चर्चा:दिवाळी
आपली संस्कृती सांगते ?
[संपादन]प्रस्तु लेखात लक्ष्मीपूज विभागात खालील वाक्य आहे :
“ | अशा तर्हेने दीपावलीचा प्रत्येक दिवस हा असुरांचा संहार केल्याच्या, धर्माने अधर्मावर विजय मिळवल्याच्या दिवसाची आठवण म्हणून मंगलमय दीपांनी उजळवायचा, असं आपली संस्कृती सांगते. | ” |
"आपली" म्हणजे कुणाची ? विकिपीडियासारख्या विश्वकोशातील लेखात आपले-तुपले कसे ठरवावे ??
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) २३:४५, २३ ऑक्टोबर २०११ (UTC) नरक चतुर्दशी व नरकचतुर्दशी असे दोन लेख आहेत.
बाब्या के. ०३:२४, २५ ऑक्टोबर २०११ (UTC)आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस या सणाचे असतात.
लेखाचे स्वरूप
[संपादन]@माहितगार - लेखाचे स्वरूप विकी मानकानुसार दिसत नाही,त्यात आवश्यक बदल करते आहे, काम चालूचासाचाकी लावून ठेवते आहे तूर्त आर्या जोशी (चर्चा) @माहितगार -काम चालू चा साचा काढला आहे कारण विकी मानकानुसार आवश्यक ती सर्व माहिती योग्य स्वरूपात संपादित करून आज मी लेख पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.आर्या जोशी (चर्चा)
@माहितगार:सदर लेख गुणवत्तेच्या दृष्टीने चांगला झाला आहे असे जाणवते आहे. मुखप्रुष्ठ सदरासाठी नामांकन म्हणून हा लेख पाठविता येईल का? मार्गदर्शन मिळावे. धन्यवाद आर्या जोशी (चर्चा)
- लेख चांगला झाला आहे. सहज सुचले म्हणून -असेच करावे असा आग्रह नाही- दिवाळी अंक विभाग (बरोबरची ३ चिन्हे देऊन) महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीत दिवाळी या मुख्य विभागात टाकल्यास कसे असेल असा विचार आला सोबतच कदाचित गेल्या काही वर्षात सुरु झालेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमांबद्दलही एखादा उप विभाग करता आल्यास पहावे असे वाटते.
- इतिहास/प्राचीनत्व विभागासाठी अधिक संदर्भ आणि माहिती देण्यास भविष्यकाळात अजून वाव असेल असे वाटते.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:१४, ५ ऑक्टोबर २०१७ (IST)
@माहितगार:धन्यवाद! भर घालते. आर्या जोशी (चर्चा)
प्राचीनत्व-ध्रुवीय उगम
[संपादन]सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुर होताच त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव करीत असावेत.
दिवाळी सहसा सप्टेंबर-नोव्हेंबर या महिन्यांत असते. ध्रुवीय प्रदेशांत हिवाळा/रात्र जानेवारीअखेरपर्यंत संपत नाही, किंबहुना, डिसेंबर-फेब्रुवारी हे सगळ्यात थंड महिने असतात. असे असता वरील वाक्यात तथ्य नाही.
अभय नातू (चर्चा) २१:१५, ५ ऑक्टोबर २०१७ (IST)
- माझे मत:
- बेसिकली काही गोष्टींची गरज आहे, पहिले "' या सणाचा उगम फार प्राचीन काळी आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते," हे वाक्य (आणि कदाचित आर्य उत्तर धृवावरून हा टिळकांचा तत्कालीन अध्याहृत विचार या वाक्या मागे असण्याची शक्यता) आपल्याकडून लक्षात घेतली जात नाही आहे, असे काही होत आहे का ?
- दुसरे वाक्याची सुरवात बहुधा "भारतीय संस्कृती कोश खंड चौथा मधील अमुक लेखानुसार" अशी काहीशी झाल्यास आपला होत असलेला गैरसमज अंशत: कमी होईल असे वाटते.
- तिसरे लो. टिळकांच्या आर्य उत्तर धृवावरून आले या संकल्पनेची समिक्षा आता पावेतो झालेली असणार फार तर अशी समिक्षा शोधून संदर्भ नोट मध्ये जोडता येईल पण त्या विचारावर आधारीत "भारतीय संस्कृती कोश खंड चौथा मधील तमुक लेखाची" समीक्षा अद्याप झालेली नसण्याची शक्यता शिल्लक उरते. अशा समीक्षा पोकळीचा निर्देश मी कालच विकिपीडिया:ज्ञान आणि अथवा माहिती पोकळी#समीक्षा पोकळी या पानावर केला आहे. जो संदर्भ लेखात आला आहे तो त्या ग्रंथातला असा समज होता असा रहाण्यास हरकत नसावी, वाक्यात नंतर तुर्तास *{{समीक्षापोकळी}} हा साचा लावावा. तो [समीक्षा पोकळी] असा दिसेल.
- चौथे आपण जी टिका करत आहात तशी समीक्षा पोकळी असलेल्या पोकळींची संकल्पनांची समीक्षा/ चिकित्सा विकिपीडिया बाह्य त्रयस्थ संवाद संस्थळावर जसे की मिसळपाव डॉट कॉम मायबोली डॉट कॉम अशा ठिकाणी केली जाणे गरजेचे वाटते. अशा त्रयस्थ ठिकाणी झालेल्या चर्चे नंतर त्याची दखल उपरोक्त वाक्यावरची टिका म्हणून काळाच्या ओघात संबंधीत परिच्छेदात घेतली गेल्यास ज्ञानकोशास अभिप्रेत समतोल साधला जाईल असे वाटते.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:४६, ५ ऑक्टोबर २०१७ (IST)
सर्वप्रथम, ही टीका नाही तर चूक वाटलेले वाक्य काढण्यासाठीची नोंद आहे. वाक्य अजून काढलेले नाही.
येथील वाक्यातून हा सण आर्यांचा असल्याचे आणि आर्य प्राचीनकाळी (३,००० वर्षांपूर्वी) ध्रुवीय प्रदेशात रहात असल्याचे सुचविले जात आहे. याला संदर्भ असल्यास उत्तम. टिळकांनी यावर उत्तम अभ्यास केला आहेच.
असे असले तरी माझा आक्षेप आर्यांचा सण किंवा त्यांचे वास्तव्य यांवर नाही. दिवाळी हा हिवाळा/रात्र सरल्याचा उत्सव असल्याचे ध्वनित केल्याला आक्षेप आहे. हे वाक्य factual नाही. हिवाळा/रात्र सरण्यासाठी मकरसंक्रांत हा सण अधिक तार्किक वाटतो, दिवाळी नाही.
अभय नातू (चर्चा) २२:१२, ५ ऑक्टोबर २०१७ (IST)
- "भारतीय संस्कृती कोश खंड चौथा मधील तमुक लेखातील" तर्क चुकीचा असू शकतो; पण लेखात घ्यायचा झाला तर जसा आहे तसा घेतला जावयास हवा. बायबलादी ग्रंथातील पृथ्वी सपाट असल्याचा सिद्धांत चुकीचा आहे, तरीही पृथ्वीच्या आकारा बाबतच्या कल्पना कशा बदलत गेल्या या संदर्भाने इतर नवीन संदर्भांसोबत त्याची उल्लेखनीयता शिल्लक असू शकते.
- तुमचे म्हणणे बरोबर असेल पण ते ज्ञानकोशीय संपादकाचे व्यक्तिगत मत ठरते ज्याची समीक्षा/ चिकित्सा त्रयस्थ माध्यमाने करणे श्रेयस्कर असावे. शक्य आहे कि टिळक किंवा संबंधीत लेखाच्या लेखकाच्या गणिता नुसार तेवढ्या शतकापुर्वीची उत्तर ध्रुवाची स्थिती वेगळी असेल. जे काही असेल त्रयस्थ माध्यमास आपल्या आक्षेपाची चिकित्सा करण्याची संधी -जरी प्रथम दर्शनी आपला आक्षेप सयुक्तीक दिसत असला तरीही- मिळवणे श्रेयस्कर असावे असे वाटते.
- अर्थात ज्ञानकोशीय लेखनात आजतागायतता असण्याचाही आग्रह जरुरी आहे त्यामुळे आज या विषयातील प्रगततर अध्ययन झालेले अभ्यासकांचे विचारांना नक्कीच प्राधान्य असावयास हवे या बाबत दुमत नाही.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा)
२२:२६, ५ ऑक्टोबर २०१७ (IST)P
- आऊटराईट अवैज्ञानिक माहिती ज्ञानकोशाने केवळ संदर्भ आहे म्हणून स्विकारावी का ? माझ मत आपल्या प्रमाणे नाही असेच असेल पण Progression of thought process of subject under consideration दाखवताना विज्ञान अथवा तर्कावर न टिकणाऱ्या माहितीस ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असू शकते का ? माझ्या व्यक्तीगत मतानुसार एखादी माहिती आजतागायततेच्या आणि विज्ञानाच्या साधनांच्या प्रमाणावर अथवा तर्कसुसंगततेवर उतरत नसेल तर उणीवेचा निर्देश करुन उर्वरीत ज्ञानकोशीय उल्लेखनीयता स्विकारावी. तसे नाही केले तर होमीओपथी सारख्या अनेक माहितींचा ज्ञानकोशात समावेशच करता येणार नाही.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:३८, ५ ऑक्टोबर २०१७ (IST)
- @आर्या जोशी: आपण "भारतीय संस्कृती कोश"तील संदर्भांवर आधारीत लेखन करत आहात, त्यामुळे आता पर्यंत आंतरजालावर नसलेली बरीच माहिती मराठी विकिपीडियाच्या माध्यमातून मांडली जाऊन ज्ञान आणि माहितीची पोकळी अंशत: का होईना कमी होते म्हणून आपले प्रयत्न खूप स्तुत्य आहेत.
- वरील चर्चेतून जाणवणारा परीच्चेद माहितीतील असमतोल टाळला जाणे ही तुमची एकट्याची जबाबदारी नाही समस्त मराठी विकिपीडियनची जबाबदारी आहे त्या अनुषंगाने अभय नातूंनी मांडलेला चर्चा मुद्द्याचे स्वत:चे महत्व आहे. - त्याच वेळी एका स्रोतावर अवलंबीत्व न ठेवता अजून एखाद दोन स्रोत जोडीला घेता आल्यास लेखातील तथ्यांच्या मांडणीला समतोल प्राप्त होण्यास मदत होते. bookganga.com वरील प्रस्तावना, google books तसेच shodhganga.inflibnet.ac.in वर वेगाने शोध कसा घ्यावा याच्या काही ट्रिक्स माहिती करुन घेतल्यास अधिक स्रोत ग्रथांचा धांडोळा घेणे आणि अधिक स्रोतातून संदर्भ देणे सहज साध्य होऊ शकेल असे वाटते.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:५३, ५ ऑक्टोबर २०१७ (IST)
@माहितगार: @अभय नातू: नमस्कार ! आपणा उभयतांची चर्चा वाचली.मला त्यातून खूप चांगली चर्चा अनुभवायला मिळाली. मुळात मध्ययुगात प्रचलित असलेले वेगवेगळे सण आधुनिक काळात अद्याप केले जात असले तरी त्याचा काल बदललेला दिसतो. उदा. मध्ययुगात आश्विन शुक्ल प्रतिपदेला नवीन वर्ष सुरु होई जे आपण आता चैत्र शुक्ल प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला साजरे करतो. आणि शारदीय नवरात्र आश्विन प्रतिपदेला सुरु होते आताच्या काळात. असे व्रतांचे रूपांतर उत्सवात होतानाचे बदल संशोधक म्हणून मला माहिती आहेत पण ते या व्यासपीठावर नोंदवावेत का? असा प्रश्न मला आहे. त्याचे समाधान करावे. दिवाळीचा प्राचीन उल्लेख आणि लोकमान्य टिळकांचे मत याचाही संदर्भ असा नोंदविता येवू शकेल. आपल्या सूचनांच्या प्रतीक्षेत.... आर्या जोशी (चर्चा)
- @आर्या जोशी:
- सर्वप्रथम, माझी नोंदवजा सूचना योग्य त्यारीत्या वाचल्याबद्दल धन्यवाद. अनेकदा अशा नोंदी व्यक्तिशः टिका समजली जाउन वाद होतात.
- तुमच्या कडील माहिती येथे जरूर नोंदवावी. ही माहिती योग्य त्या प्रकारे मांडली जाते याची काळजी घ्यावी - उदा. सणांची बदलती कालरेषा किंवा इतर उल्लेख इतिहास अशा विभागात लिहिता येईल.
- सणांबदलचे इतरत्र असलेले संशोधन अबक यांच्या संशोधनानुसार अशा प्रस्तावनेसह लिहावी. त्याचबरोबर त्या संशोधनाचा संदर्भही द्यावा.
- अभय नातू (चर्चा) १०:४६, ६ ऑक्टोबर २०१७ (IST)
@माहितगार: @अभय नातू: समीक्षा पोकळी साचा काढला. धर्मशास्त्राचा इतिहास या संशोधन प्रकल्पासाठी काणे यांना भारतरत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यामुळे या ग्रंथातील माहिती संशोधनाच्या अंगानेही अधिकृत म्हणून जगभर मान्यता पावली आहे. या ग्रंथातील संदर्भ नोंदवून मगच साचा काढला आहे. आपल्या अधिक सूचना असतील तर जरूर कळवा. संशोधक म्हणून या निमित्ताने मलाही समृद्ध करणारे हे काम आहे. आर्या जोशी (चर्चा)
- हा दुसरा संदर्भ नमुद केल्याने आता परिच्छेद अधिक समतोल वाटतो आहे.
- अजून जरा minor aspects
- "या सणाचा उगम फार प्राचीन काळी आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्या काळातच झाला असे म्हणतात." इथे ज्ञानकोशीय वाचका समोर कोण म्हणते असा प्रश्न निर्माण होतो तेव्हा शक्यतोवर अबक ग्रंथ / लेखका नुसार आणि मग संदर्भ
- "सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुर होताच त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव करीत असावेत." हेही वाक्य बहुधा भारतीय संस्कृती कोशातील असावे तेव्हा पुढच्या वेगळ्या संदर्भ ग्रंथातील मत-वाक्या पुर्वी भारतीय संस्कृती कोशाचा संदर्भ नमुद करून घेणे श्रेयस्कर.
- एकच संदर्भ पुन्हा पुन्हा द्यायचा तेव्हा दृष्यसंपादन पद्धतीतील संदर्भद्या > पुनरउपयोग हि कळ सोपी वेळ वाचवणारी आहे. एखादा प्रयत्न करुन पहावा नाहीतर कार्यशाळे दरम्यान प्रत्यक्षही दाखवेन.
- अनेक आभार अनेक शुभेच्छा
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:४१, ६ ऑक्टोबर २०१७ (IST)
लक्ष्मी पूजन
[संपादन]कच्छी किंवा खोजा किंवा आगाखान या पैकी एका समुदायात काही प्रमाणात घरगुती स्वरुपात लक्ष्मीपुजन केले जात असावे. त्यांच्या धर्माचा तो कितपत अधिकृत भाग आहे कल्पना नाही. सहज कुठे दुजोरा देण्याजोगा संदर्भ कुणाला सापडला तर लेखात नोंद घेता येऊ शकेल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:४२, ६ ऑक्टोबर २०१७ (IST)
@माहितगार: @अभय नातू: @V. Narsikar: @संदेश हिवाळे: @सुबोध कुलकर्णी: नमस्कार ! आपल्या सर्वांच्या सकस चर्चेतून हा लेख खूप चांगला झाला आहे.अभ्यासक म्हणून मलाही खूप चांगली संधी मिळाली यानिमित्ताने.दिवाळीच्या औचित्याने झालेले हे काम मुखपृष्ठावर पाहताना खूपच आनंद झाला आहे. आपणा सर्वाना दिवाळीच्या खूप शुभेच्छा ! असेच कार्यरत राहूया परस्पर सहकार्याने ! आर्या जोशी (चर्चा)
- धन्यवाद मॅडम, तुम्हालाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... तसेच पुढिल संपादनासाठी शुभेच्छा...
- --संदेश हिवाळेचर्चा १८:५४, १२ ऑक्टोबर २०१७ (IST)
- आपले काम हे नविन लोकांना प्रेरणादायी आहे. पायरी-पायरीने वरच्या मजल्यावर जायचे असते. आता विकिच्या इतर क्षेत्रातही आपल्या कामांचा हळुहळु विस्तार करा. माझी नोंद घेतल्याबद्दल धन्यवाद व आपणांसही दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.--V.narsikar (चर्चा) २०:१८, १२ ऑक्टोबर २०१७ (IST)
मुखपृष्ठ सदरात बदल
[संपादन]@अभय नातू नमस्कार ! या लेखात थोडी भर घालणे,शुद्धलेखन दुरुस्ती याची गरज वाटत होती म्हणून ती केली आहे. स्वयंशाबित सदस्य ते करू शकतात असे वाचले आहे, तथापि अलीकडील बदलात त्याबद्दल प्रश्नचिह्न दिसते आहे. योग्य ते मार्गदर्शन व्हावे आणि आस्वश्य्क वाटल्यास आपण सुधारणा करावी.
- मुखपृष्ठ सदर लेखाचा दर्जा अधिक चांगला रहावा त्यात उत्पात कमी व्हावा याची काळजी घ्यायची असते. मुखपृष्ठ सदर लेखातील बदल इतर सदस्यांनी तपासावेत म्हणून संपादन गाळणीकडून, 'मुखपृष्ठ सदरात बदल ?' अशी खूण लावली जाते. प्रश्न चिन्ह नसेल नुसतेच 'मुखपृष्ठ सदरात बदल' म्हटले तर तेवढे लोक तो बदल तपासणार नाहीत पण प्रश्नचिन्ह असेल तर तपासले जाण्याची शक्यता अधिक असते म्हणून प्रश्नचिन्हाची व्यवस्था केलेली आहे.
- प्रश्नचिन्ह असलेला प्रत्येक बदल चुकीचा आहे असा अर्थ होत नाही, उलटपक्षी मराठी लोक विकिपीडियावर सहसा खूप जबाबदारीने वागतात त्यामुळे अनुचित बदलांचे प्रमाण तसे कमी असते. तरी पण मनात कुठेतरी हलकी असुरक्षेची भावना असते की अनुचित बदलतर केले जाणार नाहीत ना म्हणून गाळणीसुचनेच्या माध्यमातून हि दक्षतेची विशेष सुविधा आहे. मुख्या म्हणजे यात चिंता करण्यासारखे काही नाही.
- Mahitgar (चर्चा) १२:१५, १३ ऑक्टोबर २०१७ (IST)
- सर्व मुखष्ठ सदरातील बदल या दुव्यावर अशा पद्धतीने एकाच ठिकाणी पहाता येऊ शकतात
- या यादीत पाहिले तर मुखपृष्ठ सदरातील एक बदल 'शशिकांत पटवर्धन' या नवीन सदस्यांनी केल्याचे दिसते. तपासले तर जाहीरात सदृष्य उद्देश्याने दुवा दिलेला दिसतो. उद्देश्य जाहीरात सदृष्य असेलतर मजकुर ठेवायचा की नाही त्यात काही काटछाट बदल करावयाची का ते ठरवावे लागते. पण तरी त्या बदलाचे स्वरुप गंभीर उत्पाताचेही नाही त्यामुळे नवे सदस्य रुळे पर्यंत दुर्लक्षीण्यासारखे असेल तर दुर्लक्षीले जाते.
- उदाहरणार्थ सुबोध कुलकर्णींच्या देणे निसर्गाचे ह्या लेखात दोन वर्षापुर्वी अभय नातूंनी ज्ञानकोशीय परिघात बसत नसल्याने पानकाढा साचा लावून ठेवला आहे. सुबोध कुलकर्णी आता रुळले आहेत. सदस्यांना रुळण्यासाठी संयमाने वेळही द्यावा लागतो. माझे मागच्या आठवड्यात लक्ष गेले तर सुबोध कुलकर्णींसाठी चर्चा पानावर संदेश टाकून ठेवला आहे. त्याकडे एकदा त्यांचे लक्ष गेले की सावकाश वगळेन. इथे सामान्य लेखपानावर जेवढा वेळ दिला जातो तेवढा कदाचित मुखपृष्ठ सदरपानाच्या बाबतीत न देता सदर लेखातील न बसणाऱ्या गोष्टी कदाचित अधिक जलदपणे काढल्या जातील.
- Mahitgar (चर्चा) १२:३३, १३ ऑक्टोबर २०१७ (IST)
@माहितगार धन्यवाद सर.आपण माझी काळजी मिटवली.चुकीचे काही घडत नाही ना याची काळजी घ्यावी असे वाटले म्हणून नोंदवून ठेवले.आर्या जोशी (चर्चा)
दिवाळी
[संपादन]दिवाळीच्या दिवसांचे अध्यात्मिक आशय मी लिहू इच्छीतो. उदाहरण - वसुबारस अथवा गोवत्सद्वादशी
द्वादशीला गोवत्सद्वादशी करतात. या दिवशी गव्हाचे पदार्थ खावू नयेत. शंकराना गहू प्रिय असतात, 'शंकराशी पुजिले सुमनाने' सुमन म्हणजे चांगले मन, सुमन म्हणजे सुमन नावाचा भक्त, सुमन म्हणजे गहू आणि सुमन म्हणजे डोळा सुध्दा! रमेला दासी केल्यावर मग शंकराची निराळी बडदास्त ठेवण्याची आवश्यकता काय? गौ म्हणजे इन्द्रिये आणि गोवत्स म्हणजे इन्द्रियांची अपत्ये आणि कार्ये! पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये आणि अकरावे मन, रमा एकादशीला ताब्यात घेतल्यावर द्वादशीला, बारावी शुध्द बुद्धी भगवंताचे कृपेने प्राप्त करायची. भगवंत गीतेत म्हणतात, *ददामि बुध्दियोगं तं* म्हणजे बुध्दिवान माणूस स्वतः बुध्दीचा जो इतका डांगोरा पिटतो तीच मुळी भगवंताचे कृपेने प्राप्त होत असते. भक्ताला ते पटते कारण तो गोद्वादशी करून, ते रहस्य जाणत असतो. सर्च इंद्रिये ज्याच्या काबूत आहेत, असा साधक स्वतः बुद्धीतत्वाच्याही पलीकडे जाऊन स्वतःच भगवान विष्णू बनत असतो.
धनत्रयोदशी - धन्वंतरीपूजन
प्रत्येक साधकाच्या जीवनात समुद्रमंथन होत असते. त्याचेंतील दैवीशक्ति आणि दानवीशक्ति यांचेत सतत संघर्ष होत असतो. दोन्ही शक्ती मिळून शरीरातील सप्तचक्रांचे जे मंथन होते तेच समुद्रमंथन होय. त्या मंथनातून प्रत्येक महान साधकाला चौदा रत्ने प्राप्त होत असतात. धन्वंतरी हे रत्न प्रत्येक साधना संपन्न साधकाला प्राप्त होत असते आणि तेही अमृताचा कलश घेऊन. साधने करता साधकाचे शरीर अतिशय निरोगी आणि प्राकृतिक अवस्थेत असावे लागते. साधनाच साधकाचे शरीर मंथून ते प्राकृतिक करीत असते. साधकाला स्वतःचे आणि दुसऱ्यांचे शरीर आसन, प्राणायामादि प्रक्रियांद्वारे कसे शुद्ध प्राकृतिक ठेवावे याचे ज्ञान असते. धन्वंतरी म्हणजे वैद्यकीय ज्ञान. आपल्या मेरूपृष्ठाची मंथनी करून आपली शेष शक्ति पणाला लावून साधकाला हे समुद्रमंथन करावे लागते.
कृपया मार्गदर्शन करावे