चर्चा:किर्गिझस्तानचे विभाग

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
@Usernamekiran: हो हा मराठी विकिपीडिया आहे, त्यामुळे शक्यतेवढ्या बाबी मराठीमध्ये आणणे आवश्यक आहे, आपण बहुतांश भाग आणलाच आहे. धन्यवाद, अर्थातच असे यादीवजा लेख त्या यादीतील सर्व घटक मुळातच ह्या विकिवर अस्तित्त्वात असताना केल्यास, त्यान लाल दुवे कमी दिसतात. अर्थात आपण उलट्या दिशेने गेल्यासही काहीही हरकत नसावी. पण आख्खी यादी लाल दुव्यांनी भरलेली नसावी असा अलिखीत संकेत सर्वच विकिंवर आहे.
दुसरा आणखीन एक महत्वाचा मुद्दा इथे लिहिताना चर्चापानांवरही मराठीत लिहिल्यास त्याचा ज्यांना इंग्रजी येत नाही किंवा कमी येते अशा सर्वच सदस्यांना आपली चर्चा वाचण्यास मर्यादा पडतात त्यामुळे जर आपण ह्या विकिवर कायम मराठीचा वापर केल्यास फार उत्तम होईल. धन्यवाद ! QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! २२:४४, ११ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

@Usernamekiran:,

तुम्ही रशियन नावे व रशियन उच्चार काढलेले पाहिले. अशी माहिती असण्यास हरकत नाही. रशियन नावांचे इंग्लिशमध्ये लिखाण करण्यापेक्षा त्यांचे मराठीत लिखाण केल्यास अधिक उपयोगी आहे.
अभय नातू (चर्चा) ०३:०५, १२ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]


@Usernamekiran, QueerEcofeminist, आणि अभय नातू:,

हा लेख किर्गिझस्तान या लेखात विलीन का करू नये? त्या लेखातला हा महत्वाचा भाग आहे. स्वतंत्र विषय नाही असे माझे मत आहे.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:४१, १२ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

सध्या जरी यात एक तक्ता असला तरी पुढे जाता येथे किर्गिझस्तानच्या विभागांबद्दलची माहिती अपेक्षित आहे. असे लेख अनेक देशांच्या विभागांबद्दल आहेत.
मराठी विकिपीडियावर अनेक त्रोटक लेख अनेक विषयांवर आहेत तरी त्यातीलच हा एक.
अभय नातू (चर्चा) २०:३५, १२ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]
@सुबोध कुलकर्णी, अभय नातू, आणि QueerEcofeminist: माझा विचार होता कि किर्गिझस्तान संबंधित जेव्हढे लेख इंग्रजी विकिपीडिया वर आहेत, त्या सगळ्यांचे टप्प्या-टप्प्यात भाषांतर करावे. हा लेख त्यामधील पहिला टप्पा होता. छोटा का असेना, जर लेख असेल तर त्याला नंतर वाढवणे सोप्पे जाते. त्या हिशोबाने मी १०-१५ लेख चालू करून त्यांना नंतर वाढवण्याच्या विचारात आहे. —usernamekiran(talk) १८:४१, १५ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]
@Usernamekiran:,
  • फक्त एक सुचना, ते निवडलेले लेख इंग्रजीवरील स्टार्ट क्लास आणि वरचे असावेत आणि त्याला कुठल्याही म्मेंटेनन्स टेग्ज नसाव्यात जेणेकरून, फक्त तपासलेल्या, संदर्भासहीत आणि चांगल्या लेखांचेच भाषांतर होईल.
  • बाकी जेव्हढा मजकूर भाषांतरीत कराल तो संदर्भासहच करा, म्हणजे त्यावर नंतर काम करणे न लागे.
  • थोडक्यात सांगायचे तर, तुम्ही केलेल्या कामात भर घालायला वाव असावा पण सफाईला नको. बाकी आपण सूज्ञ असा बहुत काय लिहिणे. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १९:०६, १५ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]


इथे इंग्रजी मध्ये चर्चा का चालू आहे? मराठी विकीपिडीयात मराठीत चर्चा होऊ द्या! कसं? (Usernamekiran tiven gosavi (चर्चा) २१:०९, १५ नोव्हेंबर २०१८ (IST))[reply]