Jump to content

केशरी मार्गिका (नागपूर मेट्रो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केशरी मार्गिका (नागपूर मेट्रो)
Overview
सद्य स्थिती सक्रिय

केशरी मार्गिका (उत्तर-दक्षिण) ही भारताच्या नागपुरातील नागपूर मेट्रोची या जलद परिवहन प्रणाली मधील एक मार्गिका आहे. यात ऑटोमोटिव्ह चौक ते मेट्रो सिटी अशी एकूण २० मेट्रो स्थानके आहेत आणि या मार्गिकेची एकूण लांबी २२.२९३ किमी आहे. बहुतेक ठिकाणी ही मार्गिका उन्नत आहे.

या मार्गिकेचा उगम कामठी मार्गावरील ऑटोमोटिव्ह चौक येथून झाला आहे; पुढे ही मार्गिका कामठी मार्गावरून अमरावती मार्ग आणि वर्धा मार्गाच्या छेदनबिंदूवर पोचते, त्यानंतर मुंजे चौकाकडे गोवारी उड्डाणपूल ओलांडून धंतोलीकडे व नाग नदीच्या बाजूने डॉ. मुंजे मार्गाकडून, पुढे काँग्रेस नगर टी-पॉईंटकडे जाते. इथून ही मार्गिका रहाटे कॉलनी मार्ग व नंतर वर्धा रोडवरून नीरीकडे जाते, नंतर वर्धा रोड व मिहान भागात रेल्वे ट्रॅकच्या पश्चिमेस जाते. आणि प्रस्तावित कंटेनर डेपो जवळच्या रेल्वे हद्दीच्या रस्ता आणि चौदामीच्या दरम्यान १४ मीटर रूंदीच्या प्रदेशातून जातो.

ही मार्गिका (एकूण २२.२९३८ किमी) दक्षिणेकडील ४.६ किमी (विमानतळापासून खापरी पर्यंत) वगळता संपूर्णपणे उन्नत आहे. या मार्गिकेवर २० स्थानके असून त्यापैकी १५ स्थानके उन्नत व ५ स्थानके भूपातळीवर आहेत. सीताबर्डी स्थानक हे एक अदलाबदल स्थानक आहे. सरासरी अंतर-स्थानक अंतर १.२ किमी आहे आणि आवश्यकतेनुसार किमान ०.५४ किमी ते २.४ किमी आहे.

ही मार्गिका सीताबर्डी ते खापरी दरम्यान ७ मार्च २०१९ पासून अंशतः सुरू झाली आहे.[][][]

स्थानकांची यादी

[संपादन]

या मार्गावरील स्थानकांची यादी खालीलप्रमाणे आहे-

केशरी मार्गिका
# स्थानकाचे नाव सद्यस्थिती / उदघाटन तारीख लांबी माप (मीटर) मागील स्थानकापासून अंतर अदलाबदल मांडणी
ऑटोमोटिव्ह चौक निर्माणाधीन ०.० ०.० नाही उन्नत
नारी रोड निर्माणाधीन ९७५.८ ९७५.८ नाही उन्नत
इंदोरा चौक निर्माणाधीन २१३९.७ ११६३.९ नाही उन्नत
कडबी चौक निर्माणाधीन ३१८१.२ १०४१.५ नाही उन्नत
गड्डीगोदाम चौक निर्माणाधीन ४३९९.० १२१७.८ नाही उन्नत
कस्तुरचंद पार्क २० ऑगस्ट २०२१ ५१४८.६ ७४९.६ नाही उन्नत
शून्य मैल २० ऑगस्ट २०२१ ६१७५.५ १०२६.९ नाही उन्नत
सीताबर्डी ७ मार्च २०१९ ६७०९.२ ५३३.७  अ‍ॅक्वा मार्गिका  उन्नत
काँग्रेस नगर ७ मार्च २०१९ ७८९७.२ ११८८.० नाही उन्नत
१० राहाटे कॉलनी ७ मार्च २०१९ ८६८२.६ ७८५.४ नाही उन्नत
११ अजनी चौक ७ मार्च २०१९ १०१०४.७ १४२२.१ नाही उन्नत
१२ छत्रपती चौक ७ मार्च २०१९ १११४६.३ १०४१.६ नाही उन्नत
१३ जयप्रकाश नगर ७ मार्च २०१९ ११८११.५ ६६५.२ नाही उन्नत
१४ उज्जवल नगर ७ मार्च २०१९ १२८४६.६ १०३५.१ नाही उन्नत
१५ विमानतळ ७ मार्च २०१९ १३७८४.९ ९३८.३ नाही उन्नत
१६ दक्षिण विमानतळ ७ मार्च २०१९ - - नाही उन्नत
१७ नवीन विमानतळ ७ मार्च २०१९ १६१८४.४ २३९९.५ नाही उन्नत
१८ खापरी ७ मार्च २०१९ १८४६०.६२ २२७६.२ नाही उन्नत
१९ इको पार्क निर्माणाधीन - - नाही उन्नत
२० मेट्रो सिटी निर्माणाधीन - - नाही उन्नत

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Nagpur Metro Flagged Off by PM Narendra Modi, To Be Open For Public From March 8". Latestly. 7 March 2019. 7 March 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Nagpur Metro giving infra projects a good name". 5 August 2019. 21 December 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "Nagpur Metro Launch Today, To Be Open For Public From March 8: Routes, Stations And All You Need To Know | 📝 LatestLY". LatestLY. 7 March 2019. 21 December 2019 रोजी पाहिले.