लीनस तोरवाल्ड्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लीनस तोरवाल्ड्स
LinuxCon Europe Linus Torvalds 03.jpg
जन्म डिसेंबर २८, १९६९
हेलसिंकी, फिनलंड
राष्ट्रीयत्व फिनिश
शिक्षण एम.एस., संगणकशास्त्र
पेशा संगणक
प्रसिद्ध कामे लिनक्स
जोडीदार तोव तोरवाल्ड्स
वडील निल्स तोरवाल्ड्स
आई आना तोरवाल्ड्स
पुरस्कार ताकेदा पुरस्कार, जपान

लीनस बेनेडिक्ट तोरवाल्ड्स (फिनिश: Linus Benedict Torvalds; Sv-Linus_Torvalds2.ogg उच्चार ) (डिसेंबर २८, इ.स. १९६९ : हेलसिंकी, फिनलंड - हयात) हे लिनक्स गाभ्याचा मूळ विकसक म्हणून ख्यातनाम झालेले संगणक अभियंते आहेत. लिनक्स गाभ्याच्या विकासासाठीच्या वाटचालीची धोरणात्मक दिशा ठरवण्यामध्ये आजही त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो.

तोरवाल्ड्स यांना ॲन्ड्‌ऱ्यू टॅननबॉम यांनी विकसित केलेल्या मिनिक्स संगणकप्रणालीपासून प्रेरणा मिळाली. युनिक्ससारखी पण व्यक्तिगत संगणकावर चालणारी संगणकप्रणाली तयार करण्याचा प्रयत्‍न त्यांनी आरंभला. त्या प्रयत्‍नांतून साकारलेली लिनक्स प्रणाली विविध संगणकांवर चालू शकते.