खगोलीय विषुववृत्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खगोलीय विषुववृत्त क्रांतिप्रतलाशी २३.४° कोन करते.

पृथ्वीचे विषुववृत्तीय प्रतल[श १] सर्व बाजूंनी वाढविल्यास ते पृथ्वीकेंद्रित काल्पनिक खगोलास ज्या वर्तुळात छेदते त्याला खगोलीय विषुववृत्त (Celestial equator: सेलेस्टिअल इक्वेटर) म्हणतात. पृथ्वीचा परिभ्रामण अक्ष कललेला असल्याने खगोलीय विषुववृत्त परिभ्रमण कक्षेच्या प्रतलाशी (क्रांतिप्रतल[श २]) २३.४° कोन करते.

पृथ्वीच्या विषुववृत्तावरील मनुष्य खगोलीय विषुववृत्ताची खस्वस्तिकामधून[श ३] जाणारे अर्धवर्तुळ अशी कल्पना करू शकतो. जसजसा निरीक्षक उत्तरेकडे सरकत जातो, तसतसे खगोलीय विषुववृत्त विरुद्ध दिशेच्या क्षितिजाकडे सरकत जाते.

सध्या खगोलीय विषुववृत्त पुढील तारकासमूहांमधून जाते:

पारिभाषिक शब्दसूची[संपादन]

  1. ^ प्रतल (इंग्लिश: Plane - प्लेन)
  2. ^ क्रांतिप्रतल (इंग्लिश: Ecliptic plane - एक्लिप्टिक प्लेन)
  3. ^ खस्वस्तिक (इंग्लिश: Zenith - झेनिथ)