घोडाझरी वन्यजीव अभयारण्य
Appearance
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
घोडाझरी अभयारण्य हे चंद्रपूर वनवृतातील एक नवीनतम तसेच निर्माणाधीन वन्यजीव अभयारण्य आहे. सद्यस्थितीत ह्या अभयारण्याचे क्षेत्र हे ब्रम्हपुरी वनविभागात येते. या अभयारण्याचे प्रस्तावित क्षेत्र सुमारे १५३.३३८ किमी२ राहणार आहे. २३ मार्च, २०१८नुसारच्या शासननिर्णयाद्वारे या अभयारण्याचे क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.
या क्षेत्रात सात बहिणी डोंगर {अंबाई,निंबाई,उमाई,गौराई,मुक्ताई(७-बहिणी पहाड)भिवराई & पवराई}, मुक्ताई देवस्थान व धबधबा समाविष्ट आहेत.
महाराष्ट्र राज्य शासनाने हे क्षेत्र घोडाझरी प्रकल्प म्हणून जाहीर करण्यासाठी मान्यता दिली आहे.
या निर्माणाधीन परिसरात सध्या वाघ, बिबट्या, रानगवा, चितळ, सांबर, नीलगाय, रानडुक्कर, कोल्हा, माकड, ससा इ. वन्यप्राणी आहेत.
कसे पोहचाल
[संपादन]नागभीडवरून दक्षिण-पश्चिमेला चंद्रपूर मार्गावर ७ कि.मी. अंतरावर.
- नागभिड हे तालूका ठिकाण
- नागपूरवरून ९५ कि.मी.,
- चंद्रपूर वरून १०५ कि.मी. तर
- गडचिरोलीवरून ८० कि.मी.(मार्गे-) आहे.
सावधानत: परिसरात एकट्याने जाऊ नये वन्य प्राणी आहेत.