चर्चा:लोकमान्य टिळक/जुनी चर्चा १
Untitled
[संपादन]३१ डिसेंबर, २०१७ पर्यंतची चर्चा येथे आहे.
- विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्पात वाचन करून/योगदान देऊन, चर्चांना तर्कसुसंगत ठेवण्यात आपण पुढाकार घेऊ शकता.
स्वातंत्र्य सैनिकांची जात,धर्म,भाषा प्रांताचे महत्त्व किती?
[संपादन]- जो पर्यंत लेखन संदर्भासहित आहे तो पर्यंत लेखा संबंधीत बहूसंख्य, उल्लेख विकिच्या नियमात बसतात. टिळक चित्पावन ब्राम्ह्णण असणे,मराठी, असणे हिंदू असणे,महाराष्ट्रीय असणे हे त्य त्या संद्र्भाने अभिमानाचे त्या त्या गटाला निश्चित आहे.माझ्या वयक्तितकजीवनात मीसुद्धा अशा काही गटाचे प्रतिनिधीत्व करत असतो. पण संकुचीत कल्पनांच्या बंधनांचा विचार ज्यांनी स्वत: केला नाही त्याची जातकुळी काढावी का? कदाचित इतर सद्य संदर्भात एखाद्या गटाला स्वत:चे योगदान आणि महत्त्व अभिमान अधोरेखीत करणे आवश्यक आहे असे वाटत असेल तर तेही समजण्यासारखे आहे परंतु त्याकरिता विकिपीडिया शिवाय इतरही माध्यमे आहेत. असे उल्लेख आवश्यक नसल्यास टाळावेत असे मला प्राजंळपणे वाटते.
Mahitgar १५:५३, २५ मे २००९ (UTC)
- माझ्यामते माहिती लिहीण्यास हरकत नाही ती संपूर्ण लिहावी, म्हणजे
१ धर्म (हिंदू/मुस्लीम/ वगैरे)
२ जात
३ पोटजात
४ गोत्र
५ वेद (ऋग्वेदी/ यजुर्वेदी ...)
- कोल्हापुरी ०४:२५, २६ मे २००९ (UTC)
माफ करा अजुनी हेही लिहावे
६ प्रवर
७ पंथ
- कोल्हापुरी ०४:४३, २६ मे २००९ (UTC)
- लेखात ज्या ठिकाणी संदर्भ आवश्यक होते, तेथे मी संदर्भ देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र टिळकांच्या जातीचा उल्लेख लेखात असावाच असा माझा अट्टाहास नाही. उलट त्यामुळे टिळक जर एका विशिष्ट समाजाचेच प्रतिनिधी होते असे प्रतित होत असेल तर तसा उल्लेख नसलेलाच चांगला.
- कुणाला आक्षेप नसेल तर मी जातीचा उल्लेख काढून टाकू इच्छितो.
- क्षितिज पाडळकर २३:३८, ९ ऑगस्ट २००९ (UTC)
SARVADNYA TILAK
[संपादन]KRANTIKARAK TILAK VYASANGI TILAK TILAK EK ADARSHA PROTSAHAK SHOULD BE ADDED
अकारण दडपा-दडपी कशासाठी
[संपादन]लपवा छपवी करण्याचे कारण काय? आपला देश विविध जाती-धर्मांनी बनला असेल, तर त्या लपवायच्या कशासाठी?
महापुरूषांच्या जीवन चरित्रातील ठराविकच भाग घेऊन वाचकांसमोर ठेवणे गैर आहे. सर्वच बाजू वाचकांसमोर आल्या पाहिजेत. आपले महापुरूषही माणसेच होती. त्यांचे चित्रण माणसांसारखेच व्हायला हवे. सद्गुणांचे पुतळे उभे करण्यासाठी अकारण दडपा-दडपी करू नये. टिळक चरित्रातील वेदोक्त प्रकरण, महार रेजिमेंटला केलेला विरोध, सिंहगडावरील बेकायदेशीर बांधकाम याबाबी झाकण्यात काहीही अर्थ नाही. त्याही वाचकांसमोर आल्या पाहिजेत.
वरील भूमिकेनुसार मी या लेखात काही संपादने केली आहेत. विकिपीडिया हे नि:पक्ष व्यासपीठ आहे, अशी माझी समजूत आहे. माझ्या संपादनांना ब्राह्मण संपादकांकडून विरोध होणार नाही, अशी अपेक्षा करतो. brurthari१८:३०, १७ सप्टेंबर २०१३ (IST)
- आपले महापुरूषही माणसेच होती. त्यांचे चित्रण माणसांसारखेच व्हायला हवे.
- ही भूमिका अवास्तव नाही. उलट असे चित्रण समाजाच्या एकाच जाती-पातीच्या महापुरुषांचेच होऊ नये तर सगळ्याच महापुरुषांचे व्हावे. असे केल्याने प्रस्तुत लेखक एखाद्या जातीविरुद्ध नाही हे सिद्ध होईल.
- अभय नातू (चर्चा) ०५:५७, १८ सप्टेंबर २०१३ (IST)
आधी स्वत:ला नि:पक्ष असल्याचे सिद्ध करा
[संपादन]श्री. अभय नातू,
कोण कोणत्या जातीविरुद्ध आहे, हे पाहण्याआधी तुम्ही स्वत:ला नि:पक्ष असल्याचे सिद्ध करा. ब्राह्मणवादी भूमिका सोडून सर्वसमावेशक भूमिका घ्या. स्वत: ब्राह्मणवादी भूमिका घेऊन वावरायचे आणि इतरांना जातीनिरपेक्षता सिद्ध करण्यास सांगावयाचे, हे उद्योग आता बंद करा. इतरांना ब्रह्मज्ञान सांगून स्वत: कोरडे पाषाण राहण्याचा तुमचा संधीसाधूपणा सगळ्यांना कळला आहे. त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारे उपदेश न केलेला बरा.
brurthari१८:३०, १९ सप्टेंबर २०१३ (IST)
- भृतहारी (किंवा जे काही तुमचे खरे नाव असेल ते),
- प्रस्तुत लेखक म्हणजे तुम्हीच असा समज का करून घेतलात? या लेखावर अनेक लोक संपादन करीत आहेत. त्या सगळ्यांनाच हे लागू होते. आपण स्वतःच पक्षपात करीत असल्याचे 'चांदणे' तर तुमच्या मनात नाही ना?
- येथे मी तुमच्या भूमिकेस पाठिंबा दिला, किंबहुना तुम्हास इतरही लेखांवर ही भूमिका लावण्यास प्रोत्साहन दिले. असे असता एकदम हमरीतुमरीवर येउन बोलण्याचा तुमचा रोख पाहता तुम्हीच काहीतरी लपवीत आहात असे वाटते.
- माझ्या निःपक्षपातीपणाबद्दल काळजी करू नये. माझा संपादनइतिहास पाहता मी निःपक्षपाती असल्याचे कळून येईलच. तुमचा संपादनइतिहास पाहता तुमचे लेखन विशिष्ट लेखांवरच असल्याचे व त्याहीपेक्षा इतरांना शिव्याशाप देण्याचे, खट्याळ आरोप करण्याचे तसेच एकंदर मराठी विकिपीडियावर गोंधळ घालण्याचे दिसते.
- ब्रह्मज्ञान तर आपणच सांगत आहात. संधीसाधूपणा आपलाच दिसून येतो. "आपण सांगे लोकाला आणि **** आपल्या नाकाला." ही उक्ती आपणास चपखल बसते. त्याउप्पर आता तुम्ही माझ्यावर वैयक्तिक आरोप करीत आहात.
- आपले तत्त्वज्ञान आपल्यापाशी ठेवून येथे फक्त माहितीत भर घालण्याचे काम करावे हे मी एक संपादक आणि प्रचालक म्हणून आपणास नम्र विनंती करतो.
- टा टा.
- अभय नातू (चर्चा) २०:२७, १९ सप्टेंबर २०१३ (IST)
"वैयक्तिक मत" असे म्हणून कोणताही संदर्भ काढणे चुकीचे आहे. प्रत्येक संदर्भ हा "वैयक्तिक मत"च असते. वैयक्तिक मत ठरवून संदर्भ काढायचे ठरल्यास अख्खे विकिपीडिया रिकामे होईल. अभय नातू यांना समज देण्यात यावी, अशी माझी विनंती आहे.
brurthari१७:२०, २० सप्टेंबर २०१३ (IST)
- भृतहारी (किंवा जे काही तुमचे खरे नाव असेल ते),
- स्वतःच्या ब्लॉगवर लिहिताना ब्लॉगलेखकाने कोणावरही काहीही खोटे आरोप केले तरी ते सिद्ध करण्याची जबाबदारी नसते. असे लिखाण संदर्भ म्हणून देणे म्हणजे उंदराने मांजराला साक्ष देणे असेच होते.
- आपण स्वतः वैयक्तिक मत म्हणून या लेखातून मजकूर काढलेला असताना वर तुम्ही लिहिलेला मजकूर गंमतशीर वाटतो. आपण विकिपीडिया किंवा कोणत्याही संदर्भग्रंथ, संदर्भसंकेतस्थळ यांच्याबद्दलची किमान माहिती करुन घेणे आवश्यक दिसते.
- अभय नातू (चर्चा) २०:०५, २० सप्टेंबर २०१३ (IST)
विकिपीडियाला गाळीव इतिहासाचे माध्यम बनवू नका
[संपादन]श्री. अभय नातू यांना सप्रेम नमस्कार,
"ब्लॉग लेखकाला खोटे आरोप सिद्ध करण्याचे बंधन नसते" हे आपण वर नोंदविलेले मत गमतीशीर आहे. पुस्तक लेखकाला आरोप सिद्ध करण्याचे बंधन असते, असे आपणास म्हणायचे आहे काय?
दुसरी गमतीशीर बाब म्हणजे ब्लॉगवरील संदर्भांना असलेला तुमचा विरोध सिलेक्टिव्ह आहे. या लेखात सनातन प्रभातच्या ब्लॉगचे संदर्भ आहेत. त्याला तुमचा आक्षेप नाही. सनातन प्रभात ब्राह्मणांसाठी काम करते, म्हणून त्यांचे संदर्भ तुम्ही पवित्र करून घेतले आहे का?
या लेखातील पहिलाच संदर्भ "सावरकर डॉट ओरजी" या संकेत स्थळाचा आहे. हे संकेत स्थळ अत्यंतिक बायस्ड असताना त्यावरील संदर्भ तुम्हाला चालतात. कारण हे संस्थळही ब्राह्मणांसाठी काम करते.
सर्वांत महत्त्वाची बाब
[संपादन]भा. द. खेर यांच्या "लोकमान्य टिळक दर्शन" या सर्वमान्य पुस्तकातील संदर्भ मी या लेखात दिले होते. तेही तुम्ही उडवून टाकले. हे संदर्भ तर ब्लॉगमधून घेतलेले नव्हते? मग आपण का बरे काढले? येथेही कारण वरील प्रमाणेच दिसते. हे संदर्भ ब्राह्मणांना सोयीचे नाहीत, म्हणून तुम्हाला ते नको आहेत.
ब्राह्मणांसाठी जे सोयीचे तेवढेच घ्यायचे; गैरसोयीचे आहे ते गाळायचे, असे धोरण तुम्ही स्वीकारले आहे. आमची एकच विनंती आहे की, विकिपीडियाला अशा प्रकारे गाळीव इतिहासाचे माध्यम बनवू नका.
brurthari१५:४३, २७ सप्टेंबर २०१३ (IST)
- नमस्कार भृतहारी,
- पुस्तकातील माहिती किंवा लेखन हे काही अंशी तरी समसमीक्षित असते. एकदा छापलेले पुस्तक सहजासहजी बदलता येत नाही. ब्लॉग आणि पुस्तक यांतील फरक न कळणे (किंवा न कळण्यासारखे दाखवणे) हाच गमतीशीरपणा म्हणता येईल.
- खेरांच्या पुस्तकातील संदर्भ मी कधी काढले ते मला दिसत नाहीत. असल्यास अनवधानाचे असणार. कृपया ते दाखवल्यास मी ते पुनर्स्थापित करतो किंवा तुम्ही केलेत तरी हरकत नाही. तुम्हाला सावरकर.ऑर्ग संकेतस्थळावरील माहिती काढावयाची असल्यास खुशाल काढा. उगाचच या संकेतस्थळ किंवा माझ्यावर खोटेनाटे आरोप करू नका.
- मी येथे अनेक लेखांत बदल केलेले आहेत यात जात-पातीचा विचार मी केलेला नाही हे उघड आहे. तुम्ही मात्र याचसाठी येथे येऊन लेखन करीत आहात हे सुद्धा उघड आहे. गरज नसताना जात-पात काढणे हा तुमचा खोडसाळपणा पुन्हा एकदा दिसून येत आहे.
- मी पुन्हा एकदा तुम्हाला विकिपीडिया तसेच इतर संदर्भसंकेतस्थळे कशी असतात याबद्दलची माहिती गोळा करण्यास विनंती करतो.
- अभय नातू (चर्चा) ००:३२, २८ सप्टेंबर २०१३ (IST)
:: गरज नसताना जात-पात काढणे हा तुमचा खोडसाळपणा पुन्हा एकदा दिसून येत आहे.
- मी पुन्हा एकदा तुम्हाला विकिपीडिया तसेच इतर संदर्भसंकेतस्थळे कशी असतात याबद्दलची माहिती गोळा करण्यास विनंती करतो.
महत्वाचा मुद्दा असा आहे की जे किंवा तत्सम सदस्यांचा खोडसाळपणा काही लोकांना कधीच दिसत नाही.
खोडसाळपणा जर एका प्रकारची गाळणी वापरूण जर सदस्य / प्रचालक / प्रशासक ठरवणार असतील तर धन्य आहे.
विकिकरण (चर्चा) २३:३६, २ ऑक्टोबर २०१३ (IST)
खरा इतिहास जनते समोर यावा
[संपादन]अभय नातू व तत्सम मंडळी त्यांना न आवडणा-या बाबी वारंवार वगळतात, हा आरोप नाही तर वास्तव विधान आहे....ह्या मंडळी मुळे मराठी विकीवरचा विश्वास डागळलेला आहे....त्याच्या कडे मोठो पद असल्याने ते इतरांची मुस्कटदाबी करतात... हा सुद्धा माझा आरोप नाही तर वास्तव विधान आहे....असो.....त्यांचे...उत्तर तयार असेलच...मला वाद नाही घालायचा.....कोंबड झाकलं म्हणून काय ही माहीती लपणार आहे.... जय शिवराय
- आरोप करण्याआधी तुम्ही म्हणत असलेले बदल आणि त्याच्या आजूबाजूचेही बदल तपासावे ही विनंती. आपले वास्तव कितपत वास्तव आहे हे सुद्धा पडताळावे. आरोप करुन त्याला माझे वास्तव म्हणणे व नंतर मला वाद घालायचा नाही अशी मल्लीनाथी करणे हे काही बरोबर नाही. असो. तुमचा मुद्दा तुम्ही मांडलात, माझा मी मांडला. आता इतर ठिकाणी जे काही योगदान द्यायचे ते देउयात.
- कोंबडं झाकले तर माहिती लपणार नाहीच मग येथील संपादकांवर कशाला उगीच चिखलफेक? उजाडायचे तेव्हा उजाडेलच.
- अभय नातू (चर्चा) ००:५५, १ ऑक्टोबर २०१३ (IST)
सदस्य:brurthari यांच्या संदेशाचा अंशत: भाग
[संपादन]सदस्य:brurthari यांच्या, संपादन गाळणीतून काही कारणांनी अडवला गेलेल्या (वेळ आणि तारीख:१९:२८, २ ऑक्टोबर २०१३) संदेशाचा अंशत: भाग संवाद प्रस्थापीत होण्याच्या दृष्टीने खाली देत आहोत. सर्व सदस्यांनी परस्पर चिटकवणे आणि वगळावगळी करण्याचे टाळून कृपया चर्चा पानावर वाक्यवार घटकवार ज्ञानकोशीय उल्लेखनीयता चर्चा (व्यक्तीगत आरोप करणे टाळून) पुढे न्यावी ही नम्र विनंती आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:३०, २ ऑक्टोबर २०१३ (IST)
कारवाई करा
[संपादन]सदस्य:brurthari यांच्या संदेशाचा अंशत: भाग :
Sainath468 या नावाने त्यांनी मी दिलेले संदर्भ काढून टाकले आहेत. संदर्भ चुकीचे आहेत, असे कारण त्यांनी दिले आहे. चुकीचे आहेत, म्हणजे काय आहे? ते अस्तित्वात नाहीत का? मी भा. द. खेर यांच्या पुस्तकातील पान क्रमांकासह संदर्भ दिले आहेत. हवे असल्यास पुस्तकाच्या पानांच्या फोटोकॉपीही येथे देऊ का?
टिळक लेखातून वारंवार वगळलेले मुद्दे
[संपादन]टिळकांची दलित विरोधी पत्रकारिता
[संपादन]प्रा.रवींद्र तहकिक
केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक....या माणसाला नेमकी काय उपमा द्यावी ? सावरकराना प्र के अत्रे यांनी एकदा " काचेच्या कपाटातील सिंह " असे म्हटले होते स्वतः हस्तिदंती मनोर्यात सुरक्षित राहून समजा मध्ये असंतोष निर्माण होयील विशेषतः तरुणाची डोकी भडकतील अशी विधाने करणे, लिखाण करणे आणि त्यांना भरीस पाडून त्यांच्या हातून विध्वंसक घटना घडवून आणणे ही एक विशेष पद्धत असते. टिळक , सावरकर आणि त्या नंतर बाळ ठाकरे ही या अशा समाजात असंतोषाचे विष पसरवणाऱ्या प्रवृत्तीची ठळक उदाहरणे. हें स्वतः पुढे होऊन कधीच काही करत नाहीत. यांचा जो काही दम असतो तो सगळा तोंडात. त्या जोरावर हें आपल्या मनातील विध्वंसक प्रवृत्तीला वाट देतात. आपल्या या समाजविघातक विचारला राष्ट्रवादाचे/ धर्माभिमानाचे/ संस्कृती रक्षणाचे गोंडस नाव देतात आणि यावर घाला होत आहे अशी ओरड करीत आपल्या अतिरंजित व भडकाऊ भाषणे आणि लिखाणातून तरुण पिढीची दिशाभूल करून त्यांच्या हातून हत्या / जाळपोळ /दंगली इत्यादी विध्वंसक कृत्य घडवून आणतात भारताच्या राजकीय इतिहासातील या प्रवृत्तीचा जनक कोण असेल तर ते म्हणजे बाळ गंगाधर टिळक !
रँडची हत्यापुण्यात प्लेग ची साथ थेमान घालत होती . हजारो लोक मृत्यूमुखी पडले होते. रोज ही संख्या वाढत होती. प्लेगची साथ ज्या पिसवा मुळे पसरत होती त्यावर नियंत्रण करण्यासाठी जे बाधित आहेत त्यांना औषध उपचार करण्याची आणि घर घरात औषध फवारणी करण्याची गरज होती. परंतु पुण्यातील सनातनी ब्राम्हण सरकारच्या तपासणी आणि फवारणीला विरोध करत होते. आमच्या घरात आणि देवघरात इंग्रज मुद्दाम महार शिपायांना ( महार रेजिमेंट ) घुसवत आहेत आणि आमची घरे भ्रष्ट करीत आहेत आसा कांगावा पुण्यातल्या ब्राम्हणांनी सुरु केला. बाळ गंगाधर टिळक यांनी या आगीत आपल्या भडक आणि चिथावणीखोर अग्रलेखांनी आणखीनच तेल ओतले. " सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? " हा अग्रलेख टिळकांनी राष्ट्रवादी भूमिकेतून लिहिलेला नाही. प्लेगचा उंदिर परवडला, पण महार सोल्जर नको, अशी अत्यंत जातीय भूमिका ब्राह्मणांनी घेतली. या ब्राह्मणांचे नेतृत्व त्याकाळी टिळकांनी आणि त्यांच्या केसरीने केले. केसरीमधून रँडविरोधात ज्वल:जहाल अग्रलेख येऊ लागले. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' हा त्यातलाच एक अग्रलेख होय. या अग्रलेखाचा हा काळा इतिहास दडवून ठेवला जातो. कारण त्यातून ब्राह्मणांचे अडाणीपण आणि जातीयवाद उघड होतो. प्लेग निवारणासाठी झटणा-या रँडच्या विरोधात टिळकांनी इतके वातावरण तापविले की, शेवटी त्यात रँडचा बळी गेला. रँड आणि त्याच्या प्लेगला आळा घालण्या साठीच्या उपाय योजना विरुद्ध टिळकांनी विरोधी बातम्या आणि अग्रलेखांची मोहीमच उघडली होती त्या पैकी हें काही नमुने पहा
प्लेगचे उंदीर बायकांच्या लुगडी-चोळ्यात आहेत काय ? रँड साहेब आणि त्याच्या सरकारने प्लेगच्या उंदरांची एवढी धास्ती घेतली आहे की ते शोधण्यासाठी रँड साहेबाचे आवडते महारसोल्जर आमच्या लेकी बाळींची लुगडी फेडून बघत आहेत. चोळ्या काढायला लाऊन बगलेत गाठ आहे किंवा काय हें चाचपत आहेत. कुणाला ताप असेल तर लगेच त्यांना पालथे निजवून नितंब उघडे करून त्यावर सुया टोचत आहेत. जी आमची ग्रहलक्ष्मी आपल्या पतीच्या शेजेवर देखील शरीरलज्जा संभाळते तिचे असे रस्तोरस्ती होणारे जाहीर वस्रहरण पाहून कुणातरी भीमाचे बाहू स्फुरण पावणार आहेत की नाही ? कुणी तरी या रँड रुपी दुशासानाची छाती फोडून त्या रक्ताने या विटंबित द्रोपादींच्या अवहेलनेचा सूड घेणार आहे की नाही ? इथे एक तरी नर अर्जुन आहे काय ? की सर्व शिखंडी आहेत असे आम्ही समजायचे ?
उंदरा बरोबर गणेशावरही फवारणी रँडसाहेबांच्या फवारणीचा मोर्चा आता आमच्या घरात माजघरात पोहचला आहे , रँडसाहेबाचे लाडके महार सोल्जर पायातल्या खेटरा सगट फवारणीचे धोटे घेवून आमच्या घरात घुसतात. घरातले समान रस्त्यावर फेकून देतात हें कमी म्हणून की काय आमच्या देवघरात घुसून उंदरा बरोबर आमच्या विघ्नहर्त्या गणेशावरही फवारणी करण्या पर्यंत यांची मजल गेली आहे
वरील अग्रलेख कुणी सुज्ञ आणि विचारी माणसाने लिहिला असेल असे वाटते काय ? प्लेग सारख्या भयानक साथीला आटोक्यात आणण्यासाठी सरकारच्या उपाय योजना आणि प्रयत्नांना सहकार्य म्हणून लोकजागृती करण्याचे काम करण्या एवजी टिळकांनी आपल्या लेखणी आणि वृत्तपत्राचा वापर लोकात गैरसमज पसरवन्यासाठी केला यातूनच पुढे चाफेकर बंधूनी रँडची हत्या केली. तापलेल्या वाळूवर ज्या प्रमाणे लाह्या भाजून घेतल्या जातात त्या प्रमाणे तापलेल्या वातावरणात आपला मतलब साध्य करण्यात टिळकांचा हातखंडा होता.
लोकमान्य टिळक
[संपादन]लोकमान्य (?) बाळ गंगाधर टिळक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता ! परंतु इतिहासाचा अभ्यास व संशोधन करीत असताना मी जेव्हा केसरी तील ऑक्टोबर १९०१ मधील अग्रलेख वाचला तेव्हा माझा विश्वास बसला आणि टिळक यांनी राजर्षी शाहू महाराज यांना वेदोक्त प्रकरणात किती त्रास दिला असावा याची प्रचीतीही आली. वास्तविक पाहता टिळक यांची प्रतिमा समाजात किवा भारतात कशीही असो त्यांनी शिवरायांचा अपमान केला हे सत्य मात्र कोणीही लपऊ शकत नाहीत तसेच ते सनातनी कर्मकांड वैदिक पंडितांचे नेतृत्व करीत होते. कदाचित यामुळेच राष्ट्रीय सभेमधून त्यांची हकालपट्टी झालेली असेल. त्यांनी चातुरवर्ण पद्धती मध्ये वैदिक धर्मीय सनातनी लोकांना पाठीशी घालून बहुजनाचा अपमान पदोपदी केला. त्यांना गुलामगिरीच्या खाईत ढकलले हेच वास्तव आहे.
मित्रानो हा लेख एवढ्याकारीतच लिहित आहे कि खुद्द टिळक यांनी शिवाजी महाराजांना शुद्र म्हटले होते तर इतर सनातनी वैदिकांच्या मध्ये अन्य भारतीय बहुजाननप्रती किती द्वेष भरलेला असेल ? विचार करा.
तो अग्रलेख असा :
( ऑक्टोबर १९०१ मध्ये "केसरी" मध्ये " वेदोक्ताचे खूळ" या नावाचे दोन अग्रलेख टिळकांनी लिहिले. त्यातून त्यांनी वेदोक्तातील आपली भूमिका स्पष्ट केली. ती अशी . . . . . )
"या काळात ब्राह्मण व शुद्र असे दोनच वर्ण राहिले असून शिवाजी महाराजही शूद्रच होते. तथापि त्यांच्या कार्यावर मोहित होऊन तत्कालीन महाराष्ट्रातील कर्त्या पुरुषांनी ( म्हणजे वैदिक धर्मीय ब्राह्मणांनी) खास सवलत म्हणून त्यांना क्षत्रियत्व बहाल करून गागाभट्टाच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला ; पण त्या वेळी भोसले घराण्याची सर्व धर्मकृत्ये पुरानोक्तच करावीत अशी परंपरा वैदिक ब्राह्मणांनी घालून दिली होती. हीच परंपरा पाळली गेली पाहिजे. छत्रपती घराण्याशिवाय अन्य मराठे क्षत्रिय नाहीत. सबब त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही . . . ." ( संदर्भ : राजर्षी शाहू छत्रपती ; डॉ जयसिंगराव पवार , पृष्ठ ३५ )
या टिळकांची प्रतिमा वैदिकांनी जशी उभारली तशे ते नाहीतच ! आणि नव्हतेच ! " तेल्या ताम्बोल्यांचे पुढारी" हे असूच शकत नाहीत. त्यावेळीचे वृत्तपत्रे या सनातनी लोकांचीच होती म्हणूनच त्यांनी टिळकांची सोज्वळ प्रतिमा उभी केली. सावरकर प्रमाणेच टिळकांची प्रतिमा डागाळलेली आहे हेच यावरून सिद्ध होते.
भटमान्य : एक धार्मिक युद्ध
[संपादन]"प्रमाणबुद्धिवैदेषु साधनानामनेकता" या वेदवाक्याचा अर्थ सांगताना म्हंटले आहे की "जो वेद प्रमाण मानतो तो हिंदु" या "हिंदू" शब्दाचा सरळ आणि सोपा अर्थ असताना बाह्मणांनी स्वार्थाप्रमाणे त्याचा अर्थ लावला व हिंदूंच्या माथ्यावर वेदोक्त आणि पुराणोक्त हे वेगवेगळे विधी लादून स्वत:चे श्रेष्ठ्त्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.आजही भटजी धर्मकार्यातून "पुराणोक्त विधी करून इतरांना तुच्छतेची वागणुक देतात,धर्मकार्याला बसलेल्या व्यक्तीला चाललेली विधी पुराणोक्त आहे की वेदोक्त आहे याची मुळीच कल्पणा नसते त्यामुळे भटजी सांगेल त्याप्रमाणे तो विधी करत असतो" वस्तुश: जातीभेद हे आर्यांनी समाजव्यवस्था व संरक्षण यासाठीच निर्माण केले.संरक्षणाचे काम करणार्याला "क्षत्रिय", व्यवसाय करणार्याला "वैश्य",सर्वांची सेवा करणार्याला "क्षुद्र" आणि संस्कार करणार्याला "ब्राह्मण" संबोधित असत."चातुर्वण्य मया स्रुष्टं गुणकर्मविभागश:" अर्थात गुणकर्मावर आधारीत आर्यांनी समाजाची रचना केलेली होती.त्यावेळी एकाच परीवारात एक ब्राह्मण तर दुसरा क्षत्रिय ,तिसरा वैश्य तर चौथा क्षुद्र असे.कालांतराने आर्यांच्या मुळ गेतूला बगल देऊन जन्माधिष्टीत समाजव्यवस्था निर्माण करून ब्राह्मणांनी आपले श्रेष्ठ्त्व समाजावर लादले."नंतर सामाजिक व्यवस्थेत मानाचा जो अनुक्रम लागला त्यात दुसर्या क्रमांकाचे स्थान ब्राह्मणांना मिळाले,त्यांना क्षत्रियांबद्द्ल आसुया निर्माण झाली." रावाला खेचल्याशिवाय पंताला वर चढता येणार नाही,हे त्यांनी जाणले.म्हणुनच वरील विचारांचे पालन करून राजर्षींना खेचण्याचे कार्य केले.पण राजर्षी शाहू महाराज शेरास सव्वा शेर होते.निश्चयाचे महामेरू होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात आमुलाग्र क्रांती करणारे प्रकरण म्हणून या "वेदोक्त प्रकरणा" कडे पहावे लागेल.सनातनी ब्राह्मणांनी करवीर राज्यात आपल्या अहंकारी वर्णवर्चस्वाच्या प्रव्रुत्तीमुळे अक्षरश: हैदोस घातला होता."जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ ॥" ही त्यांची विचार व आचारधारा होती.अशा या ब्राह्मणांचे वर्णन महालिंगदासांनी मार्मिक शब्दात केले आहे.
"ऐसा तो ब्राह्मण । म्लेंच्छ होय चौगुण । ऐसा पापिष्ट तेणे । जन पीडीले ॥ तया षटकर्माचा विसर । कारकोनी पडिभर । गायत्री मंत्रांचा अधिकार । थोडा तयासी ॥ दग्धचि बोलणे तेणे । सखा सोईरा मित्र नेणे । लाभावरी तेणे । ठेविले चित्त ॥"
अशा या सनातनी ब्राह्मणांनी उठविलेल्या "वेदोक्त प्रकरण" या वादळात राजर्षी शाहू महाराज जिंकले आणि विरोधकांचा फ़ज्जा उडाला याचा आढावा घेवू. नोव्हेंबर १८९९ मध्ये पंचगंगेवर स्नान करण्यास जात असताना एके दिवशी स्नानाच्या वेळेस मंत्र म्हणणार्या नारायण भटाच्या तोंडून जे मंत्र बाहेर पडत होते ते पुराणोक्त होते,नारायण भट स्वत: आंघोळ करूण आले नाहीत व पुराणोक्त मंत्र उच्चारत आहेत.ही गोष्ठ राजारामशात्री भागवत यांनी महाराजांच्या नजरेस आणली.शाहू महाराजांनी त्या नारायण भटास वेदोक्त मंत्र म्हणण्यास सुनवले.नारायण भटाने "महाराज शुद्र आहेत" असे स्पष्ठ उत्तर दिले.उत्तर प्रत्युत्तरे झाल्यानंतर नारायण भटाने,"धर्मानुसार ब्राह्मण श्रेष्ठ आहेत आणि सर्व शक्तिमान ब्राह्मण समाज तुम्ही क्षत्रिय आहात हे जाहीर करेपर्यंत तुम्ही आमच्या साठी शुद्रच" असे सांगितले.येथुनच वेदोक्त वादास प्रारंभ झाला. महाराजांचा संयम दांडगा होता.विषारी फ़ुत्कार काढणार्या नारायण भटाला त्याच क्षणी चाबकाचे फ़टके लगावले असते तर कोणीही, का ? म्हणुन देखील विचारले नसते.तरीदेखील राजे शांत होते.पण त्यांच्या सोबत असणार्यांची मने क्रोधांनी पेटून उठून,हात शिवशिवत होते."प्रत्यक्ष राजांचा अपमान,आमच्या देवाचा अपमान ? आम्ही या भटाला जिवंत ठेवणार नाही.हा नारायण भट काही सज्जन पुरुष होता असे नाही.नारायण भटाला आणण्यास जेंव्हा सरकारी गाडी जाई त्यावेळी हा भट वारागंगेच्या कुशीत दारूच्या नशेत मस्त होऊन रात्रभर पडलेला असे.अशा या चारित्र्यहिन भटाने एका चारित्र्यसंपन्न,संयमी व सर्व प्रजेला प्रिय असलेल्या राजांचा घोर अपमान करावा,यापेक्षा अन्य घोर पाप तरी हा भट कोणते करणार ? महाराजांची वृती संतांची होती.संत तुकोबारायांच्या शब्दात शाहू महाराजांचे थोरपण उमगते"
"दया,क्षमा,शांती । तेथे देवाची वसति । भूतांची दया । हेचि भांडवल संता ॥"
महाराजांच्या अपमानामुळे संपूर्ण "बहुजन समाज" एक झाला व त्यांच्या मनात ब्राह्मणाविषयी रोष खदखदू लागला.त्यावेळी कोल्हापुर नगरपालिका ब्राह्मणमय होती.पंचगंगेवर ब्राह्मणांसाठी वेगळा घाट राखीव ठेवला होता नगरपालिकेने.महाराजांच्या अपमानाचा बदला घेण्याची वेळ आली.ऑगस्ट १९०० मध्ये बहुजन समाजाने हातात बंडाचा झेंडा घेतला,हा सारा समाज भल्या पहाटे "छत्रपती शिवाजी महाराज की जय,छत्रपती शाहू महाराज की जय,ब्राह्मणांचा धिक्कार असो" अशा आकाशगामी घोषणा देत पंचगंगेवर चालून आला.ब्राह्मणांनी नदीवरून-रस्त्यावरून पळ काढत, घरात घुसून पटापट दारे लावलीत.कोणाचे जाणवे कोठे पडले कोणाचे धोतर कोठे सुटले,कोणाचे उपरणे कोठे उडाले याचा कोणालाच पत्ता नव्हता.या ब्राह्मणांना-भटांना धडा शिकवला पाहिजे, या विचाराने पेटून उठलेला समस्त बहुजन समाज पंचगंगेच्या घाटावर जमा होऊ लागला.ब्राह्मणांसाठी राखीव ठेवलेल्या घाटावरील बोर्ड काढून तोडून टाकू लागला.त्या ब्राह्मणी घाटावर जमलेले मराठा,साळी,कोष्टी,शिंपी,सोनार,दलित सारे एकत्र बघून ब्राह्मण समाज हादरून गेला.बहुजन समाजाला शिव्याशाप देऊ लागला व बायकांसारखे बोटे मोडू लागला.नाहीतर यापलीकडे ते करणार तरी काय ? वेदोक्त मध्ये बाळ गंगाधर टिळक
या वेदोक्त वादात सनातन्यांचा पक्ष घॆऊन टिळक मैदानात उतरले.टिळकांचा "केसरी" शाहू राजांच्या विरोधार भुंकू लागला.२२ आणि २९ ऑक्टोंबर १९०१ च्या केसरीत टिळकांनी "वेदोक्ताचे खुळ" या नावाने दोन अग्रलेख लिहून शाहू राजांवर जहरी टीका केली व सनातनी ब्राह्मणांना जोरदार पाठींबा दिला.टिळकांनी लिहिले "धर्मशास्त्रातील जे प्रसिद्ध आणि सर्वमान्य ग्रंथकार आहेत त्यांच्या मते क्षत्रिय आणि वैश्य हे वर्ण पूर्ण नष्ट झाले आहेत व फ़क्त ब्राह्मण आणि शुद्रच अस्तित्वात आहेत.टिळकांनी शाहू राजांना सरळ सांगितले की "तुम्ही खुशाल स्वत:ला उच्चवर्णीय समजा,परंतू तुम्ही शुद्रच आहात".टिळकांच्या या म्हणण्यामागे परशुरामाने २१ वेळा प्रुथ्वी निक्षत्रिय केली त्यामुळे प्रुथ्वीवर क्षत्रिय शिल्लकच उरले नाहीत हे ब्राह्मणांचे आवडते तत्वज्ञान होते.तसेच एका पुराणार म्हंटले आहे की, "ब्राह्मणा: क्षत्रिया वैश्या:शूद्रा वर्णास्त्रयो द्विजा:।
युगे युगे स्थिता: सर्वे कलावाद्यंतयो: स्थितीरिति: ॥" अर्थात: ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य़ आणि शूद्र हे चार वर्ण आणि यातील तीन आर्य वर्ण सर्व प्रत्येक युगात असतात, पण कलीमध्ये पहिला आणि अखेरचा असे दोनच वर्ण राहतात. बाळ टिळकांनी वेदोक्ताची मागणी करणार्या मंडळींची हवी तशी टिंगल आणि उपहास करण्यासाठी आपली लेखणी झिजवली."अलिकडे इंग्रजी विद्येने व पाश्चात्य शिक्षणाने सुसंस्क्रुत झालेल्या मराठा मंडळींच्या मनात जी काही खूळे शिरली आहेत,त्यापैकी वेदोक्त कर्माचे खूळ हे होय." बाळ टिळकांनी आणखी एक युक्तिवाद पुढे केला."वेदोक्त मंत्र म्हंटल्याने कोणत्याही जातीस आधिक श्रेष्ठपणा येतो अशी जर कोणाची समजूत असेल तर ती चुकीची आहे.वैदिक मंत्रांनी संस्कार झाले म्हणजे मराठे आणि ब्राह्मण एक जातीचे होतील अशी जर कोणाची कल्पना असेल तर तिही निरर्थक आहे.वेदोक्त मंत्र म्हंटले तरी मराठे हे मराठेच राहतील,हे लक्षात ठेवले पाहिजे." असे म्हणुन बाळ गंगाधर टिळकांनी मराठ्यांना क्षत्रिय मानण्यास विरोध केला.
कमिशनची नियुक्ती
[संपादन]टिळकांनी ब्राह्मणांची बाजू उचलून धरल्यामुळे या "वेदोक्त" प्रकरणाला उलटी कलाटणी मिळण्याचा संभाव्य धोका ऒळखून महाराजांनी या वेदोक्त प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका हुकुमान्वये न्यायमुर्ती पंडीतराव गोखले,न्यायमुर्ती विश्वनाथराव गोखले व खुद्द आप्पासाहेब राजोपाध्ये या तिघांचे एक कमिशन नेमून त्यांना अहवाल सादर करण्याची आज्ञा दिली.तसेच हे तिघेही ब्राह्मण होते तरी त्यातील पंडितराव गोखले हे निस्प्रुह,विद्वान व नि:पक्षपाती होते.
१६ एप्रिल १९०२ रोजी कमिशनने आपला अहवाल महाराजांना सादर केला.त्या अवहालात नमुद करण्यात आले होते की,"रुद्राभिषेक होत असे याचा अर्थ ज्यांची ही देवस्थाने होती ते द्विज वर्गातील आहेत.म्हणजे छत्रपती हे क्षत्रियच आहेत."या अहवालावर अखेरपर्यंत राजोपध्ये यांनी सही केली नाही.हा राजोपाध्येदेखील नारायण भट्टाचा दुसरा अवतार होऊन त्याने आपला थयथयाट चालू ठेवला.पण त्याकडे दुर्लक्ष करून द्विज वर्गातील म्हणजेच वेदोक्ताचा अधिकार असलेले शाहू छत्रपती हे क्षत्रिय आहेत असा निर्वाळा कमिशनने दिला. या वेदोक्त प्रकरणाची एकूण फ़लश्रुती शोधताना एका महत्वाच्या गोष्टीकडे नेहमीच दुर्लक्ष होत आलेले आहे.तिची स्पष्ट नोंद इथे करणे योग्य ठरेल.वेदोक्त प्रकरणात एकूण न्याय शाहूराजांच्या बाजूने होता.त्यांनी हा न्यायाचा लढा मोठ्या जिद्दीने लढविला.अखेर न्याय आणि आपला वेदोक्ताचा अधिकार त्यांनी प्रस्थापित करून घेतला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसारखा एक थोर माणूस समाजाला जाग आणावी,म्हणुन धडपडत होता.वेदोक्त आणि पुराणोक्तच्या फ़ाटक्यात पाय अडकलेला ब्राह्मण वर्ग तर त्यांना विरोधक म्हणुन उभा राहिलाच.पण त्या द्रुष्टीने वेदोक्त प्रकरणात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा संपूर्ण विजय झाला.ब्राह्मण वर्चस्वाचा (अगदी टिळक आणि टिळककंपुंसकट) संपूर्ण पराभव झाला.
संदर्भ ग्रंथ : राजर्षी शाहू गौरव ग्रंथ
शाहुंच्या आठवणी (प्रा.नानासाहेब सांळुंखे,मराठा भुषण)
राजर्षी शाहू चरित्र (श्री.ग.क्रु.कुर्हाडे —
बाळ गंगाधर टिळक"लोकमान्य" नाहीतच!
[संपादन]बाळ गंगाधर टिळक हे खरेच "लोकमान्य" होते का? इतिहासाची पाने तर काही वेगळेच सांगतात. टिळकांनी देशसेवेचा चक्क धंदा केला. टिळक हे अत्यंत गरीब होते . जत्रेत टिळा लाऊन त्यांचे पूर्वज गुजराण करत त्यावरून त्यांचे नाव टिळक पडले. कर्मदरिद्री टिळक जनतेची संपत्ती हडप करून अब्जोपती झाले.. टिळक मेले त्यावेळी कुटुंबासाठी अब्जावधीची संपत्ती सोडून गेले. टिळकांचे नातू जयवंत टिळक यांनी "मी जयवंत टिळक " या पुस्तकात संपतीचा तपशील दिला आहे." लोकमान्यांनी आपल्या मृत्युपत्रानुसार आपला वाडा, सिंहगडावरील बंगला, लातूरची जिनिंग, गीता रहस्याचे हक्क, विम्याचे पैसे, भरपूर दागिने वगैरे मालमत्ता मुलांना दिली होती. वाड्यातील केसरीच्या भागाचे भाडे ,विम्याचे पैसे या खेरीज आपल्या मुलांना दरमहा २०० रुपये मिळतील अशी सोय केली होती" महाराज सयाजीराव गायकवाड यांनी राहायला दिलेला गायकवाड वाडा टिळकांनी हडपला. वर्तमान वारसदारांनी त्याचे नाव बदलून टिळक वाडा असे केले आहे .तानाजी मालुसरे या मर्द मावळ्याने बलिदान देऊन सिंहगड जिंकला त्यांचे वंशज आज गडावर ताक आणि दही विकून जगतात.टिळकचा बंगला सिंहगडावर आहे. जनतेची संपती हडप करणारा , वैदिक ब्राम्हणी परंपरेचा कट्टर पुरस्कर्ता असलेला, शिवरायांची टिंगल करणारा, स्त्री शिक्षणाच्या विरोधात असलेला बाळ गंगाधर टिळक कोणी "लोकमान्य" ठरविला ? या टिळकाचा असली चेहरा का समोर आला नाही? याच टिळकाने"कुणबटांना लोकसभेत नांगर हाकायचं काय? वाण्यांना काय तागडी धरायची काय? माळ्यांना काय फुल लावायची काय?" असे प्रश्न विचारले होते. परंतु आपल्या अभ्यासक्रमात त्याच्या बद्दल "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच" हे शिकविले जाते. तो कोणाच्या स्वराज्याची मागणी करीत होता हे यातून स्पष्ट होते. प्रबोधनकारांनी तर या टिळकला चक्क कुत्रे म्हटले आहे . पहा काय म्हणतात प्रबोधनकार . "ज्यांना ज्यांना हरिभक्तपरायण ठरविले ते ह.भ.प. मग ते शुक्रवारपेठेत त्रिकाळ फेरफटका करणारे वारयोशिता परायण असले, तरी त्याबद्दल कोणी ब्र ही काढता कामा नये. त्यांनी एखाद्याला देशभक्त ठरवल्याशिवाय तो दे.भ. असणे किंवा होणेच शक्य नाही; मग जातीने तो कितीही नीच दानतीचा आणि कवडीमोल अकलेचा असला तरी हरकत नाही. जसे किस्ती होण्यासाठी जार्डन नदीच्या पाण्याचा "कुरूस" छातीवर व टाळक्यावर पाद्री भटाच्या हातून काढून घ्यावा लागते, त्याप्रमाणे ज्याला देशभक्त व्हायचे असेल त्याने पुण्याच्या राष्ट्रीय शुक्रवार क्लबच्या थालेपीठ भजांची दीक्षा घेऊन महिना पंधरा दिवस तेथील कचोपकचांची शागिर्दी केली कि बस्स ! तत्काळ तो दे. भ. बनतो. विद्वतेची, देशभक्तीची, सुधारणेची वैगरे सर्व गोष्टींची ताम्रपते येथून मिळाल्याशिवाय जगात- म्हणजे महाराष्ट्रात कोणीही मानवाचा कारटा विद्वान देशभक्त आणि निष्काम कर्मयोगी निपजुच शकायचा नाही. असा एक अलिखित कायदा झाला आहे. या कायद्याला विरोध करून कोणी आपली स्वतंत्र बाण्याची मते प्रतिपादन करू लागला तर त्याचे वाभाडे काढायला आमचे "पुणेकर केसरी" महाराजसुद्धा आपले सिंहाचे भाडोत्री कातडे व मुखवटा पार फेकून देऊन, लूत लागून पिसाळलेल्या कुत्र्यासारखे भुंकू लागतात. मग त्यांच्या प्रभावलीतल्या पोसलेल्या गर्दभांच्या लाथा दुगाण्यांचा खडखडाट आणि धडपडाट काय वर्णन करा? स्वतःच्या हातात दर्भाइन काही सत्ता नसताना हे भिशुकशाहीचे पुणेरी भूत आपल्या राष्ट्रीय गुंडगिरीचा धिंगाणा घालताना जर ढुंगणाचे सोडून डोक्याला गुंडाळायला कमी करीत नाही, तर उद्या खऱ्याखोट्या लोकशाहीच्या कॉन्सिलात यांच्या प्राबल्याची शीग जर उंची वर चढली तर ते सर्वांच्या डोक्यावर मिरे वाटून विसाव्या शतकात पुनश्च पेशवाई पाट्यावरवांठ्याचा जीर्णोद्धार कशावरून करणार नाहीत, याची हमी कोणत्या विमा कंपनीने घेतली आहे ? (भिशुक शाहीचे बंड मूळ आवृत्ती पृष्ठ ५० - ५१ )
टिळकांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- आर्क्टिक होम ऑफ वेदाज
- ओरायन
- गीतारहस्य
टिळकांनी लिहिलेल्या गीतारहस्य या पुस्तकाचा नवा अवतार A Modern Interpretation of Geeta Rahasya हा अरुण तिवारी यांनी ग्रंथरूपात सादर केला आहे, त्याचे प्रकाशन लखनौ येथे २९-१२-२०१७ रोजी झाले. ... ज (चर्चा) ००:५५, १ जानेवारी २०१८ (IST) https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95&action=edit§ion=16