्रात स्थापित करण्यात आले आहे. मनुष्याला उच्च स्तराच्या मानसिक पातळीवर पोहोचण्यासाठी याची स्थापणा करण्यात आली. मानवाच्या हिताकरीता ध्यानलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. इशा योगा केंद्र हे शक्तीशाली स्थान योगाच्या चार मार्गाने (ज्ञान, कर्म, क्रिया,भक्ती) मनुष्याला अंतरमुख होण्यास मदत करते. ध्यानलिंग योगमंदिराची प्रतिस्थापणा 1999 साली जग्गींनी पूर्ण केली. ध्यानलिंग एक योगिक मंदिर असून हे ध्यानासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे एक जिवित लिंग आहे. त्यामुळे ध्यानाचा अनुभव नसलेल्यांनाही चांगले ध्यान लागते. 13 फूट व 9 इंच असलेले ध्यान लिंग जगातील सर्वात मोठे लिंग आहे. ध्यानलिंग हे कुठल्याही एका संप्रदायाशी निगडीत नाही तर संपूर्ण मानवतेशी निगडीत आहे. ध्यान लिंगाच्या प्रवेशदवारावर सर्वधर्म स्तंभ स्थापित केले आहे ज्यात या स्तंभावर हिंदू, मुसिलम, इसार्इ, जैन, बौदध, शीख, ताओ, पारशी, यहूदि आणि शिन्तो धर्माचे प्रतिक कोरलेले आहे. हे धार्मिक मतभेदाच्या पलीकडे सर्व मानवतेला आमंत्रित करते.