Jump to content

कोकीळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोकीळ
नर कोकीळ
कोकिळेची अंडी
शास्त्रीय नाव Eudynamys scolopacea scolopacea (Linnaeus)
कुळ कोकिलाद्य (Cuculidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Asian Koel
संस्कृत पिक, कोकिल
हिंदी कोयल

या प्रजातीतील नराचा आवाज ऐका.

उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वत्र कोकीळ पक्ष्याचा कुहू-कुहू-कुहू आवाज ऐकू येतो. हा आवाज. हिवाळ्याची सुरुवात होत असता मात्र हा एकदम गडप झाल्यासारखा वाटतो.हा नरपक्ष्याचा आवाज असतो. याच्या मादीचा आवाज किक-किक-किक असा असतो. हा पक्षी आपले एकुलते एक अंडे कावळ्याच्या किंवा डोमकावळ्याच्या घरट्यांत घालतात.

वर्णन

[संपादन]

साधारणपणे कावळ्याएवढा (१७ इंच) आकारमानाचा हा पक्षी असून शेपटी लांब असते. नराचा मुख्य रंग काळा, डोळे गडद लाल रंगाचे चोच फिकट पोपटी रंगाची असून मादीचा मुख्य रंग गडद तपकिरी व त्यावर पांढरे-बदामी ठिपके-पट्टे असतात. याच्या किमान तीन उपजाती आहेत

कोकीळ पक्षी संपूर्ण भारतभर सर्वत्र आढळतो तसेच बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका येथेही याचे वास्तव्य आहे. कोकीळ भारतात निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे.

वसतिस्थान

[संपादन]

कोकीळ पक्षी मुख्यत्वे झाडावरच राहणारा (Arboreal) असून तो दाट पाने असलेल्या झुडपी जंगलात, बागेत, शेतीच्या भागात राहणे पसंत करतो.

खाद्य

[संपादन]

कीटक, फुलपाखरे, सुरवंट, फळे, मध पक्ष्याची अंडी हे यांचे खाद्य आहे. म्हणजेच हे पक्षी मांसाहार व शाकाहारही पाळतात.

वीण काळ

[संपादन]

मार्च ते ऑगस्ट हा काळ कोकीळ पक्ष्यांचा विणीचा काळ असून हे पक्षी आपले घरटे बांधत नाहीत, तसेच ते आपल्या पिलांची देखभालही करत नाहीत. मादी (कोकिळा) फिकट हिरव्या-राखाडी रंगाची त्यावर लालसर-तपकिरी ठिपके असलेले अंडे तिला दिसेल अशा कोणत्याही इतर पक्ष्याच्या घरट्यात सोडून जाते. याला अपत्य परजीवी असे म्हणतात. यात यजमान पक्षी ते अंडे आणि त्यातून निघालेले पिल्लू आपलेच आहे असे समजून त्यांचे संरक्षण आणि संगोपन करतात.

पिलांचे संगोपन

[संपादन]

आपल्या घरट्यात सोडून दिलेली अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे कामे त्या घरट्यात राहणारे माता-पिता करतात. त्यांची स्वतःची पिले अंड्यातून बाहेर येण्याआधी बहुधा कोकिळेची पिले बाहेर आलेली असतात. त्यांची वाढही इतर पक्ष्यांच्या पिलांच्या मानाने वेगाने होते.

चित्रदालन

[संपादन]

पहा : प्राण्यांचे आवाजku ku

संदर्भ

[संपादन]