खरवड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खरवड (kharvad )हे गांव वरोरा तालुक्यातील चंद्रपूर जिल्हात असून हे गांव त्रिमूर्ती (ब्रम्हा,विष्णू, महेश.) या तिन्ही देवांच्या ७५० वर्ष जुन्या असलेल्या प्राचीन मूर्ती साठी प्रसिद्ध आहे.

इतिहास[संपादन]

हे गांव पूर्वी वडाळा-रिठ या नावाने प्रसिद्ध होते. या गांवात पूर्वी जंगल होते, येथे वड, निंब, पिंपळ, हे तीन वृक्ष एकत्र असून प्राचीन काळी ऋषीमुनी या ठिकाणी तप करत असत.

धार्मिक[संपादन]

गांवात वारकरी सांप्रदायिक पद्धतीने अखंड हरीनाम सप्ताह सर्व गांवकरी बांधवाच्या सहकार्याने त्रिमूर्ती मंदिरात दरवर्षी चैत्र कृ. त्रयोदशी ते चैत्र कृ. षष्ठी दरम्यान होत असतो.

या सप्ताहात दैनिक कार्यक्रम खालीलप्रमाणे होत असतात.

सकाळी ५ ते ६ काकडा ७ ते ८ नगर प्रदक्षणा ९ ते ११ श्रीमद्भागवत दुपारी ३ ते ५  श्रीमद्भागवत कथा सायं. ६ ते ८ हरिपाठ व भारुड रात्री ९ ते ११ हरिकीर्तन

आतापर्यंत गांवात श्रीमद्भागवत कथा केलेले भागवतकार[संपादन]

सर्व श्री ह. भ.प.

पुंडलिक महाराज बोलवटकर (२००९)

ज्ञानेश्वर महाराज पवने (२०१०, २०११, २०१२)

विलास महाराज झिल्लारे (२०१३)

देवानंद महाराज प्रधाने (२०१६)

मनोज महाराज मिरकुटे (२०१७)

धनंजय महाराज मोरे (२०१४, २०१५, २०१८,)

आतापर्यंत गांवात किर्तन केलेले किर्तनकार[संपादन]

कैकाडी महाराज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

नामदेव महाराज पंढरपूरकर

बालाजी महाराज कोहपरे

निंबाजी महाराज तागड (२०१०, २०११, २०१२, २०१३, २०१४, २०१५, २०१६,२०१७,२०१८,)

नारायण महाराज पडोळे (२००९, २०१०, २०१५,)

धनंजय महाराज मोरे (२०१४, २०१५, २०१८,)

मंदिरे[संपादन]

त्रिमूर्ती मंदिर[संपादन]

हे त्रिमूर्ती मंदिर गांवाच्या पश्चिमेस असून ते त्रिमूर्ती (ब्रम्हा,विष्णू, महेश.) या नावाने प्रसिद्ध असून ते पूर्वाभिमुख असून मंदिर हेमाडपंथी असून त्याची काळाच्या ओघात पडझड झाली आहे, संपूर्ण मंदिर आज उपलब्ध नाही, या मंदिरातील मूर्ती ह्या ७५० वर्षापूर्वी (संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याही आधी)च्या आहेत, सदर त्रिमूर्ती मंदिर हे हे अतिशय पुरातन मानल्या जात. मंदीराच बांधकाम अतिशय टिकाऊ दगडाने केले असून हेमाडपंथी पद्धतीचे आहे.

अमुल्य किमंत[संपादन]

ह्या मूर्ती इटली येथील एका महिलने १९७४ मध्ये दीड कोटी रुपयाला विकत मागितल्या होत्या परंतु गावकरी लोकांनी त्या न विकण्याचा निर्णय घेतला.

हनुमान मंदिर[संपादन]

महादेव मंदिर[संपादन]

भगवान शिवाचे शिव मंदिर हे त्रिमूर्ती मंदिराच्या आवारातच असून ते या त्रिमूर्ती मंदिरापेक्षा वेगळे आणि स्वतंत्र असून त्या मंदिरा पुढे दोन नंदी आहेत.

संत[संपादन]

गुणा माता[संपादन]

गांवात गुणा माता ह्या थोर अवलिया संत होवून गेल्या आहेत, त्यांची समाधी गावात असून त्या ठिकाणी वार्षिक पुण्यतिथीनिमित्त किर्तन आणि नगरभोजन होते.

भदू बाबा[संपादन]

भजनी मंडळे[संपादन]

वारकरी भजन मंडळ

तुकडोजी महाराज भजन मंडळ

ह्या भजन मंडळाच्या वतीने दररोज सकाळी ६; वाजता त्रिमूर्ती मंदिरात सामुदायिक प्रार्थना घेतली जाते.

राजकीय[संपादन]

गांवात ७ सदस्य असलेलेली ग्रामपंचायत १९६४ साली स्थापन झाली.

ग्रामपंचायत[संपादन]

सरपंच

अनुक्रम सरपंचाचे नांव कार्यकाल
सौ.नानाजी डवरे २०१८

ग्रामसेवक[संपादन]

समाज[संपादन]

गांवात मराठा, कुणबी, मारवाडी. माळी,बौद्ध, न्हावी, इत्यादी समाजातील लोक राहतात.