चीनचा कम्युनिस्ट पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चिनी साम्यवादी पक्ष या पानावरून पुनर्निर्देशित)
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे चिन्ह

चीनचा कम्युनिस्ट पक्ष (चिनी: 中国共产党; Communist Party of China (CPC)) हा चीन देशामधील एकमेव राजकीय पक्ष आहे. चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची एकछत्री राजवट असून देशाची सर्व धोरणे हा पक्ष ठरवतो. चीनच्या संविधानामध्ये कम्युनिस्ट पक्षाला कायदेशीर रित्या सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. षी चिन्पिंग हे कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस व पर्यायाने चीनमधील सर्वोच्च नेते आहेत.

कम्युनिस्ट पक्षाची स्थापना १९२१ साली शांघाय येथे झाली. १९२७ ते १९५० ह्या प्रदीर्घ काळ चाललेल्या गृहयुद्धामध्ये कम्युनिस्ट पक्षाने क्वोमिटांग ह्या प्रतिस्पर्धी पक्षाचा पराभव करून संपूर्ण चीनवर अंमल मिळवला व क्वोमिटांगला तैवानमध्ये हाकलुन लावले. १९६० च्या शतकादरम्यान तंग श्यावफिंगने कम्युनिस्ट पक्षाची अनेक धोरणे ठरवली.

कम्युनिस्ट पक्षाची ध्येये साम्यवादावर आधारित आहेत. साम्यवादाच्या जोडीला कम्युनिस्ट पक्षाने भांडवलशाहीचाही मर्यादित स्वीकार केला आहे. सध्या ८ कोटी कार्यकर्ते असलेला कम्युनिस्ट पक्ष हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. ह्यांमध्ये चीनच्या बव्हंशी लष्करी, प्रशासकीय व सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश होतो.

सरचिटणीस[संपादन]

सरचिटणीस हा कम्युनिस्ट पक्षाचा पुढारी व पक्षामधील सर्वोच्च दर्जाचा नेता आहे. कम्युनिस्ट पक्ष हा चीनचा एकमेव पक्ष असल्यामुळे सरचिटणीस हा चीनचा राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुख आहे.

क्रम. चित्र नाव पदग्रहण निवृत्ती
सरचिटणीस
1 A man wearing dark clothes, starring straight at the camera चेन डुषीयू
(1879–1942)
2 ऑगस्ट 1921  1922
पद रद्द (1922–1925)
1 A man wearing dark clothes, starring straight at the camera चेन डुषीयू
(1879–1942)
1925 7 ऑगस्ट 1927
2 A man looking straight into the camera, behind him there is only black षीयांग झोंग्फा
(1880–1931)
1928 1931
3 A man looking straight into the camera, behind him there is only black बो गू
(1907–1946)
1932 1935
4 A man looking straight into the camera, behind him there is only black झांग वेन्टियान
(1900–1976)
जानेवारी 1935 मार्च 1943
पद रद्द (1943–1982)
5 तरुणपणीचा फोटो हू याओबांग
(1915–1989)
11 सप्टेंबर 1982 15 जानेवारी 1987
6 A man wearing dark clothes, starring straight at the camera चाओ झियांग
(1919–2005)
16 जानेवारी 1987 23 जून 1989
7 A man wearing dark clothes, starring straight at the camera च्यांग झमिन
(जन्म 1926)
24 जून 1989 15 नोव्हेंबर 2002
8 A man wearing dark clothes, starring straight at the camera हू चिंताओ
(जन्म 1942)
15 नोव्हेंबर 2002 15 नोव्हेंबर 2012
9 A man wearing dark clothes, starring straight at the camera षी चिन्पिंग
(जन्म 1953)
15 नोव्हेंबर 2012 विद्यमान

बाह्य दुवे[संपादन]