चर्चा:वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ
Appearance
'हे' विमानतळ का 'हा' विमानतळ?
[संपादन]'हा' विमानतळ हे वाचायला बोरोबर नाही वाटत. बोली भाषेत सुद्धा 'हे' विमानतळ जास्त प्रचलित आहे. - प्रबोध (चर्चा) ०८:०८, १३ ऑक्टोबर २०१५ (IST)
- तळ हा पुल्लिंगी शब्द आहे. गाडीतळ, वाहनतळ, इ. मधील तळ हाच विमानतळातील तळ आहे.
- हा विमानांचा तळ आहे हे अधिक सुसंगत होईल.
- हे विमानांचे तळ आहे यात तळ नपुंसकलिंगी शब्द असल्याचे ध्वनित होते.
- अभय नातू (चर्चा) ०८:५६, १३ ऑक्टोबर २०१५ (IST)
- ता.क. - स्थानक शब्द वापरल्यास हे स्थानकच बरोबर होईल.
- प्रबोधला वाटले तसे मलाही वाचताना सहजता जाणवत नाहीए, अनुवादात कृत्रिमता शिल्लक राहील्यामुळे तसे होत असेल ? परिच्छेदाचे सलग वाचन करुन 'हा' किंवा 'हे' न लिहिता कसे दिसेल याचा विचार करुन संक्षिप्तीकरण करून पुर्नलेखन करण्यास वाव आहे असे वाटते.
- पर्याय १
- वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ (इंग्लिश: Washington Dulles International Airport; IATA: IAD) अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यामधील वर्दळीचे विमानतळ आहे. वॉशिंग्टन, डी.सी. शहरासाठी प्रमुख विमानतळ आहे. विमानतळ वॉशिंग्टन, डी.सी. शहराच्या २६ मैल पश्चिमेस आहे.
- पर्याय २
- वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ (इंग्लिश: Washington Dulles International Airport; IATA: IAD) अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यामधील वॉशिंग्टन, डी.सी. शहरासाठी प्रमुख आणि वर्दळीचे विमानतळ आहे. विमानतळ वॉशिंग्टन, डी.सी. शहराच्या २६ मैल पश्चिमेस आहे.