चर्चा:वेरूळ (लेणी)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेखांचे स्वतंत्र स्वरुप[संपादन]

अजिंठा-वेरूळची लेणी या लेखात वेरूळ लेण्यांचा सविस्तर विचार आहे. त्यामुळे हा लेख रद्द करून त्या मोठ्या लेखात वर्ग करावा असे वाटते.आर्या जोशी (चर्चा)

अजिंठा (लेणी) आणि वेरूळ (लेणी) या लेण्या स्वतंत्र असल्यामुळे दोन्ही लेख स्वतंत्र असणार आहेत. आणि तेच मुक्य लेख असणार आहेत.
अजिंठा-वेरुळची लेणी हा लेख मुखपृष्ठ सदर राहुन गेल्यामुळे रेकॉर्डपरपज करता ठेवला आहे, भविष्यात किंवा कन्फ्युजन खुप वाढल्यास विकिपीडिया नामविश्वात नेऊन जतन करता येईल सामायिक लेखाचे सध्या अभिप्रेत स्वरुप अजिंठा (लेणी) आणि वेरूळ (लेणी) या लेखांवर बेतलेला असेल असे आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:४८, ५ मे २०१७ (IST)[reply]

धन्यवाद. मी वेरुळच्या स्वतंत्र लेखावर आता अधिक काम करेन.आर्या जोशी (चर्चा)

चित्रदालन मार्गदर्शन व्हावे[संपादन]

@अभय नातू: सर.. @माहितगार: सर.. वेरूळ लेणी या लेखात वास्तवत: फक्त चार फोटो लेखात होते. त्यांच्या साठी चित्रदालन करणे योग्य आहे काय ? चित्र दालन निर्माण कधी करावे याचे काही संकेत आहेत काय ? मला वाटते लेखात मध्ये चित्र असल्याने आशयाला अर्थ येतो, भारदस्त पणा येतो.लेख चांगला वाटतो. सरसगट लेखात चित्र दालन करणे योग्य आहे काय ? चित्र दालन तेव्हाच असावे जेव्हा लेखात खूप चित्र असतील आणि उर्वरित चित्रे दालनात टाकण्यास काहीही हरकत नसावी. @आर्या जोशी: अनेक महत्त्वपूर्ण लेखांत चित्र दालन निर्माण करून लेखाचे दृश्य स्वरूप बदलवत आहेत असे वाटते. म्हणून याबाबत योग्य मार्गदर्शन ही विनंती प्रसाद साळवे १९:४७, ६ मे २०१७ (IST)[reply]

@प्रसाद साळवे: वरिष्ठ मार्गदर्शक ज्या सूचना त्यातील त्या पाळण्यात मला कोणताच अडसर वाटत नाही तथापि असे निर्णय चावडीच्या पानावर सर्वच संपादकांसाठी उपलब्ध व्हावेत. मी एक संशोधक आहे त्यामुळे लोकांना नेमके काय उपयुक्त आहे ते स्वीकारण्याची मानसिकता माझी नक्कीच असेल. कोणत्याही लेखाचे स्वरूप बदलून त्यावर स्वत:ची मोहर उमटविणे अशी असमंजस मानसिकता माझीही नाही.आर्या जोशी (चर्चा)

@अभय नातू: सर.. @माहितगार: सर.. चित्र दालन कोठे करावे वा करू नये या संबंधी मार्गदर्शन करावे ही विनंती प्रसाद साळवे १३:३९, ८ मे २०१७ (IST)[reply]

॒॒

@प्रसाद साळवे: दोन-तीन परिच्छेदांमध्ये एखादे चित्र लेखांतर्गत असावे. चित्रांची संख्या यांहून खूप जास्त असल्यास चित्रदालन करावे, असे मला वाटते. ... (चर्चा) १४:२८, ८ मे २०१७ (IST)[reply]
@: सर, सहमत, लेखातील सर्व चित्रे काढून स्वतंत्र चित्रदालन केल्यामुळे लेखातील अर्थपूर्णता जाते. प्रसाद साळवे १४:४९, ८ मे २०१७ (IST)[reply]
ज यांच्या मतास अनुमोदन.
चित्रे इतस्ततः असू नयेत. लेखातील विभागांना पोषक अशी चित्रे योग्य त्या ठिकाणी घालावी, उदा. चित्रशैली विभागात स्थानिक जत्रेचे चित्र असू नये त्याऐवजी चित्रशैलीतील प्रकार दाखविणारे चित्र असावे.
विभागांत बसणार नाहीत अशी चित्रे असल्यास व ती लेखास उपयुक्त असली तरच ती चित्रदालनात घालावी.
शक्यतो लेखातील चित्रे उजवीकडे असावीत परंतु काही वेळेस डावीकडे घालणे जास्त उपयुक्त ठरते. असे केल्यास स्पष्टीकरण चर्चा पानावर लिहावे म्हणजे निष्कारण चर्चा होणार नाही.
अभय नातू (चर्चा) १९:४६, ८ मे २०१७ (IST)[reply]