Jump to content

चर्चा:कुणकेश्वर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख काढून टाकावा.

कुणकेश्वर हे भारतातील महाराष्ट्राच्या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेले एक देऊळ आहे....ही माहिती अत्यंत अपुरी आहे.

कणकेची राई म्हणजे कसली राई? कणक, कणका, कुणक किंवा कुणका या नावाचा एखादा वृक्ष असेल त्याला सामान्य मराठीत, इंग्रजीत किंवा हिंदी-संस्कृतात काय म्हणतात? त्याचे लॅटिन नाव काय? ही माहिती देणे शक्य नसेल तर, आणि इतिहास तर अगदीच अविश्वसनीय आहे हे मान्य असेल तर लेखात काहीच शिल्लक उरत नाही, तेव्हा हा लेख काढून टाकावा....J (चर्चा) २३:३५, १३ डिसेंबर २०१२ (IST)[reply]

श्री क्षेत्र कुणकेश्वर येथून हलवलेला मजकूर

[संपादन]

कोकणात श्रद्धास्थानाची कमी नाही. गणपतीपुळे, पावस, पाली यासारख्या देवळांबरोबरच देवगड जवळील दक्षिणकाशी समजले जाणारे श्रीक्षेत्र कुणकेश्वर हे देखिल प्रसिद्ध मंदिर आहे.

देवगडच्या दक्षिणेस २० कि.मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आणि किनाऱ्यावरील या मंदिराचे स्थान यामुळे या मंदिराच्या देखणेपणात भर पडली आहे. हे मंदिर अकराव्या शतकात बांधले गेले असावे, असे स्थानिक लोक सांगतात. या मंदिराचे संपूर्ण काम अत्यंत कलात्मक असे आहे. अनेक वर्षे भाविक श्रद्धेने या मंदिराला भेट देत असतात.

या मंदिराविषयी एक दंतकथा सांगितली जाते. कोणे एके काळी एक अरबी व्यापारी आपले गलबत घेऊन कोकण किनाऱ्यावरुन जात होता. सारे काही सुरळीत आहे असे वाटत असतानाच अकस्मात मोठे वादळ सुरु झाले. पाहता पाहता काही दिसेनासे झाले. या वादळात त्याचे गलबत कोठे भरकटले ते समजण्यास काहीच मार्ग नव्हता. या भरकटलेल्या जहाजाला थांबविण्यासाठी कोठे किनारा दिसतो का याचा तो व्यापारी शोध घेवू लागला. याच वेळी त्या प्रचंड वादळात त्याला लांबवर एक लुकलुकणारा दिवा दिसला. त्या दिव्याच्या दिशेने त्याने आपले गलबत महत्प्रयासाने हाकारले. घोंघावणाऱ्या वादळातही न विझता त्या व्यापाऱ्याला सुखरूप किनाऱ्यावर आणणारा तो दिवा म्हणजे शंकराच्या छोट्याशा मंदिरातील पणती होती. यामुळे कृतज्ञतेपोटी त्या व्यापाऱ्याने यानंतर या ठिकाणी मंदिराची उभारणी केली. मंदिराच्या बाजुलाच एक कबरही आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा हा एक आदर्श नमुना आहे.

कुणकेश्वराचे मंदिर कोकणात दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. येथील शंकराची पिंड भव्यदिव्य असून ती निसर्गनिर्मित आहे, असे सांगितले जाते. श्रावणात दूरवरुन भाविक येथे दर्शनासाठी येतात.