चर्चा:नोटा (मतदान)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखाचे शीर्षक मतदानातील (abstain) पर्याय असावे. Abstain साठी चपखल मराठी शब्द सुचवावा ही विनंती.

नकाराधिकार हा शब्द veto साठी वापरला जातो, ज्याद्वारे असलेल्या प्रस्तावास मंजूरी मिळणे अशक्य होते. असा अधिकार निवडक मतदारांकडेच असतो व एकही नकाराधिकार वापरला गेला असता प्रस्ताव फेटाळला जातो.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २२:०८, ६ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

  • मला नोटा हा शब्द प्रयोग योग्य वाटतो. राज्य डणूक आयोगाने तो शब्द स्विकारलेला आहे. तसेच जनताही त्याला नोटा नावाने ओळखत आहे. प्रसाद साळवे २२:२१, ६ फेब्रुवारी २०१७ (IST)
नोटा (मतदान)? (मतदान) असे घातल्याने नोटच्या बहुवचनाशी गल्लत होणार नाही.
अभय नातू (चर्चा) २२:३८, ६ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
abstain चा काहिसा अर्थ 'refrain from' च्या सारखाच पासून विलग होणे, अलिप्त राहणे वर्ज्य करणे असा सहसा राहतो. मतवर्जन (मत टाकणे वर्ज्य करणे) हा बरोबर राहिल काय? मी 'मतदान नकारायचा अधिकार' या अर्थाने वापरला होता. voting साच्यात मी नोटा असा टाकलाच आहे.

--वि. नरसीकर (चर्चा) ०९:४३, ७ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

En:None of the above#India पहा यात महत्वपूर्ण गोष्टी आहेत Nota(नोटा) याचा अर्थ आहे NONE OF THE ABOVE यात मतदान होते परंतु उमिद्वाराला मत मिळत नाही तर मतदान न करण्याचा अधिकार कसा झाला? कारण मतदान होत यात जर मी चुकलू असेल तर ते समजावे कारण मी या महिन्यात माझा पहिला मतदान करणार आहे तर मला हे काम येणार 😀 --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०९:५६, ७ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

नकाराधिकार, अलिप्तता, तटस्थता या सर्वच शब्दांना मराठीत एका पेक्षा अधिक अर्थ आहेत लेख शीर्षकासाठी एकही नेमका होत नाही. 'उपरोल्लेखीत पैकी एकही नाही' हेच नेमके आहे पण त्याचे शीर्षक कसे बनवणार ?
117.195.59.199 १२:२२, ७ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
abstain चा काहिसा अर्थ 'refrain from' च्या सारखाच पासून विलग होणे,...
बरोबर आहे. abstain येथे चपखल बसत नाही. यातील कोणीच नाही याचे संक्षिप्त याकोना करावे काय? :-) नोटा (nota) हेसुद्धा संक्षिप्त रूपच आहे.
अभय नातू (चर्चा) २०:१७, ७ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]