काकड आरती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विठोबा मूर्ती

काकड आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती होय. या वेळी देवाच्या मूर्तींला काकडयाने (एक प्रकारची ज्योत) ओवाळले जाते, म्हणून याला काकडारती असे म्हणतात.[१]भारतातील अनेक मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते. महाराष्ट्रामध्ये बहुतांशी मंदिरातून नित्य किंवा काही विशिष्ट काळात, विशेषतः कार्तिक महिन्यात काकड आरती केली जाते.[२]

कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे देवाला जागविण्यासाठी मंदिरात काकडारती करण्याची पद्धत प्रचलित आहे.[१] आरतीनंतर विविध भजने, अन्य आरती व स्तोत्रे म्हटली जातात. कृष्णाच्या लीला वर्णन करणारी गीतेही यामध्ये म्हटली जातात.

संत तुकाराम, संत रामदास, संत एकनाथ, इत्यादी संतांनी काकड आरती रचल्या आहेत.[३]

काकड आरतीचा नमुना[संपादन]

  • भक्तिचिये पोटी बोध काकडा ज्योति |

पंचप्राण जीवे - भावे ओवाळू आरती ||१||

ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा |

दोन्ही कर जोडोनि चरणी ठेविला माथा ||२||

काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती |

कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती ||३||

राही रखुमाबाई दोन्ही उभ्या दो बाही

मयुरपिच्छ चामरे ढाळीती ठाईच्या ठाई ||४||

विटेसहित पाऊले जीवे भावे ओवाळू |

कोटी रवी - शशी जैसे दिव्य उगवले हेळू ||५||

तुका म्हणे दीप घेऊनी उन्मनीत शोभा |

विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ||६||[३]


  • सत्त्व-रज-तमात्मक काकडा केला|

भक्ति स्नेहे युक्त ज्ञानाग्नीवर चेतविला||[३]

संदर्भ[संपादन]

त्रिपुरी पौर्णिमा
  1. ^ a b "https://www.esakal.com/vidarbha/150-year-tradition-kakad-aarti-vitthal-temple-231408". esakal. ३.११.२०१९. १४.१२.२०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in |title= (सहाय्य)
  2. ^ Dasarā-Divāḷī. Mahārāshṭra Śāsana Śikshaṇa Vibhāga, Mahārāshṭra Rājya Lokasāhitya Samitīsāṭhī. 1990.
  3. ^ a b c Gokhale, Mahādeva Vināyaka (1967). Marāṭhī āratī. Sāvitrī Prakāśana.