केडीई (लिनक्स)
Jump to navigation
Jump to search
![]() | |
ध्येय | स्वातंत्र्य अनुभवा! (Experience Freedom!) |
---|---|
स्थापना | १४ ऑक्टोबर १९९६ |
संस्थापक | मथायस ईट्रिच |
संकेतस्थळ | http://www.kde.org |
केडीई (पूर्ण इंग्रजी नावः के डेस्कटॉप एन्व्हायरनमेन्ट, K Desktop Environment) ही एक मुक्त-स्रोत डेस्कटॉप एन्व्हायरनमेन्ट बनवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ही संघटना लिनक्स, फ्रीबीएसडी, विंडोज्, सोलॅरिस आणि मॅक ओएस एक्स इ. संचालन प्रणालींसाठी एकीकृत अॅप्लिकेशन संच बनवते.
आवृत्ती इतिहास[संपादन]
अल्ट=|इवलेसे|केडीई 5.७ प्लाझ्मा डेस्कटॉप मथायस ईट्रिचने (Matthias Ettrich) केडीईसाठी ट्रोलटेकच्या क्यूट (Qt) आराखड्याची निवड केली.[१] इतर प्रोग्रॅमरसुद्धा केडीई आणि क्यूट अॅप्लिकेशनवर मेहनत करू लागले, आणि इ.स.१९९७ पासून अॅप्लिकेशने प्रकाशित होण्यास सुरुवात झाली. १२ जुलै १९९८ ला "केडीई १.०" नावाने डेस्कटॉप एन्व्हायरनमेन्टची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. सध्या केडीईचे सर्वांत नवीन सॉफ्टवेअर संकलन "केडीई ४" हे आहे.
आवृत्ती | तारीख | माहिती |
---|---|---|
१४ ऑक्टोबर १९९६ | केडीईची घोषणा | |
१.० | १२ जुलै १९९८ | |
२.० | २३ ऑक्टोबर २००० | |
३.० | ३ एप्रिल २००२ | |
४.० | ११ जानेवारी २००८ |
संदर्भ[संपादन]
- ^ "history of the KDE project". 2010-12-02 रोजी पाहिले.
बाह्य दुवे[संपादन]
- The KDE website
- KDE.News, news announcements