गाळदेव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?गाळदेव
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर जावळी
जिल्हा सातारा जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

गाळदेव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

गाळदेव हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील गाव आहे. या गावची लोकसंख्या १७० च्या आसपास आहे. हे गाव सातारा-कास-महाबळेश्वर मार्गावर साताऱ्यापासून ४१ किलोमीटर व महाबळेश्वर पासून २३ किलोमीटर दूर आहे. गाळदेव समुद्रसपाटीपासून महाबळेश्वरच्या समान उंचीवर स्थित आहे. शेती या गावतील उपजीविकेचे मुख्य साधन आहे. या गावात बव्हंश जंगम लोक रहात असून ते शुद्ध शाकाहारी आहेत. या लोकांना महादेवाचे पुजारी म्हणून ओळखले जाते. या गावामध्ये महादेवाचे मंदिर आहे. ४ थी पर्यंत शाळा असून पुढील शिक्षणासाठी ५ किलोमीटर चा डोंगर उतरून म्हाते बुद्रुक येथे शिक्षणासाठी जावे लागते. या गावातील सर्व लोक शेती करत असल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण या गावात खूप आहे. ५०% जनता बेरोजगारीमुळे मुंबई मध्ये स्थलांतर झाली आहे. शेतीमध्ये प्रमुख पीक भात शेती केली जाते. उंच डोंगरावर असल्यामुळे पाण्याची कमतरता असते.

हवामान[संपादन]

हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो.

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate