चर्चा:चतुर्मास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

संस्कृत, मराठी आणि हिंदीसारख्या सर्व भाषांमध्ये चतुर्मास, चातुर्मासी आणि चातुर्मास्य ही नामे आहेत. चातुर्मास व चातुर्मासिक ही विशेषणे आहेत. लेखाचे नाव हे नाम असल्याने, चतुर्मास असे हवे....J १८:२०, २६ जुलै २०११ (UTC)

कथा[संपादन]

कथा हिंदी पानावरही अशीच आहे त्यात तर एकही दुवा नाही. मग येथे काय अपेक्षित आहे याचे स्पष्तीकरण द्यावे त्यानुसार पानावर बदल करण्यात येतील. निनाद ०३:४९, २७ जुलै २०११ (UTC)

कथा नाही तर शब्द[संपादन]

हिंदीत चातुर्मास हे नाम नाही. कथालेखकाला ते माहीत नसावे, म्हणून त्याने चुकीचा शब्द वापरला.

हिंदी शब्दकोशात हे वाचावे : http://www.definition-of.net/की-परिभाषा-चतुर्मास

आणि हे http://www.definition-of.net/advanced-word-searches.aspx?q=%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8&match=starts&lang=hi ...J १२:१८, २७ जुलै २०११ (UTC)

अगदी पूर्णपणे सहमत! स्थानांतर केले आहे. निनाद ०१:३२, २८ जुलै २०११ (UTC)

लेखांमधील माहिती आणि पुर्ननिर्देशने[संपादन]

Gnome-edit-redo.svg, अभय नातू:

खालील पानांकडे पाहिल्यानंतर मजकुर आणि पुर्ननिर्देशनात सुसंगतता सुधारण्यास वाव आहे असे प्रथम दर्शनी वाटते पण या संबंधाने माझी स्वत:ची माहिती तोकडी पडते.

  1. आषाढी एकादशी आणि आषाढ शुद्ध एकादशी हे एकच का वेगळे एकच असेल तर वेगळ्या पानांची आवश्यकता आहे का ?
  2. देवशयनी एकादशी हे पान सध्या चतुर्मास पानाकडे पुर्ननिर्देशीत आहे. देवशयनी एकादशी हे पान आषाढी एकादशी किंवा आषाढ शुद्ध एकादशी कडे पुर्ननिर्देशीत करणे योग्य होऊ शकेल का ?
  3. चतुर्मास लेखात चारही महिन्यांची नावे सध्या येत नाहीत ती देता येऊ शकेल असे वाटते.
  4. कोणता मजकुर कोणत्या लेखात टाकावा या बद्दलही विचार व्हावा असे वाटते.
  5. आषाढ लेखात उपयुक्त दुवे कोणते आणि कसे द्यावयाचे ते सुद्धा पहावयास हवे असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:१४, २७ जुलै २०१५ (IST)