गुलाबी डोक्याचे बदक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुलाबी डोक्याचे बदक नर आणि मादी

इंग्रजी नाव : Pink-headed Duck
शास्त्रीय नाव : Rhodonessa caryophyllacea

हा एके काळी पूर्व भारतात विपुल प्रमाणात आढळणारा बदक जातीतील पक्षी. साधारणपणे २० व्या शतकाच्या सुरुवातीला हा पक्षी नामशेष झाला. शेवटची अधिकृत नोंद १९३५ सालातील आहे. याच्या डोक्यावरच्या अतिशय सुंदर गुलाबी पिसांसाठी आणि मांस खाण्यासाठी याची अतोनात शिकार झाली.

जुन्या नोंदींप्रमाणे काही आदिवासी पुरूष आपल्या टोपीत याची पिसे लावत असल्याचे दिसते. पूर्व विदर्भात याला अरूण बाड्डा या नावाने ओळखले जाते. चित्रकार ए. ए. आलमेलकर यांनी काढलेल्या काही चित्रांमध्ये अरूण बाड्डाचे चित्र पहायला मिळते.