Jump to content

खच्चीकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


खच्चीकरण ही क्रिया म्हणजे कोणत्याही प्राण्याचे अंडाशय हटविणे अथवा ते अकार्यरत करणे होय.हे काम रसायनांद्वारे, शस्त्रक्रियेद्वारे अथवा इतर कोणत्याही मार्गाने करण्यात येते.याद्वारे तो प्राणी अथवा मनुष्यप्राणी आपली पुनरुत्पादन क्षमता गमावतो. त्यायोगे त्या प्राण्यावर नियंत्रण करता येते. सहसा हे काम पाळीव प्राण्यांना कामास तयार करण्यासाठी करण्यात येते.

वळू, रेडा, घोडा, गाढव,याक,लामा इत्यादी प्राण्याचे सहसा खच्चीकरण केले जाते.

भारतातील पद्धती

[संपादन]

वळूचे खच्चीकरण करण्याची भारतातील पद्धत फारच क्रुर आहे.प्रथम वळूस खाली पाडुन त्याचे पाय जमिनीत गाडलेल्या खुंट्यास बांधण्यात येतात.मग बांबू अथवा लोखंडी चिमट्याद्वारे वळूचे अंडाशय दाबल्या जाते.त्यावेळेस त्या पशूस खूप प्राणांतिक वेदना होतात व तो प्रचंड तडफडतो.नंतर त्या जागी दुःखावर औषध म्हणून आंबेहळद लावण्यात येते.त्यानंतर सुमारे १५ दिवसानंतर त्या प्राण्यास कामास लावण्यात येते.

अमेरिकेतचीनमध्ये चाकरांनी मालकीणीस काही उपद्रव करू नये म्हणून त्यांचेही खच्चीकरण केले जात असे. याचप्रमाणे मुघलकालीन हरमांमधील चाकर हे खच्चीकरण केलेले असत.[ संदर्भ हवा ]

हे सुद्धा पहा

[संपादन]

लैंगिक खच्चीकरण