के.बी. पोवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रा. डॉ. कृष्णप्रताप भगवंतराव पोवार (२० डिसेंबर, इ.स. १९३७ - २२ फेब्रुवारी, इ.स. २०१६:पुणे, महाराष्ट्र) हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि एक भूशास्त्र संशोधक होते. त्यांनी अध्यापनात, संशोधनात आणि शैक्षणिक प्रशासन क्षेत्रात ४९ वर्षे काम केले.

डॉ. के.बी. पोवार यांनी नागपूर विद्यापीठामधून भूशास्त्रामध्ये बी.एस्‌‍सी (१९५८) आणि एम.एस्‌‍सी (१९६०) या पदव्या मिळवल्या होत्या.. त्यावेळी त्यांना जे.पी. त्रिवेदी सुवर्णपदक आणि पुढील शिक्षणासाठी किंग एडवर्ड मेमोरियल स्कॉलरशिप मिळाली होती. बनारस हिंदू विद्यापीठातून भूशास्त्रामध्ये पीएच्‌‍डी झाल्यावर त्यांना १९६६-६७ या काळासाठी अमेरिकेतील शिक्षणासाठी फुलब्राइट स्कॉलरशिप मिळाली. बनारस हिंदू विद्यापीठ आणि तत्कालीन पुणे विद्यापीठात भूशास्त्राचे प्राध्यापक (१९७७-८६) म्हणून काम केल्यानंतर १९८६ साली ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले. नवी दिल्लीच्या असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे (एआययू) सरचिटणीस म्हणून त्यांनी दीर्घकाळ (१९९३-२००२) काम पाहिले होते. २००२ मध्ये या पदावरून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी २००४ सालपर्यंत उच्चशिक्षणाशी निगडीत अशा विविध संघटनांसाठी आणि संस्थांसाठी सल्लागार म्हणून मोलाची भूमिका बजावली होती. के.बी. पवार हे आकुर्डीच्या डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती म्हणूनसुद्धा काम पाहात होते.

संशोधन[संपादन]

डॉ. के.बी. पोवार यांचे ६७शोधनिवंध प्रसिद्ध झाले आहे; त्यांनी ६ पुस्तके लिहिली आहेताणि उच्च शिक्षणासंबंधीचे १८ खंड संपादित केले आहेत.

डॉ. के.बी पोवार यांनी लिहिलेली इंग्रजी पुस्तके[संपादन]

  • Accreditation in Higher Education : The Indian Perspective (१९९६)
  • Indian Higher Education : A Conglomerate of Concepts, Facts and Practices (२००२)
  • Internationalisation of Higher Education : Focus on India (२००३)
  • Performance Indicators in Distance Higher Education (२०००).
  • Quality of Higher Education (२००५)