खापरी (घाटंजी)
?खापरी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | घाटंजी |
जिल्हा | यवतमाळ जिल्हा |
लोकसंख्या | ५,५०० (२०११) |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
खापरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे. खापरी गावात प्रसिद्ध संगमेश्वर मंदिर आहे. गाव वाघाडी नदीच्या काठावर वसलेले आहे.खापरी हे क्षेत्रफळ आणि लोकसंख्यानुसार घाटंजी तालुक्यातील दुसरे सर्वात मोठे गाव आहे. गावात विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुळजाभवानी मंदिर प्रसिद्ध आहे. खापरी हे गाव विशेष करून राजकीय दृष्ट्या खूप सक्रिय आहे परंतु गावातील लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षपणामुळे गावातील विकास खुंटलेला आहे. स्मशानभूमिकडे जाण्यासाठी नदी ओलांडून जावे लागते त्यामुळे पावसाळ्यात अंत्यविधी व्यवस्थीत पार पाडता येत नाही. खापरी गावात जिल्हा परिषद तसेच आश्रमशालेतून विद्यार्थी शिक्षण घेतात. गावात विविध समाज गुण्यागोविंदाने एकत्रित राहतो,दरवर्षी प्रवचन सप्ताह आयोजित केला जातो.
खापरी हे गाव घाटंजी तालुक्याजवळच असल्याने विविध सोईसुविधा ग्रामवासियाना सहज उपलब्ध होतात. वाहतूकीची चांगली सोय असल्याने दवाखाना, बाजारासाठी गावकऱ्यांची तालुक्याला येणे-जाणे सहज शक्य होते.यवतमाळ हे जिल्हा मुख्यालय गावापासून अवघ्या 30 किमी अंतरावर आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]घाटंजी बस स्टँड पासून खापरी हे गाव 500 मीटर अंतरावर आहे.
हवामान
[संपादन]येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
लोकजीवन
[संपादन]==प्रेक्षणीय स्थळे==संगमेश्वर मंदिर खापरी येथे नदी पार करून जावे. दरवर्षी दत्तजयंतीला ग्रामस्थ मंदिरात जातात. गावकरी मंदिरात कार्यक्रमांचे आयोजन करतात.
नागरी सुविधा
[संपादन]==जवळपासची गावे= मुर्ली, बेलोरा, घाटी, अंजी, नुक्ती ही खापरी शेजारील गावे आहेत.