Jump to content

चर्चा:बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचार

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@Salveramprasad: @संदेश हिवाळे: ह्या लेखाच्या विकासासाठी वेळ काढता आल्यास पाहावे हि विनंती.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:२७, २४ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

@Mahitgar: नक्कीच सर, हा लेख लवकरच संपादित करून विकसित करू..प्रसाद साळवे ०८:४२, २४ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
@Mahitgar: हो सर नक्कीच, हा संपूर्ण लेखाच्या विकासासाठी आजपासूनच संपादन सुरू करतो. संदर्भ ही जोडतो.

संदेश हिवाळे (चर्चा) ०९:१०, २४ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

प्रताधिकार भंग

[संपादन]
@Sureshkhole आणि अभय नातू:

सुरेश यांनी हा लेख पूर्ण लेख प्रताधिकार भंग म्हणून घोषित केले आहे. हे लेख अखेर १० ऑगस्ट २०१७ ला संपादन केले होते. व संकेतस्थळ वर ११ ऑक्टोबर २०१७ स्पष्ट लिहिले आहे. मग हा प्रताधिकार भंग कसा? अभय नातू याची नोंद घ्यावी कारण हे प्रताधिकार भंग आहेतच नाही. विकिपीडिया वरून संकेतस्थळावर मजकूर गेले आहे तो आलेला नाही. कृपा प्रत्येक वेळी साचा लावताना याची खात्री घ्यावी. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २३:११, १३ एप्रिल २०१८ (IST)[reply]


माझी नजरचूक शोधल्याबाबत धन्यवाद, मी बाकीची पानेही ह्या चुकीसाठी तपासतो. WikiSuresh (चर्चा) २३:४७, १३ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@Sureshkhole, अभय नातू, आणि Tiven2240:

सुरेश खोले व त्यांचे सुधारक साथी सुधारणेच्या नावाखाली केवळ आंबेडकर संबंधित लेखाला प्रताधिकार साचा लावून लेख विद्रूप करून बदनामी करत आहेत. व त्यांनी विद्रुपीकरण कालावधी चौदा एप्रिल च्या आसपास च्या दिवसातील निवडला आहे हे विशेष कारण चौदा एप्रिल च्या काळात जगभरातील अनेक वाचक हा लेख वाचत असतात. व त्या काळातच त्यांना हा खोडसाळ पणा सुचत आहे. अशी नजर चूक त्यांच्याकडून इतर लेखात होणे शक्य नाही. तसेच प्रताधिकार भंग अथवा नकल डकव मराठी विकिपीडिया वर हजारो लेख आहेत. पण त्यांना आंबेडकरी लेखच सध्या दिसत आहेत. असो त्यांनी लेख विद्रूप केला तरी त्यात सुधारणा होत राहतीलच अशा सुधारणेस प्रारंभ केल्याबद्दल खोले यांचे आभार; कारण लेख नकल डकव नसावाच मी देखील याच मताचा आहे. सुरेश खोले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा प्रसाद साळवे (चर्चा) ००:०७, १४ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@Tiven2240, Sureshkhole, आणि प्रसाद साळवे:,
सदस्य sureshkhole यांच्या मनात काय आहे हे तेच सांगू शकतात, मी नाही.
प्रताधिकारभंग हा विषय गंभीर आहे यात कोणाची सोय, गैरसोय बघितली जाणार नाही.
जर एखादा लेख मोठ्या प्रमाणात वाचला जाणार असेल तर अशा लेखाची तपासणी होणे अत्यावश्यक आहे. यातील प्रताधिकारभंग असल्याची शंका दूर करण्यासाठी त्यात योग्य त्या सुधारणा लगेच केल्यास हा लेख पुन्हा वाचनीय होईल.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ००:१३, १४ एप्रिल २०१८ (IST)[reply]
ता.क. माझ्या वैयक्तिक मतानुसार sureshkhole यांनी बाबासाहेब आंबेडकर विषयक लेखात अनेक सुधारणा केल्या आहेत. यासाठी त्यांनी प्रसंगी इतरांशी चर्चा करुन आपली मते मांडली आहेत. असे असता त्यांनी हे मुद्दाम बदनामी, विद्रुपीकरण (तुम्ही वापरलेले शब्द) करण्यासाठी केलेले नसावे असे वाटते. अर्थात, पुन्हा एकदा - हे माझे मत आहे आणि sureshkhole यांच्या मनातील मी ओळखू शकत नाही.
@अभय नातू::::sureshkhole यांनी बाबासाहेब आंबेडकर विषयक लेखात अनेक सुधारणा केल्या आहेत. या मताशी मी सहमत नाही. कारण त्यांनी आतापर्यंत बाबासाहेब आंबेडकर लेखात चार शब्द सोडले कि [ संदर्भ हवा ] साचा जोडला. परंतु मजकुरात सुधारणा केल्याचे कधीच दिसले नाही. माझ्या अंदाजाने त्यांनी शंभरेक [ संदर्भ हवा ] साचे सदर लेखात लावले होते. अध्यापही लेखाच्या काही विभागात ते आहेतच. ते केवळ याचा लेखात तसे करत नाहीत हे भासवण्यासाठी(नाटक म्हणून) विनायक दामोदर सावरकर लेखात त्यांनी कितीवेळा [ संदर्भ हवा ] साचा लावला आहे हे पाहावे. तेथे चर्चा पानावर मी उपहासात्मक लिहिले देखील आहेच. sureshkhole यांच्या मनातील मी ओळखू शकत नाही. हे हि खरेच. हि सुधारक बुद्धी त्यांना विकिपीडिया वरील प्रत्येक लेखात त्यांचा परमेश्वर त्यांना देवो. प्रसाद साळवे (चर्चा) ००:३८, १४ एप्रिल २०१८ (IST)[reply]
@प्रसाद साळवे:,
तुम्ही माझ्याशी सहमत नाही हे कळले. त्यास इलाज नाही. असो.
अभय नातू (चर्चा) ००:४३, १४ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@प्रसाद साळवे:,@अभय नातू:

  • सुरेश खोले व त्यांचे सुधारक साथी सुधारणेच्या नावाखाली केवळ आंबेडकर संबंधित लेखाला प्रताधिकार साचा लावून लेख विद्रूप करून बदनामी करत आहेत. प्रताधिकार भंगाच्या कारवाईने गांगरुन न जाता, आपल्या कर्माच्या फ़ळांना सामोरे जावे असा फ़ुकटचा सल्ला मी आपल्याला देऊ इच्छीत आहे. शिवाय हा माझ्यावर वैयक्तिक आरोप केला जात आहे याची प्रचालकांनी नोंद घ्यावी. लेख विद्रुप कोणी केले हे प्रताधिकार भंग अहवालांमधून स्पष्टपणे समोर येत आहे, आपण त्याकडे लक्ष दिल्यास आणि विकीच्या नियमांचे पालन करायला सुरूवात केल्यास मला आनंद होईल. शिवाय मी आणि माझे साथी? हे कोण आहेत बुवा? माझ्या हातात जर एखादी टोळी असती तर मी त्यांना एखाद्या माझ्या फ़ायद्याच्या कामाला लावलं असतं. विकीपिडीयावर टोळी बनवून आणि इथे त्यांना कामाला लावून मला काय ढेकळं मिळणार आहेत?
  • पण त्यांना आंबेडकरी लेखच सध्या दिसत आहेत. [ संदर्भ हवा ], आणि मी फ़क्त आंबेडकरी लेखानांचा साचे लावले की, सर्वच पानांना जिथे मला प्रताधिकार भंग होत आहे हे जाणवले तिथे लावले ते आपण माझ्या संपादनांच्या इतिहासात स्पष्ट पाहू शकता. शिवाय बाबासाहेब आंबेडकर मध्ये सध्या दिसणारे सर्व संदर्भ सायटोईड वापरुन मी लिंक्सवरून संदर्भात रुपांतरीत केलेले आहेत हे विसरू नका, हे इतिहासात आपल्याला पाहता येईलच, शेवटी पुन्हा पुन्हा माझी संपादने उलटवली गेल्याने कंटाळून मी त्या लेखात संपादन करणे सोडून दिले आहे.
  • संदर्भ हवा हा साचा जिथे संदर्भ हवा आहे तिथे लावला जातो, हा जगभरातल्या सगळ्या विकीचा नियम असताना, त्याला आपण म्हणता ते लेख कसे अपवाद असू शकतील? मी अनेकदा म्हणले आहे की, हा विश्वकोश आहे निबंधस्पर्धा नाही. त्यामुळे प्रत्येक विधानाला संदर्भ हवाच(त्यातही जर आपण अतिशयोक्तीपुर्ण विधाने करत असाल तर त्याला तर संदर्भ हवेतच.), जर आपण तो देऊ शकत नसाल तर विधान काढले जाते. हे सर्वच विकीवर होते मराठी विकी त्याला अपवाद कशी असेल?
  • माझ्या मनात काय आहे, आपल्याला जाणायचे आहे हे वाचून माझे डोळे तृप्त झाले आहेत.
  • मुळातच, बाबासाहेब आंबेडकर, सावरकर, कोकणस्थ ब्राह्मण, हेडगेवार,आनंदऋषीजी, अमरदास बाबा, गुंडाचा गणपती, पु.ल देशपांडे, जयेंद्र सरस्वती, संभाजी भिडे(ही यादी फ़क्त काही लेखांची आहे, आपण इतिहास तपासल्यावर मी काय केलयं हे कळेल आपल्याला.) या लेखांवर काम करताना मला लक्षात आले की, संदर्भ देऊन लिखाण होत नाहीये शिवाय नकल-डकव केल्यामुळे लोक मुळ स्त्रोतांचे संदर्भ देत नाहीत(संदर्भ दिला तर पितळ उघड होईल की?). शिवाय सावरकर लेखाच्या धर्तीवर आंबेडकर हा लेख उभा राहिला असल्याचे दोनही लेखांचा इतिहास पाहिल्यास समोर येते. तसेच कोकणस्थ पानावरून इतर जातींची भयंकर पाने तयार केली गेल्याची दिसली आहेत. सध्याचे कोकणस्थ पान पाहिल्यास ते त्याच्या इतिहासात(माझ्या सध्याच्या संपादनांमुळेच) सर्वात उत्तम अवस्थेत असल्याचे शेमड्या पोरालाही कळेल.
  • त्यामुळे एकूण परिस्थीतीचा विचार करता मी काय केले हे आपल्याला माझ्या संपादनांचा इतिहास निट पाहिल्याशिवाय कळणे कठीण आहे. मी आधी सायटोईड मराठीवर आणण्यासाठी धडपड केली आहे आता नकल-डकवचे धोरण आणण्याचा प्रयत्न होत आहे. आपल्याला जर मराठी विकीची दयनीय स्थिती सुधारायची असेल तर ह्या गोष्टी आवश्यक आहेत.
  • आता हे आत्ताच का झाले? याला काहीही उत्तर नाही, मी सध्या तुलनेने मोकळा होतो आणि मी काम करु शकलो त्यामुळे आता झालं इतकं साधं सोपं उत्तर ह्या प्रश्नाला आहे.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर आपण इतकाच वेळ, आंबेडकरांचे मुळ लिखाण विकीस्त्रोतावर आणण्यासाठी आणि त्यांच्या सिध्दांतांवर, पुस्तकांवर, इतर दलित आणि स्त्रीवादी व्यक्तीं आणि सिध्दांकनावरच लिखाण जर इथे आणायला घालवला असता तर किती बरे झाले असते? असो हरकत नाही, माझा हा आत्ताचा लेखनप्रपंच मी माझ्या लाडक्या भीमाईला अभिवादन करुन थांबवतो. जय भीम! WikiSuresh (चर्चा) ०३:१८, १४ एप्रिल २०१८ (IST)[reply]
मी साचा काढला आहे चर्चेसाठी धन्यवाद --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०५:४२, १४ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@Tiven2240: आपल्या मदतीबद्दल धन्यवाद, आता जवळपास मी जितक्या ठिकाणी प्रताधिकार भंग शंका साचा लावला होता तेथे, नकल-डकवच्या स्त्रोताची दिनांक व वेळ आणि लेखाची दिनांक वेळ यांच्या पडताळणीचा अहवालही टाकला आहे. तो पाहून @अभय नातू: पुढील कारवाई करु शकतील. आत्ता पर्यंतच्या प्रताधिकार भंगामध्ये जे दोषी सापडले आहेत त्यांवर योग्य ती कारवाई करणे त्यांना सोपे जाईल, अशी आशा. WikiSuresh (चर्चा) ०६:०४, १४ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@Sureshkhole: आपण बाबासाहेब आंबेडकर मध्ये केवळ संदर्भ सायटोईड वापरुन लिंक्सवरून संदर्भात रुपांतरीत केलेले आहेत, मात्र या लेखाला मोठा आवाका व सुधारासंबंधी आवश्यकता पाहून हे तुमचे हे कार्य अगदी अत्यल्प वाटते. लेखात [ संदर्भ हवा ] वापरल्याने आपण लेख सुधारल्याचा ग्रह करून घेवू नये. आपण चूकीची संपादने करत असल्याचे लक्षात आल्यावरच आपली संपादने हटवली गेलीत, कृपया हे लक्षात घ्या. प्रसिद्ध वर्तमानपत्रांचे वैध संदर्भ जोडलेले असतानाही आपण त्या संदर्भांना अवैध ठरवून आम्हाला कंटाळून टाकले. लोकमतने प्रसिद्ध केलेल्या विडिओला बनावट म्हणत त्याची तुलना आपण ट्रम्प तात्या या मराठी विनोदी (बनावट) विडिओंशी केली आहे. आपण बाबासाहेब आंबेडकर लेख सुधारणाचा नावाखाली मनामध्ये अनेक चूकीची धोरणे अवलंबित.--संदेश हिवाळेचर्चा ११:३३, १४ एप्रिल २०१८ (IST)[reply]