चर्चा:टिकेंद्रजीत सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शंका : 'राजमहालाच्या क्रांतीची स्थापना'. क्रांतीची स्थापना कशी करतात? यापूर्वी कोणी केलेली ऐकिवात नाही. ... (चर्चा) २०:५८, १८ ऑगस्ट २०१८ (IST)

अपमान करण्याच्या इराद्याची घोषणा केली. : कुणाचा अपमान?

स्वातंत्र्य मिळाल्यापासून इंफाळमध्ये त्यांना फाशी देण्यात आली. : मिळाल्यापासून किती वेळा/किती वेळाने फाशी दिली? ... (चर्चा) २१:०८, १८ ऑगस्ट २०१८ (IST)


धन्यवाद ज आपण स्वत:च आपला सद्भावना प्रकल्प उघड करुन दाखविल्याबद्दल[संपादन]

म्हणजे वाक्ये दुर्बोध आहेत हे मान्य केले यात सर्वकाही आले. यापूर्वी मी पूजा जाधवच नव्हे तर प्रत्येकाच्याच पानात योग्य त्या सुधारणा करीत असे, पण काही लोकांनी 'ज नक्की काय काम करतात?' असे सवाल केल्याने सुधारणा करणे बंद केले, आणि चुका दाखवणे सुरू केले. लेखकाला या दुर्बोध वाक्यांतून नक्की काय म्हणायचे आहे ते न समजल्याने काही चुका दुरुस्त करणेही दुरापास्त असते.. ... (चर्चा) २२:०५, १८ ऑगस्ट २०१८ (IST)

स्टॉकिंग?[संपादन]

Gnome-edit-redo.svgSureshkhole, V.narsikar, Tiven2240:,

मराठी विकिपीडियावर अनेकदा जुने संपादक होणाऱ्या बदलांकडे लक्ष ठेवून असतात. अशा बदलांमधील चुका जमेल तसे सुधारतात किंवा त्यांकडे लक्ष वेधतात. ही गोष्ट अनेक वर्षे चालू आहे व स्वागतार्हच आहे. यात ज एकटे नाहीत. तुमच्यासह अनेकांनी हा उद्योग चालविलेला आहे त्यामुळेच मराठी विकिपीडियाची गुणवत्ता थोडी तरी सुधारते.

तुमचा आरोप आहे की ज हे सदस्य Pooja jadhav यांच्या बदलांकडे बघत टपून बसलेले आहेत व जाधव यांची प्रत्येक चूक काढून दाखवतात. तुम्हाला हे बंद व्हायला हवे आहे असा गर्भितार्थ आहे. मग ज (किंवा कोणत्याही लेखकाने) काय करावे? प्रत्येक लेखकाची प्रत्येकी एकएक चूक दाखवावी? कोणाचीच चूक दाखवू नये?

येथे तुम्ही सदस्य जाधव यांच्या वतीने अती हळवा पवित्रा घेतलेला आहे हे माझे मत आहे. चूक असल्यास मान्य करण्यास तयारी असावी, बरोबर? मग अशा चुका दाखविल्यावर त्या सुधारण्यापेक्षा त्यामागचा बागुलबुवा शोधत बसण्यात काय अर्थ? आता असे विश्लेषण केले तर माझ्या, तुमच्या आणि चुका सुधारण्याऱ्या प्रत्येक संपादकाचा तथाकथित बायस दाखविता येईल. यात प्रत्यक्ष धमक्या, दमदाटी, इ. गोष्टी नसल्या, आणि दाखविलेल्या चुका बव्हंश चुकाच असल्या तर हे स्टॉकिंग होत नाही असे माझे मत आहे. आता ज यांनी पूर्वी धमक्या, दमदाटी दिलेल्या आहेत आणि त्याबद्दल त्यांना संदेशही दिलेले आहेत. असा प्रकार पुन्हा झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल हे त्यांनी लक्षात ठेवावे.

याबद्दलची सर्वसमावेशक चर्चा माझ्या चर्चा उप-पानावर सुरू आहे ती तेथे पुढे नेत आहे, परंतु येथे तुम्ही केलेला आरोप मला पटत नाही.

इतर दोन प्रचालकांच्या मताचे स्वागत आहे.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०४:४७, २० ऑगस्ट २०१८ (IST)


Gnome-edit-redo.svgअभय नातू, V.narsikar, Tiven2240:, मी आधी दिलेल्या पुराव्यांमध्ये ज यांनी फ़क्त बायकांनाच लक्ष केल्याचे स्पष्ट दिसते आहे, शिवाय आपल्याकडे ज यांची संपादने तपासण्याची इतर प्रगत साधने आहेत. ती वापरून आपण हवी ती माहिती उकरुन काढू शकता. हरकत नाही, इतिहास सगळे बोलतो आणि तो बोलत राहिलच, तुम्हांला माझी अनेक मते, आणि प्रत्यक्ष दाखवलेली तथ्येही पटलेली नाहीत, हरकत नाही. माझा हट्ट नाही की प्रत्येक गोष्ट पटलीच पाहिजे.

  • माझा हट्ट एवढाच आहे की, प्रत्येक गोष्टीबाबत स्पष्टता हवी ती आहे, आणखी येत आहे.
  • माझे काम तथ्ये दाखवून त्यावर कारवाईची मागणी करणे होते ते मी केले आहे, अनंत कामे उरली आहेत. आता मी त्याकडे वळतो आहे, आता ज आणि तत्सम प्रकरणात आपण विचाराल त्यावेळीच मी माहिती पुरवीन.
  • मला एवढच म्हणायचय की, जर मुलींच/बायकांच जर म्हणणं असेल की, त्यांना एखादी व्यक्ति त्रासदायक वाटतीये तर त्याला आपण गंभीरपणे घ्यावे आणि त्या व्यक्तिला चार पावले मागे व्हायला सूचवावे.
  • गेली 7/8 वर्षे बायकांच्या संस्था आणि विद्यापीठांतल्या विभागांमध्ये काम केल्याने आणि जेंडर हाच माझा संशोधन, काम, विचार, सगळ्याचाच विषय असल्याने मी पूजा आणि तिच्यासारख्या सदस्यांबाबत हळवेपणा दाखवणे सहाजिकच आहे. किंबहूना हा हळवेपणा नसून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न आहे. जितके पुरुष उघडपणे बोलतात, भांडतात आणि अनेक उद्योग करतात तीतक्या सहजपणे बायका/मुलीं करत नाहीत/करु शकत नाहीत.
  • धोरणं ठवणाऱ्या आणि चार टाळकी जमा करुन काम करणाऱ्या (मी तुम्ही सगळेच)आपल्यासारख्यांना लोकांना बायकां, दलित आणि इतर सगळ्याच अगदी अपंगांचा सुद्धा त्यांच्या गरजा आणि वर्ल्डव्हू वेगळे असतात हे मान्य करुनच काम करावे एवढेच. इतर विकिंवर याच्यासाठी खास धोरणं आखली गेली आहेत. प्रत्येकाच्या सुरक्षिततेची काळजी घेत, मोकळेपणानी काम करु शकण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण विकसित होत आहोत आपणही त्यामार्गाने आज ना उद्या मार्गक्रमण करावे हीच इच्छा.
  • शिवाय माझा आरोप, "मजकूर काढणे, संदर्भ काढून टाकणे आणि आंतरावर्ती संपादने करणे हा आहे." ज्यावर आपले मत अजूनही आलेले स्पष्टपणे आलेले नाही. त्याची आता मला अपेक्षाही नाही. प्रताधिकाराच्या मुद्यावर आपण इतर ठिकाणी सोक्षमोक्ष लावूच.

धन्यवाद! सुरेश खोले "चुक माझी असेल तर मी माफ़ी मागायला कमी करत नाही, पण चुक तुमची असेल तर. . . . "? ०५:१६, २० ऑगस्ट २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgSureshkhole:,
ज यांनी केलेले बदल बायकांनाच लक्ष्य करतात हे तुमचे प्रतिपादन तुम्ही दिलेल्या पुराव्यावर आधारित आहे. तुम्ही ज यांची पूर्वीची संपादने (सगळी १०,०००+) उकरुन काढा म्हणजे तुम्हाला कळून येईल की त्यांनी सगळ्यांच्याच संपादनांमध्ये असे बदल केलेले आहेत, यात मी, तुम्ही आणि इतर असंख्य सदस्य आहेत. असे असताना आपल्याला हवा असलेलाच पुरावा घेउन त्याबद्दल वारंवार हेका धरणे हा एककल्लीपणाचे (बेस्ट केस) आणि व्यक्तिगत हेव्यादाव्याचे (वर्स्ट केस?) लक्षण आहे.
इतिहास बोलतो आणि बोलत राहतो. तुम्हाला इतिहासच हवा असेल तर पूर्ण इतिहास पहा. आपल्याला हवे तेथे सीमा आखून सोयीनुसार इतिहासाचे बोलणे ऐकू, ऐकवू नका.
जर मुलींच/बायकांच जर म्हणणं असेल की, त्यांना एखादी व्यक्ति त्रासदायक वाटतीये तर त्याला आपण गंभीरपणे घ्यावे आणि त्या व्यक्तिला चार पावले मागे व्हायला सूचवावे.
१. टायवीन यांनी म्हणल्याप्रमाणे मुली/बायका येथे अपवादानेच म्हणत आहेत. जेव्हाजेव्हा म्हणल्या तेव्हातेव्हा त्याची दखल घेउन ज यांना संदेश दिला गेला. याउप्पर तुमची काय अपेक्षा आहे हे कळत नाही. २. तुम्ही त्यांची वकीली करता आहात हे स्पष्ट आहे. हे वाईट नाही. परंतु तुम्हीच मुली/बायकांचा एकमेव आवाज आहात असे भासवू नका. इतर सदस्य आणि प्रचालकांनाही याची योग्य ती काळजी आहे हे इतिहासानेच सांगितलेले आहे.
मुली बोलू शकत नाहीत, भांडू शकत नाहीत हे तुम्हाला तुमच्या अभ्यासातून कळले आहे. मला खात्री आहे की हा अभ्यास तार्किक आणि सर्वमान्य आहे आणि त्याचे पडसाद येथेही काही प्रमाणात दिसतात. आता प्रत्येक गटाबद्दल असे म्हणता येईल - दलित, गरीब, कष्टकरी, वेळ नसलेले संपादक,... यादी अनंत आहे. तुम्ही मुली/बायकांची बाजू घेउन भांडत आहात (पुन्हा एकदा, हे वाईट नाही) परंतु त्यात तुमचा दृष्टक्षेप मर्यादित आहे. डोळ्याला झापड लावल्यासारखे तुम्ही यावरुन मुसंडी मारत आहात आणि इतरांच्या वेळेची नासाडी करीत आहात. यात तुमचा हा हेतू नाही असे मला नक्कीच वाटते परंतु त्याचा प्रभाव काय हे मी तुम्हाला सांगत आहे.
प्रत्येकाचा वर्ल्डव्ह्यू लक्षात घेत आणि त्यातच गुंतून पडल्यास गाडी पुढे कशी जाणार महाराजा? स्त्री/महिला हा त्या अनुषंगाने सोपा विषय आहे. असे अनेक गट आहेत ज्यांचे वर्ल्डव्ह्यू थेट समोरासमोर उभे ठाकतात. मग तेथे काय करायचे? प्रत्येक गटाला सूट/सवलत देणे पूर्णपणे मान्य पण त्यासाठी दुसऱ्याच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणणे हे चूकच. ऑलिव्हर वेंडेल होम्सचे म्हणणे येथे पटते - युअर फ्रीडम टू स्विंग युअर फिस्ट एंड्स व्हेर माय नोझ बिगिन्स. हे वाक्य थोडे गंभीरपणे लक्षात घ्या.
मजकूर काढणे, संदर्भ काढणे, आंतरावृत्ती संपादने करणे यांविषयी मी अनेकदा मत मांडलेले आहे. तुम्हाला हवे ते मत मांडलेले नाही इतकेच. पुन्हा एकदा - असे करणे हे त्रासदायक आहे परंतु संपादनाच्या भरात किंवा उत्साहात असे (वारंवारसुद्धा) होणे शक्य आहे. याचा बागुलबुवा करू नये. मला खात्री आहे की तुमच्या/माझ्या संपादनांमध्येही असली लक्षणे दिसतील. यात मला अद्यापही मुद्दाम विशिष्ट व्यक्ती/गटाला लक्ष्य केलेले दिसत नाही. तुम्ही शोधलेले पुरावे फक्त तुमच्या मताला अनुकूल असे पुरावे आहेत, सर्वसमावेशक नाहीत. वर लिहिल्याप्रमाणे ज यांच्या १०,००० संपादनांचा अभ्यास करा तेथे आढळेल की त्यांनी सगळ्याच संपादकांच्या लेखनात असे बदल केलेले आहेत, फक्त स्त्री/बायकांच्या नाही.
असो, येथील धामधूमीत महिलांची सुरक्षितता या चर्चेकडे दुर्लक्ष झालेले आहे. ती पुढे नेत आहे परंतु तेथे उशीर झाला म्हणून तुमच्याकडून तक्रार होऊ नये म्हणून मुद्दाम लक्ष वेधले.
धन्यवाद
अभय नातू (चर्चा) १६:२९, २० ऑगस्ट २०१८ (IST)
ता.क. हा संदेश दिल्यानंतर अलीकडील संपादनांची साफसफाई करीत असताना सदस्य गौरी जोग यांनी तयार केलेली काही पाने बदलली आणि वगळली. ही पाने तयार करण्यात जोग यांचा हेतू चांगलाच होता आणि तो स्वागतार्हच आहे परंतु अगदी वरकरणीही त्यातील मजकूर येथे ठेवण्याजोगा नव्हता म्हणून तो वगळला गेला.
आता - गेल्या २० मिनिटांचे क्षितिज पाहिले असता मी फक्त स्त्री सदस्यांचीच पाने उडविली, त्यांनी केलेले बदल उलटवले असे म्हणता येईल. तार्किकदृष्ट्या हे बरोबर आहे, याला पुरावा आहे, असेही म्हणता येईल परंतु हे सर्वसमावेशक दृष्टिक्षेपात बरोबर आहे? याचे उत्तर अपेक्षित नाही पण यावरुन थोडा विचार केला जाईल हे नक्कीच अपेक्षित आहे.
Gnome-edit-redo.svgअभय नातू: असो हरकत नाही, मी अनेक दिवसांनी पहिल्यांदा टायविन यांच्याशी सहमत आहे, पाहिजे असल्यास आपण पुऩ्हा कधीतरी याविषयाकडे परत येऊ, आधीच म्हणल्याप्रमाणे इतिहास बोलत राहिलच.
आपल्या प्रति सद्भावना गृहित धरुन मी ही चर्चा इथेच थांबवत आहे.(टायविन इशस्टाइल!) आपण आपल्या कामांकडे वळूयात आणि अशा समस्या पुऩ्हा उद्भवणार नाहीत यासाठी आवश्यक धोरणे आखण्यात आपला वेळ देऊयात. सुरेश खोले "चुक माझी असेल तर मी माफ़ी मागायला कमी करत नाही, पण चुक तुमची असेल तर. . . . "? १७:०२, २० ऑगस्ट २०१८ (IST)

प्रचालकांचे मत[संपादन]

मी माझी व्यक्तीगत मत आहे, याचा उद्देश व्यक्तिगत आरोप करण्यास नाही Gnome-edit-redo.svgअभय नातू:,

मला या विषयावर चर्चा करायची नाही. सदस्य:ज याना ताकीद मी दिली होती व त्यांची नक्कल डकव मी काढले होते परंतु त्यांना तडीपार करण्यापूर्वी माझे एकही मत घेतले नाही. ही चर्चा पूर्णपणे अफवा आहे. इथे तक्रार करणारे सदस्य कुठल्या इंग्लिश विकिपीडियाचे धोरण दर्शवित आहे ते त्यांनाच माहीत असेल. ते धोरण काय आहे आणि ते स्टॉकिंग कशाला म्हणतात ते त्यांनाच विचारा. मी सुद्धा १७ वर्ष इंग्लिश माध्यमातून शिक्षण घेतले आणि स्टॉकिंग कश्याला म्हणतात त्याची तर मला व आपल्याला सुद्धा माहिती आहे.

प्रचालकांचे चावडीवर इतके मोठे गोंधळ घातला की निरिक्षक हा अधिकार मराठी विकिपीडियावर असले पाहिजे परंतु त्यांना माहिती नाही की निरिक्षक जे कार्य करतात त्याला स्टॉकिंग म्हटले जात नाही. ज सुद्धा निरक्षण करत होते. मी सुद्धा करते नारसिकरजी सुद्धा करतात आणि आपण सुद्धा करतात. ज यांनी मी तयार केलेले पानात सुद्धा आवश्यक बदल केले आहेत त्याचे हे स्वभाव आहे त्याला स्टॉकिंग म्हणून म्हणे पूर्णपणे निराधार आहे आणि गंमत म्हणजे जेव्हा धोरण चावडीवर याचे प्रस्ताव टाकले गेले आहे त्यांनी याबात आपले विचार सुद्धा मांडले गेले नाही.

महिला?? हे काय चालले आहे, पूर्वी महिला सुरक्षित नाही आता महिलांवर स्टॉकिंग चालले आहे. फक्त मराठी विकिपीडियावर हीच अफवा पसरत आहे. जर असेस चालत असेल तर उचित कारवाही करायला लागेल. तक्रार दाखल करणारे सदस्य माझ्यापासून वरिष्ठ आहे परंतु प्रत्येक दिवशी एक ना एक गोष्ट काढून प्रचालकांना त्यावर कारवाही करण्यास दबाव टाकतात व त्यांनाच धमकी देतात की त्याच्यावर पुढे कारवाही करतील. अभय नातू आता प्रचालकांचे हेच कार्य राहिले आहे का?

मी मराठी विकिपीडियावर त्याचे स्वरूप बदलून त्याला इतर विकिपीडियासारखे बनवण्यास प्रचालक पद स्वीकार केला आहे परंतु असस रोज चालत असे तर मला सुद्धा इथे योगदान करण्याबाबत रस वाटत नाही.

प्रसाद गेले, संदेश गेले, ज गेले, आता नारसिकरजी सुद्धा निवृत्ती घेतील, त्यांनतर माझे पाळी सर्वांचे कारण हेच मराठी विकिपीडियावर चाललेले छळणूक आहे. प्रसाद आणि संदेश याना NPOV, ज याना बायका, मला तर देश विरोधी (विनोद), अभय आणि नारसिकर याना पुढील करवाहीची चेतावणी. एक सदस्य जे पूर्णपणे फक्त गोंधळ, अफवा, छळणूक, प्रचालकांना धमक्या, विवादित सही करत आहे याचे जबाबदार आहे आणि ते काही लपलेले नाही सर्व स्पष्ट पणे दिसत आहे. असो मी माझे कार्य करत आहेत व नक्की करेल. आणि गंमत भारी आहे महिलांवर अत्याचार आणि महिला यात काहीही बोलत नाही व फक्त एक संपादक त्यांचे वतीने वकिली करत आहे, नक्की ही त्यांचीच चालबाजी आहे वर्तमान संपादकांनवर छळणूक करण्यासाठी.

यावर काहीही उप्पान बनवायची गरज नाही आणि मला वाटते तुम्हीही अशा सर्व लबाडीकडे लक्ष वेघु नये. आपल्याकडे एनेक धोरण आणि प्रचालकीय कारभारी काम आहे. हे तर रोज चालले आहे आणि सुद्धा चालेल जास्त झाले की मग प्रचालकांनकडे अनेक उपकरण आहे ज्याने आपण ते रोखू शकतो. चर्चापबंदी आणि तडीपार नक्की उपयोगी येईल. फक्त २ गोष्ट आहे ज्यात खात्री केली पाहिजे.. पहिला पाणी डोक्याचे वर गेले पाहिजे नाही आणि दुसरं कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहना....

नारसिकर जी सुद्धा मत देतील अशी आशा. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:४६, २० ऑगस्ट २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgTiven2240:,
त्यांना तडीपार करण्यापूर्वी माझे एकही मत घेतले नाही
तुमचे मत ज यांच्या चर्चा पानावर उघड होते. तेथे अंतिम ताकीद दिल्यावरही त्यांनी हाच प्रकार केल्यावर तडीपार करणे हा नाईलाज होता. किंबहुना, तडीपार करण्याआधी मी त्यांना अजून एक संधी दिलेली चंद्रकांत मांडरे लेखाच्या चर्चा पानावर उघड आहे. त्यानंतर तुमचे संदेशवजा मत पाहिले. ज यांना एक दिवसाकरता तडीपार करणे हे तुमच्या अंतिम ताकीदीचाच थेट परिणाम आहे असे म्हणण्यास हरकत नाही. सगळ्या सदस्यांना एकाच तागडीत तोलणे हाच येथे रोख आहे.
ज यांनी केलेले बदल स्टॉकिंग नाही हे मी वर लिहिले आहे आणि ते माझे मत अद्याप कायम आहे. तडीपारीत याचा थोडाही प्रभाव नाही
आता प्रचालकांचे हेच कार्य राहिले आहे का?
कालच मी याबद्दल या सगळ्या मारामारीत माझे योगदान आता शून्याकडे चालले आहे आणि मला अलीकडे मिळणारा मर्यादित वेळ काही सदस्यांच्या तक्रारींचा पाठपुरावा करण्यातच जात आहे असे लिहिणार होतो. हा योगायोगच असणार. परंतु प्रचालकपद घेतल्यावर वेळोवेळी असे होणारच (झालेलेही आहे). त्यावर उपाय नाही.
साळवे येथून तडीपार होण्याचे कारण त्यांची संपादने आणि वारंवार विनंत्या, सूचना, ताकीद यांना भीक न घालणे होते. हिवाळे येथे असतातच. ज यांच्या योगदानाबद्दल मला व्यक्तिशः आदरच आहे परंतु तो आदर नियम लावण्याच्या आड आलेला नाही आणि येणारही नाही. आशा आहे की ज स्वतः सुद्धा हे बघतील आणि समजून घेतील. सदस्य sureshkhole यांचे काही मुद्दे बरोबर आहेत (प्रताधिकारभंग खपवून न घेणे, इ.) आणि त्यांकडे लक्ष देउन कार्य करणे हे सगळ्यांना (प्रचालकच नव्हे) गरजेचे आहे.
महिलांची सुरक्षितता या विषयावरील sureshkhole यांच्या आरोपाला उत्तर देतच आहे परंतु तुम्ही म्हणल्याप्रमाणे मध्येमध्ये इतकी सोंगे उभी राहत आहेत की सगळ्यांचा समाचार घेताना त्याकडे वेळ देता येत नाही. पूर्वी असाच प्रकार झाल्यावर प्रश्नांकडे दुर्लक्ष केले गेले असा पुढचा आरोपही केला गेला आहे. मला मान्य आहे की याने वैताग येउन नको हे प्रचालकपद असे वाटणे साहजिक आहे. तरीही प्राप्त परिस्थितीला शांतपणे आणि निष्पक्षपणे सामोरे जाणे हेच प्रचालकांचे कर्तव्य आहे.
असो, हे तुमच्या वरील संदेशास थेट उत्तर. sureshkhole यांच्या टिप्पणीला वेगळे.
अभय नातू (चर्चा) १६:११, २० ऑगस्ट २०१८ (IST)
Gnome-edit-redo.svgअभय नातू: आपले मत दिल्याबद्दल धन्यवाद. माझे मते आपण ही चर्चा इतेच थांबुया. आपल्याला सुद्धा आता इतर विकिपीडियावरील प्रचालकांसारके वागले पाहिजे. छोटे छोटे गोष्टीत न पडून प्रचालकीय कार्यवर जास्त ध्यान देऊया. धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १६:२०, २० ऑगस्ट २०१८ (IST)