चर्चा:दिवाळी अंक २०१३

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दिवाळी अंकांच्या किमंती[संपादन]

  • लेखात दिवाळी अंकांच्या किमंती दिल्या गेल्या आहेत.
ज्ञानकोशात ऐतिहासिक परिपेक्षात सर्वसाधारण किमती कशा वाढत/कमी होत आहेत याचा आलेख नमूद करत आर्थीक बाजूंची ज्ञानकोशीय दखल घेता येते. विशिष्ट वस्तूची/मासिकाची सरळ सरळ किमंत नमूद करणे जाहीरात या सदरात मोडणारे,आणि ज्ञानकोशीय आणि विकिपीडिया लेखन संकेतांचे उल्लंघन ठरते.
    • >>अंकाचा विषय/अंकाचे नाव, संपादक, पृष्ठसंख्या आणि किंमत या बाबी विचारात घेऊन वाचक दिवाळी अंकाच्या दर्जाचे अनुमान करतात. त्यासाठी ही माहिती खाली दिली आहे. अंकांची जाहिरात करण्याचा उद्देश नाही.<<
अबकड आणि किंमत या बाबी विचारात घेऊन वाचक हळक्षज्ञच्या दर्जाचे अनुमान करतात मात्र हळक्षज्ञची जाहिरात करण्याचा उद्देश नाही- म्हणजे नेमकं काय ? यात काही विसंगती आहे किंवा कसे. वाचंकांना वस्तु विकत घेण्याचा निर्णय घेता यावा हा ज्ञानकोशाचा हेतु असू शकतो किंवा कसे .
वस्तुत: दिवाळी अंकांच्या मुल्यांच्या चिंते पेक्षा हाच नियम इतर सदस्यांनी इतर हळक्षज्ञ वस्तुंनां लावला तर त्याचा निकाल कसा द्यावयाचा? ज्ञानकोशाच्या परिघाच्या मर्यादा या संदर्भाने काय असावयास हव्यात ?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:०६, १२ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]


नवा परिच्छेद[संपादन]

  • >>इ.स. २०१३ च्या दिवाळी काळात सुमारे १२०० अंक सरकारी दप्तरात रजिस्टर झाले आहेत, ४००हून अधिक एवढे दिवाळी अंक प्रकाशित झाले,
....अंक सरकारी दप्तरात रजिस्टर झाले,...... हून अधिक दिवाळी अंक प्रकाशित झाले . रजिस्टर आणि प्रकाशित हा फरक नेमका कुठून येतो हे समजून घेता येईल काय.शिवाय या दोन्ही घटकांना घटकवार संदर्भाची आवश्यकता आहे.
  • >> परंतु दिवाळी संपल्यानंतर केवळ ३०० अंक बाजारात शिल्लक आहेत, असे दैनिक सकाळचे निरीक्षण आहे. यावरून दर्जेदार अंक कमी असले, तरी दिवाळी अंकांचा खप होत आहे.
(संदर्भ पडताळण्याकरता>> दैनिक सकाळचे निरीक्षण आहे << वृत्ताचा दुवा अत्यंत निकडीचा आहे)
वितरणाच्या क्षेत्रात चहाचा कप आणि तो गळ्याखाली उतरणे यात फार अंतर असत. एकतर ४००हून अधिक हा आकडा नेमका आणि स्पष्ट नाही.प्रत्येकी छपाई किती झाली ते स्पष्ट नाही;जे सर्व प्रकाशित झाले ते सर्व विक्रीकरता बाजारात पोहोचले हा परस्पर निष्कर्षही यथा योग्य नाही. मागच्या काही वर्षांची छपाई आणि यावर्षीच्या छपाईचे आकडे संदर्भा सहित हाती नसताना विकिपीडिया ज्ञानकोशाच्या संपादकांनी स्वत:चा निष्कर्ष जाहीर करणे हितावह आहे का ? व्यक्तीगत मते टाळण्याचा आणि त्रयस्थ संदर्भ नमुद करण्याचा विकिपीडियात आग्रह धरला जातो ते इथे लक्षात घेणे जरूरी आहे.
>>दिवाळी अंकांच्या किमती सर्वसामान्य वाचकांच्या आवाक्याबाहेर आहेत. ग्रंथालय सभासदांकडून दिवाळी अंकांसाठी आकारलेल्या शुल्कापेक्षा अंकांची किंमत अधिक झाल्यामुळे मेळ जमवणे ग्रंथालयांना कठीण झाले.<< या वाक्यांना एका पेक्षा अधिक त्रयस्थ संदर्भ होते. ते संदर्भ वगळले गेले की हि मत मराठी विकिपीडियाच्या संपादकाची व्यक्तीगत मत वाटू लागतात आणि त्या व्यक्तीगत मतांना खोडण्याकरता >>तरी दिवाळी अंकांचा खप होत आहे<< हे व्यक्तीगत मत नमुद केल गेल आहे असा एकंदरीत भास निर्माण होतो.
प्रत्येक घटकास आणि प्रत्येक ओळीस संदर्भ देणे आणि दिलेले संदर्भ जपणे हे अत्यंत गरजेचे आहे.एखाद्दां संपादकास संदर्भ जोडता येत नाहीत, हि बाजू लेखात दिसू शकत नाही एवढ्या एका कारणावरून ज्ञानकोशाच्या दर्जास बाधा येणे रास्त ठरते का ?प्रत्येक ओळीत संदर्भ देण्यासारखी एखादी गोष्ट आत्मसात करण्याच्या प्रयत्नांची संबंधीत अडचणींची चर्चा करून निराकरण करून घेणे गरजेचे आहे किंवा कसे या बद्दलही विचार केला जावा अशी नम्र विनंती आहे.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:०२, १२ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]

जुना परिच्छेद[संपादन]

  • परिच्छेद पहिला:
  • काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी मासिक मनोरंजनाचा १९०९ मध्ये दिवाळी अंक प्रसिद्ध केला तेव्हापासून दिवाळी अंकाची परंपरा चालू झाली, आजही टिकून आहे. दिवाळी अंकाची पहिली जाहिरात सुगंध मासिकाच्या जुलै वा ऑगस्ट महिन्यात होत असे. मासिक मनोरंजनाच्या दिवाळी अंकाच्या धर्तीवर सर्वच दिवाळी अंकांचा जोर कथा वाङ्‌मयावर असे. सर्वश्री पु. भा. भावे, अरविंद गोखले, गंगाधर गाडगीळ, वि. स. खांडेकर, दि. बा. मोकाशी, माडगुळकरांची थोरली पाती, धाकली पाती, वसुंधरा पटवर्धन, योगिनी जोगळेकर, स्नेहलता दसनूरकर, कुसुम अभ्यंकर, आशा बगे यांच्या दमदार कथांजलीमध्ये ना. सी. फडक्यांची संपूर्ण कादंबरी आणि धनुर्धारीच्या लाडोबा म्हापणकरांचे संपूर्ण वर्षाचे भविष्य यांवर लोकांच्या उड्या पडत. विवाह जुळणीला वाहिलेल्या रोहिणीच्या पहिल्या दिवाळी अंकाने संपूर्ण कादंबरी देण्याची पद्धत चालू केली, मग इतर अंकांनी तीच लाट चोखाळली. आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे, द.मा. मिरासदार, रमेश मंत्री, वि.वा. बुवा, दत्तू बांदेकर विनोदाची बाजू सांभाळत, तर इंदिरा संत, संजीवनी मराठे, शांता शेळके, शिरीष पै या कवितांचे दालन समृद्ध करीत. याखेरीज व्यंग्यचित्रे, बिंग चित्रे, कार्टूनची साथ होती. अरविंद गोखले, जयवंत दळवी, मधू मंगेश कर्णिक, सुभाष भेंडे, ग.दि. माडगुळकर, पु.भा. भावे दिवाळी अंकाचे साहित्य मे-जूनमध्येच तयार ठेवीत.


  • काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी मासिक मनोरंजनाचा १९०९ मध्ये दिवाळी अंक प्रसिद्ध केला तेव्हापासून दिवाळी अंकाची परंपरा चालू झाली.
हे वाक्य दिवाळी अंक मध्ये असावयास हवे. दिवाळी अंक लेखाच्या दुव्यातून इतिहास आपोआपच समोर उभा रहातो.दिवाळी अंक २०१३ मध्ये २०१३ मध्ये आलेल्या दिवाळी अंकांचे इतरत्र झालेल्या समीक्षणाची संदर्भा सहीत दखल घेतली जाणे अभिप्रेत असेल किंवा कसे.
  • आजही टिकून(/अस्तीत्वात/चालू) आहे.
अशा वाक्यांशांचा उपयोग, ज्ञानकोशीय परिपेक्षात revisit केला गेला पाहीजे
  • दिवाळी अंकाची पहिली जाहिरात सुगंध मासिकाच्या जुलै वा ऑगस्ट महिन्यात होत असे.
वाक्य/माहिती अपुर्ण आहे का ? दिवाळी अंकांना एकुण १०० पेक्षा अधीक वर्षांचा इतिहास आहे.उपरोक्त माहिती नेमकी कोणत्या कालावधी बद्दल आहे. संबंधीत माहिती दिवाळी अंक इतिहासाबद्दल असेल तर संदर्भा सहीत दिवाळी अंक या लेखात जावयास हवी.
  • मासिक मनोरंजनाच्या दिवाळी अंकाच्या धर्तीवर सर्वच दिवाळी अंकांचा जोर कथा वाङ्‌मयावर असे.
उपरोक्त माहिती नेमकी कोणत्या कालावधी बद्दल आहे. संबंधीत माहिती दिवाळी अंक इतिहासाबद्दल असेल तर संदर्भा सहीत दिवाळी अंक या लेखात जावयास हवी.
  • सर्वश्री पु. भा. भावे, अरविंद गोखले, गंगाधर गाडगीळ, वि. स. खांडेकर, दि. बा. मोकाशी, माडगुळकरांची थोरली पाती, धाकली पाती, वसुंधरा पटवर्धन, योगिनी जोगळेकर, स्नेहलता दसनूरकर, कुसुम अभ्यंकर, आशा बगे यांच्या दमदार कथांजलीमध्ये ना. सी. फडक्यांची संपूर्ण कादंबरी आणि धनुर्धारीच्या लाडोबा म्हापणकरांचे संपूर्ण वर्षाचे भविष्य यांवर लोकांच्या उड्या पडत.
उपरोक्त माहिती नेमकी कोणत्या कालावधी बद्दल आहे. संबंधीत माहिती दिवाळी अंक इतिहासाबद्दल असेल तर संदर्भा सहीत दिवाळी अंक या लेखात जावयास हवी.
'लोकांच्या उड्या पडत.' -अशा वाक्यांशांचा उपयोग, ज्ञानकोशीय परिपेक्षात revisit केला गेला पाहीजे
उपरोक्त माहिती नेमकी कोणत्या कालावधी बद्दल आहे. संबंधीत माहिती दिवाळी अंक इतिहासाबद्दल असेल तर संदर्भा सहीत दिवाळी अंक या लेखात जावयास हवी.
मग इतर अंकांनी तीच (वा/)लाट चोखाळली. -अशा वाक्यांशांचा उपयोग, ज्ञानकोशीय परिपेक्षात revisit केला गेला पाहीजे
  • परिच्छेद दुसरा
  • मात्र २०१३ साली प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकांची संख्या २०१२ सालापेक्षा कमी आहे, असे समजते दिवाळी अंकांच्या चढ्या किमती आणि चांगल्या लेखकांची कमतरता हे त्याच्यामागचे खरे कारण आहे. ई-अंकांची वाढलेली संख्या या गोष्टीला थोडीबहुत कारणीभूत आहे.


  • मात्र २०१३ साली प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकांची संख्या २०१२ सालापेक्षा कमी आहे, असे समजते.
या वाक्यातील 'मात्र' आणि 'असे समजते" -या वाक्यांशाचा उपयोग वार्तांकन शैलीचा आणि ज्ञानकोशात टाळण्या जोगा आहे.
माहिती दिवाळी अंक २०१३ लेखास उपयूक्त आहे पण संदर्भ हवा
  • दिवाळी अंकांच्या चढ्या किमती आणि चांगल्या लेखकांची कमतरता हे त्याच्यामागचे खरे कारण आहे.
हे त्याच्यामागचे खरे कारण आहे. --अशा वाक्यांशांचा उपयोग, ज्ञानकोशीय परिपेक्षात revisit केला गेला पाहीजे
माहिती दिवाळी अंक २०१३ लेखास उपयूक्त आहे पण, चढ्या किमती आणि चांगल्या साहित्याची कमतरता या बद्दल वृत्तपत्रीय संदर्भ उपलब्ध आहेत आणि संदर्भ देऊन लेखनाची गरज आहे.
  • ई-अंकांची वाढलेली संख्या या गोष्टीला थोडीबहुत कारणीभूत आहे.
माहिती दिवाळी अंक २०१३ लेखास सांख्यिकीय संदर्भासहित लेखन केल्यास उपयूक्त ठरू शकते.यावर्षी स्वयंसेवक आणि लेखकांच्या अभावी मनोगत संकेतस्थळाचा दिवाळी अंक निघू शकलेला नाही.महाराष्ट्र टाइम्सचा दिवाळी अंक मागच्या वर्षी ऑनलाईन दिसत होता या वर्षी अद्यापतरी दिसला नाही,त्यामुळे सध्यातरी उपरोक्त माहितीच्या वस्तुनिष्ठते बद्दल साशंकता वाटते आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:१८, २ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]

तात्पुरती संदर्भयादी[संपादन]

क्रमांक संदर्भ संदर्भ पुन्हा देणे
[१] <ref name="शंभरीपार"/>
[२] <ref name="शैलेंद्र_शिर्के"/>
  1. ^ म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada/diwali-ank/articleshow/24831756.cms?. "यंदा दिवाळी अंक ‘शंभरीपार’" हा 'म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद' यांचा लेख दिनांक २ नव्हेंबर २०१३ भाप्रवे सकाळी ९ वाजता रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ शैलेंद्र शिर्के. http://prahaar.in/shadow/148949. "वाचकांची दिवाळी’" हा शैलेंद्र शिर्के यांचा लेख दिनांक २ नव्हेंबर २०१३ भाप्रवे सकाळी ९ वाजता रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

संदर्भ वगळले ?[संपादन]

@J:

नमस्कार,

लेखातील ओळीत दिलेले संदर्भ अनवधानाने वगळले गेले का इतर काही भूमीका आहे ?

दिपावलीच्या शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:१५, ४ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]

चुकून वगळले[संपादन]

संदर्भ चुकून वगळले गेले आणि परत टाकता आले नाहीत....J (चर्चा) २३:५६, १० नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]