चर्चा:श्रीरंग संगोराम

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ते लोकसत्ता दैनिकाचे साहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांचे वडील होते. : म्हणजे ते पूर्वी वडील होते, आता ते वडील नाहीत; आता कोण आहेत कोण जाणे?

ते लोकसत्ता दैनिकाचे साहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांचे वडील होत. : म्हणजे पूर्वीही होते, (हयात नसले) तरी आताही वडीलच आहेत. .... (चर्चा) २३:२२, ३ नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]


खरयं तुमचं म्हणणं ! यापुढे सुधारणा करेन !!

श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]])


'ज'(र) तर कायद्याच्याही पुढे गेले :) (ह.घ्या.)
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ००:०८, ४ नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]


चला, खरयं तुमचंही म्हणणं ! यापुढे आणखी सुधारणा करेन !!!
कायद्यापेक्षा नीति महत्वाची.
आणि नाती सुद्धा !!!!
ती नीट दिसलीच पाहिजेत. सुव्यवस्थित संस्थापित झालीच पाहिजेत.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे ००:१३, ४ नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]
इंग्लिशमध्ये ही संदिग्धता काढण्यासाठी used to be आणि was हे दोन शब्दप्रयोग आहेत. A was father of B. आणि A used to be father of B.
असे मराठीत कसे लिहावे? वर ज यांनी उदाहरण दिलेले पाहिले.
अभय नातू (चर्चा) ०५:०८, ४ नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]

used to be[संपादन]

used to be म्हणजे असत, पण नात्याच्या संदर्भात 'होत'! ... (चर्चा) १४:३८, ४ नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]

धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १०:१४, ५ नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]
'ज' अजून येऊ द्यात :), तुम्ही म्हणतातर आजपासून अंगात शर्ट न घालता शर्टात अंग घालू, आणि पायात चप्पल न घालता चपलेत पाय घालू :)
बाकी "ते लोकसत्ता दैनिकाचे साहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांचे वडील होत." हेच वाक्य "त्यांचे सुपुत्र/ त्यांचा मुलगा मुकुंद संगोराम दैनिक लोकसत्ताचा साहाय्यक संपादक आहे(त)" असेही काहीसे रचता येऊ शकेल का ? किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीने ?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:२५, ४ नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]


याबाबत माझे आकलन असे :

गृहीततत्त्व : भाषांतर/अनुवाद सुंदर असेल तर अचूक असेल असे नाही आणि अचूक हवे असेल तर ते सुंदर असेल असे नाही. - इति अशोक केळकर

  • I used to enjoy reading, but I don’t have time for it now.
  • भाषांतर = मला वाचनात आनंद मिळत असे, पण आता त्यासाठी वेळच मिळत नाही.
  • मराठीकरण = मला वाचायला आवडे, पण आता वेळ नाही.
  • I was enjoying reading, but I don’t have time for it now.
  • भाषांतर = मी वाचनात आनंद घेत होतो, पण आता त्यासाठी वेळ नाही.
  • मराठीकरण = मला वाचायला आवडत होते, पण आता त्यासाठी वेळच मिळत नाही.


चू. भू. दे. घे. रे सायबा !! भाषांतर मे सौदा नही !! अशोकराव मापी करा राव !!

श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे ०९:४५, ४ नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]


आता उदाहरणार्थ अनुवाद आणि भाषांतर हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. पण पाने पुनर्निर्देशित केली आहेत. बर मग तर, हे शब्द केवळ बापुडवाणे शब्द की तात्त्विक संकल्पना म्हणायच्या !

चू. भू. दे. घे.

श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे ०९:५३, ४ नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]

भाषांतर, रूपांतर, अनुवाद आणि स्वैर अनुवाद या चारही शब्दांच्या अर्थांमध्ये फरक आहेच. तसे पाहिले तर कोणत्याही भाषेत, सर्व अर्थ तंतोतंत समान आणि तेवढेच आहेत असे, आणि एकाच प्रकारे वाक्यात वापरले जाणारे (दोन किंवा जास्त) शब्द क्वचितच असतात. शब्दाच्या अर्थच्छथांमध्ये किंवा वापरांमध्ये काही-ना-काही फरक असतोच. .... (चर्चा) १५:१०, ४ नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]