Jump to content

चर्चा:सह्याद्री

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्राण्याच्या फोटो मध्ये भारतीय चित्ता व काळा चित्ता लिहिल आहे. कृपया बिबट्या असे नाव द्यावे जे त्याचे खरे नाव आहे. भारतीय चित्ता १९५१ मध्येच संपला.


मोल्सवर्थ शब्दकोशाप्रमाणे leopard चा अर्थ चित्ता तसेच panther चा अर्थ बिबळ्या असा दिलेला आहे. कृपया खालील दुवे तपासा
कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०५:५३, ४ फेब्रुवारी २००८ (UTC)


मला वाटते फक्त महाराष्ट्रात सह्याद्री असे म्हणतात पण इतर राज्यांत मात्र पश्चिम घाट असे म्हणतात.

पुष्कर पांडे (चर्चा) १८:४८, १५ डिसेंबर २०१४ (UTC)

इतरत्र सापडलेला मजकूर

[संपादन]

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य बदल करुन या लेखात समाविष्ट करावा. -- अभय नातू (चर्चा) ०५:१६, १५ मे २०२४ (IST)[reply]


शृंगाररसराज कालिदासाने पश्चिम घाट अथवा सह्यगिरीला उपमा दिली आहे एका लावण्यवती युवतीची. अगस्त्यमलय ह्या सह्याचलेचा शिरोभाग, आणेमलय व नीलगिरी उरोभाग, गोमन्तक कटिप्रदेश आणि सातपुडा पदकमले. कालिदास सांगतो की ह्या मनमोहक सह्याचलेने पांघरला आहे सदाहरित अरण्याचा शालू, लावला आहे चंदनाचा लेप, गळा घातल्या आहेत वेलदोड्यांच्या माळा. आज महाराष्ट्राने ज्यांना राज्यविहंगमांचा दर्जा दिला आहे ती हिरवी कबुतरे- हरियाळ तिच्या रानातल्या हत्तींच्या दांडगाईने बुजून भराऱ्या घेत आहेत.[][]

  1. ^ गाडगीळ, माधव (2023). पुणे, महाराष्ट्र येथे लिहिले. साह्याचला आणि मी एक प्रेम कहाणी. पुणे: राजहंस प्रकाशन. ISBN 9395483261.
  2. ^ "शिक्षणआनंदाची वर्षे." Loksatta. 2023-09-03. 2024-05-14 रोजी पाहिले.

अभय नातू (चर्चा) ०५:१६, १५ मे २०२४ (IST)[reply]