टिकेंद्रजीत सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
टिकेंद्रजीत सिंग

टिकेंद्रजीत सिंग(२९ डिसेंबर १८५६-१३ ऑगस्ट १८९१) हे ईशान्य भारतातील मणिपूर संस्थानातील एक राजकुमार होते. त्यांना बीर टिकेंद्रजीत आणि कोइरिंग म्हणून ओळखले जात होते. ते मणिपूर सैन्यदलाचे कमांडर होते. त्यांनी कांगला या महालातून ब्रिटीशांशी सशस्त्र सैन्यासह लढा दिला. ज्यामुळे १८९८ चे ॲंग्लो-मणिपूर युद्ध झाले. जे 'मणिपूर एक्सपिडिशन' म्हणूनही ओळखले जाते.[१]

ॲंग्लो-मणिपूर युद्ध[संपादन]

१८८६ मध्ये महाराजा चंद्रकीर्ती यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा सूरचंद्र सिंग यांनी त्यांची जागा घेण्यात यश मिळवले. त्याआधी अनेक दावेदारांनी नवा राजा होण्याचा प्रयत्न केला. १८९० मध्ये राजाचे दोन भाऊ टिकेंद्रजीत व कुलचंद्र सिंग यांनी राजवाड्यावर हल्ला केला. पहिले तीन प्रयत्न अपयशी झाले. पण नंतर टिकेंद्रजीत यांच्या सेनापतीपदाखाली कुलचंद्र सत्तेवर आले. सूरचंद्र सिंग यांनी मणिपूर सोडून कचर येथे आश्रय घेतला. त्यांनी ब्रिटीशांशी हातमिळवणी करून सत्ता मिळविण्याचे प्रयत्न सुरु केले. [२]

चाचणी आणि मृत्यू[संपादन]

लेफ्टनंट कर्नल जॉन मिशेल यांच्या विशेष न्यायालयाने ११ मे १८९१ रोजी सुनावणी सुरू केली. न्यायालयाने टिकेंद्रजीत, कुलचंद्रा व थांगल जनरल यांना दोषी ठरवले आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.१३ ऑगस्ट १८९१ रोजी आदेश घोषित करण्यात आला आणि तिकडे रजित(?) व थांगल जनरल यांना सार्वजनिकरीत्या संध्याकाळी ५ वाजता इंफाळमध्ये पोलो मैदान येथे फासावर लटकविण्यात आले.[३] फेडी-पुंग येथे बाजारपेठेतील मामल्यासाठीचे कोर्ट होते. स्वातंत्र्य मिळाल्यापासून इंफाळमध्ये त्यांना ज्या जागेवर फाशी देण्यात आली त्या जागेचे नाव बदलून 'बीर टिकेंद्रजीत पार्क' करण्यात आले.[४]

हे हि पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Bir Tikendrajit Singh – The True Patriot Of Manipur". OK! North East. १८-८-२०१८ रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "Tikendrajit Singh". geni_family_tree (इंग्रजी भाषेत). १८-८-२०१८ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "Imperia l Gazetteer2 of India, Volume 17, page 186 -- Imperial Gazetteer of India -- Digital South Asia Library". dsal.uchicago.edu. १८-८-२०१८ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ Aryan, Aniket. "Tikendrajit Singh also known as Bir Tikendrajit and Koireng". SRIRAM's IAS (इंग्रजी भाषेत). १८-८-२०१८ रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)