कुर्दिस्तान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुर्दिस्तान
Flag of Kurdistan.png
कुर्दिस्तानचा ध्वज
Kurdish-inhabited area by CIA (1992).jpg
कुर्दी लोकांचे वास्तव्य असलेला भूभाग
भाषा कुर्दी, तुर्की, अरबीफारसी
स्थान पश्चिम आशिया: उत्तर मेसोपोटेमिया, झाग्रोस, आग्नेय अनातोलिया, वायव्य इराण, उत्तर इराक, ईशान्य सिरिया व आग्नेय तुर्कस्तानचे काही भाग[१]
क्षेत्रफळ (अंदाजे) १.९ लाख–३.९ लाख किमी²
लोकसंख्या ३.५ ते ४ कोटी (कुर्दी वस्ती) (अंदाजे)[२]

कुर्दिस्तान हा मध्य पूर्वेमधील एक ढोबळ व्याख्या असलेला भौगोलिक प्रदेश आहे जेथे कुर्दी वंशाचे लोक मोठ्या संख्येने वसले आहेत. तुर्कस्तानचा आग्नेय भाग, इराकचा उत्तर भाग, सिरियाचा ईशान्य भाग व इराणचा वायव्य भाग कुर्दिस्तानमध्ये गणला जातो. कुर्दी लोकांमध्ये स्वतंत्र राष्टीयत्वाची प्रबळ भावना असून स्वतंत्र कुर्दी राष्ट्रासाठी किंवा स्वायत्ततेसाठी येथे सतत संघर्ष सुरू आहे. आजच्या घडीला इराक देशामधील कुर्दिस्तानी भागाला स्वायत्तता आहे. इराण देशामध्ये देखील कुर्दिस्तान प्रांत आहे परंतु तो स्वायत्त नाही.

आर्बिलसुलेमानिया ही उत्तर इराकमधील दोन मोठी शहर कुर्दिस्तानचा भाग आहेत.

संदर्भ[संपादन]