चर्चा:भदंत आनंद कौसल्यायन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

येथे भदंत हे नाव आहे कि पदवी? पदवी असल्यास ती शीर्षकात असू नये.

अभय नातू (चर्चा) ०८:२०, १ जून २०१७ (IST)[reply]

भदंत आनंद यांना मिळालेली प्रारंभी पदवी ही नंतर त्यांनी नाव म्हणून स्विकारलेले दिसते. बौद्ध धम्मात एखाद्या व्यक्तीने प्रव्रज्या धारण करून भिख्खु झाल्यावर मूळ नावाची शक्यतो त्यांची ओळख राहत नाही. त्यांची सर्व पुस्तके व अगदी "इंग्रजी हिंदी सह सर्व विकीपिडियावर" त्यांचे नाव भदंत या नावाने असल्याचे दिसते. म्हणून सदर लेखात भदंत शिर्षक असू द्यावे असे वाटते.

प्रसाद साळवे   १०:०४, १ जून २०१७ (IST)[reply]
हे (भदंत) व भंते बौद्ध धर्मातील आदरसूचक विशेषण आहे. जसे आपण 'महाराज' किंवा 'आदरणिय' या शब्द वापरतो त्या अर्थाने.जसे इंग्रजीत रेव्हरंड हा शब्द वापरतात.याचा दुसरा अर्थ पितृतुल्य असाही होतो. कृपया हा दुवा बघावा ही विनंती.--वि. नरसीकर (चर्चा) १०:३७, १ जून २०१७ (IST)[reply]

विशेषणे व पदव्या शीर्षकांत असू नयेत - उदा. पंडित भीमसेन जोशी, ग्यानी झैल सिंग, उस्ताद झाकिर हुसेन, इ.

अभय नातू (चर्चा) १९:४६, १ जून २०१७ (IST)[reply]