केदार कृष्णाजी लेले
केदार लेले | |
---|---|
जन्म नाव | केदार कृष्णाजी लेले |
जन्म |
डिसेंबर २०, १९७३ डोंबिवली, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | ब्रिटिश |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | ललित, क्रीडाविषयक |
प्रसिद्ध साहित्यकृती | विम्बल्डनच्या हिरवळीवरून |
वडील | कृष्णाजी नरहर लेले |
केदार कृष्णाजी लेले (डिसेंबर २०, १९७३ - ) हे एक मराठी लेखक आहेत. त्यांचा जन्म मुंबईतील उपनगर डोंबिवली येथे एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. त्यांचे वडील कृष्णाजी नरहर लेले हे व्यवसायाने इंजिनियर (क्रेन इन्स्पेक्टर) होते.
त्यांनी डोंबिवलीतील साऊथ इंडियन असोसिएशन इंग्रजी माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी उल्हासनगरच्या चांदीबाई हिम्मतमल मनसुखानी कॉलेजमधून भौतिकशास्त्रातील पदवी मिळवली. त्यानंतर सन १९९५-१९९७ मध्ये पुण्यातील वाडिया आणि डी.एस. आर.एफ काॅलेज मधून कॉम्प्युटर मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांचे शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे तरी त्यांच्या लेखांत इंग्लिश शब्द नगण्य असतात.
'ऐतिहासिक लॉर्डसची द्विशताब्दी', 'स्वित्झर्लंडमधील गोथार्ड बेस रेल्वे बोगदा’, ‘मुंबईशी बॉलीवूडचे अतूट नाते कायम’, ‘गुजारीश आणि जागतिक चित्रपट’ तसेच स्मिता पाटील वर लिहिलेला ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या...’ हे त्यांचे काही गाजलेले लेख. तसेच ‘आकाशभरारी’ आणि ‘विम्बल्डनच्या हिरवळीवरून ...!’ हे त्यांचे गाजलेले स्तंभलेख.
क्रीडा निपुण समीक्षक ह्या नात्याने टेनिसच्या पंढरीवर म्हणजेच विम्बल्डनवर त्यांनी लिहिलेल्या “विम्बल्डनच्या हिरवळीवरून ...!” या लेखमालेचे पुस्तकामध्ये रूपांतरण म्हणजे क्रीडा साहित्यात मोलाचे योगदान.
प्रकाशित साहित्य
[संपादन]नाव | साहित्यप्रकार | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
---|---|---|---|
विम्बल्डनच्या हिरवळीवरून | क्रीडाविषयक | ईश्वरी प्रकाशन | २०१३ |
बाह्य दुवे
[संपादन]- स्वित्झर्लंडमधील गोथार्ड बेस रेल्वे बोगदा Archived 2016-03-04 at the Wayback Machine.
- मुंबईशी बॉलीवूडचे अतूट नाते कायम Archived 2016-03-06 at the Wayback Machine.
- गुजारिश आणि जागतिक चित्रपट[permanent dead link]
- सुन्या सुन्या मैफलीत माझ्या: स्मिता पाटील Archived 2016-03-13 at the Wayback Machine.
- ... आणि कमळ उमलले! : लोकसभा २०१४ च्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षास स्पष्ट बहुमत प्राप्त
- लॉर्डसवरील भारतीय शतकवीर![permanent dead link]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |