Jump to content

किशोरी शहाणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(किशोरी शहाणे-विज या पानावरून पुनर्निर्देशित)
किशोरी शहाणे
जन्म किशोरी शहाणे-विज
२३ एप्रिल, १९६८ (1968-04-23) (वय: ५७)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख दूरचित्रवाणी कार्यक्रम जाडूबाई जोरात
पती
दीपक बलराज वीज (ल. १९९१)
अपत्ये बॉबी वीज

किशोरी शहाणे-विज (२३ एप्रिल, १९६८:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) या शास्त्रीय आणि लोकनृत्य नृत्यांगना, चित्रपट अभिनेत्री आणि चित्रपट निर्मात्या आहेत. त्यांनी मराठी व हिंदी चित्रपटांतून तसेच दूरचित्रवाणी मालिकांमध्ये भूमिका केलेल्या आहेत.

कारकीर्द

[संपादन]

नववीत असताना त्यांना दुर्गा झाली गौरी या नृत्य नाटिकेत काम करण्याची संधी मिळाली. अकरावीत असताना लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या समवेत भूमिका असलेल्या प्रेम करूया खुल्लम खुल्ला या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. पदवीधर होईपर्यंत त्यांनी सुमारे वीस चित्रपटात भूमिका केल्या होत्या.

मिठीबाई महाविद्यालय, मुंबई येथे शिकत असताना किशोरी शहाणे यांची ‘मिस मिठीबाई’ म्हणून निवड झाली होती. ‘माहेरची साडी’ आणि ‘वाजवा रे वाजवा’ या मराठी चित्रपटातील भूमिकांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. मोरूची मावशी या मराठी नाटकातील आणि आधे अधुरे या हिंदी नाटकातील भूमिकांमुळे त्यांची नाट्य अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण झाली. ‘एक डाव धोबी पछाड’ आणि ‘नवरा माझा नवसाचा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. ‘प्यार मे ट्विस्ट’ या हृदय शेट्टी दिग्दर्शित, ‘रेड:द डार्क साईड’ या विक्रम भट दिग्दर्शित हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत.

दीपक बलराज वीज या हिंदी चित्रपट निर्मात्याच्या हप्ता बंद, बॉम्ब ब्लास्ट या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. हप्ता बंद या १९९१ सालच्या चित्रपटाच्या दरम्यान त्यांची दीपक वीज यांच्याशी जवळीक निर्माण होऊन त्यांचा विवाह झाला.[] त्यानंतर त्यांनी हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्याबरोबरच हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करणे सुरूच ठेवले. ‘घर एक मंदिर’, ‘ जस्सी जैसी कोई नही’, आणि ‘सिंदूर’ या हिंदी  मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्या शास्त्रीय आणि लोकनृत्य नृत्यांगना असून त्यांनी भारतात तसेच परदेशात नृत्याचे कार्यक्रम सादर केले आहेत.

मिसेस ग्लॅड रॅग्ज सौंदर्य स्पर्धेत २००३ साली त्या उपविजेत्या ठरल्या. चित्रपट निर्माती, दिग्दर्शिका म्हणून त्यांनी बनवलेल्या  ‘मोहटयाची रेणुका’ या चित्रपटाला महाराष्ट्र सरकराचा सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार २००७ मध्ये मिळाला. त्यांचा पुढच्या ‘मालिक एक’ या साईबाबांच्या जीवनावरील चित्रपटात जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकेत होते.

‘ऐका दाजिबा’ या मराठी चित्रपटाची निर्मितीसुद्धा त्यांनी केली. सध्या त्या ‘शक्ती अस्तित्त्व के एहसास की’ या कलर्स वाहिनीवरील मालिकेत त्या भूमिका करत आहेत.

२०१९ साली कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी’ रिॲलिटी शोमधील सहभागामुळे त्या पुन्हा प्रकाशझोतात आल्या.[]

चित्रपट

[संपादन]
वर्षचित्रपटभूमिकासह-कलाकारभाषा
१९८६कर्माहीनानसीरुद्दीन शाह, जॅकी श्रॉफहिंदी
१९८७प्रेम करूया खुल्लम खुल्लासीमाअशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डेमराठी
१९८७आनंदी आनंदशमाप्रशांत दामले
१९८८माझा पती करोडपतीहेमा देशमुखसचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर
१९८९सगळीकडे बोंबाबोंबमाला धरधरणेअशोक सराफ, वर्षा उसगावकर
१९८९नस्ती आफतमोनानितीश भारद्वाज
१९८९बाळाचे बाप ब्रह्मचारीशामला तवदानेलक्ष्मीकांत बेर्डे
१९८९आत्मविश्वासआसावरी मंगळकरसचिन पिळगावकर
१९९०चंगू मंगूमिनी खटलेअशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे
१९९०धुमाकूळललिता प्रधानलक्ष्मीकांत बेर्डे
१९९१आयत्या घरात घरोबाशोभना कस्तुरेसचिन पिळगावकर, अशोक सराफ
१९९१हप्ता बंदहरीशची पत्नीजॅकी श्रॉफहिंदी
१९९१प्यार का देवतासुजाता कुमारमिथुन चक्रवर्ती
१९९१माहेरची साडीविकीची मैत्रीणअलका कुबल, अजिंक्य देवमराठी
१९९१बंडल बाजअंजूप्रशांत दामले
१९९१जीवा सखाज्युलीलक्ष्मीकांत बेर्डे, अजिंक्य देव
१९९२गृहप्रवेशरिटा फर्नांडिसअजिंक्य देव
१९९२किंचाळीवीणा आनंदसुनील बर्वे
१९९३ऐकावे ते नवलंचरागिणीअशोक सराफ
१९९३वाजवा रे वाजवामेघाअजिंक्य देव
१९९३राम रहीमकिशोरी सारेलक्ष्मीकांत बेर्डे
१९९३बॉम्ब ब्लास्टनैनाआदित्य पांचोलीहिंदी
२००१शिर्डी साई बाबा(निर्माती व दिग्दर्शिका) 
२००४नवरा माझा नवसाचालावणी नर्तिकासचिन पिळगावकरमराठी
२००५मुंबई गॉडफादरकमलासीमा विश्वासहिंदी
२००५प्यार में ट्विस्टमधू लोकऋषी कपूर, डिंपल कपाडिया
२००६शादी से पहिलेमिसेस भल्लाअक्षय खन्ना, आयशा टाकिया
२००६मोहित्यांची रेणुकारेणुका  मराठी
२००७गुड बॉय बॅड बॉयशिक्षिकाइम्रान हाशमी, तुषार कपूरहिंदी
२००७रेड: द डार्क साईड  आफताब शिवदासानी
२००७फिअर 
२००८सुपरस्टारमिसेस सक्सेनाकुणाल खेमू
२००९एक डाव धोबी पछाडहेमाअशोक सराफमराठी
२०१०ऐका दाजीबारुक्मिणीअशोक सराफ
२०१०मिलेंगे मिलेंगे  शाहिद कपूर, करीना कपूरहिंदी
२०१०बेनी अँड बबलूतेजस्विनीके के मेनन, राजपाल यादव
२०१०मालिक एकशकुंतलाजॅकी श्रॉफ
२०११शागीर्दमिसेस हनुमंत सिंहनाना पाटेकर
२०१२लंगरगोदावरी  मराठी
२०१२छोडो कल की बातेकामवाली बाईअनुपम खेरहिंदी
२०१३पोलीसगिरीसेहरची आईसंजय दत्त
२०१३येडासावित्री कुलकर्णीआशुतोष राणामराठी
२०१३एकुलती एकमधुरासचिन पिळगावकर
२०१३नारबाची वाडीरेणुका खोतदिलीप प्रभावळकर
२०१४या रबडॉ. शबानाअजाझ खानहिंदी
२०१४अनुराधामास्तरजींची पत्नीस्मृती इराणी
२०१४कहीं है मेरा प्यारप्रियाची आईअभिषेक सेठिया
२०१४नटीमहेशची पत्नीसुबोध भावे, तेजस्विनी पंडितमराठी
२०१४बदलापूर बॉईजआईनिशानहिंदी
२०१४खैरलांजीच्या माथ्यावरसुरेखामिलिंद शिंदेमराठी
२०१५धुरंधर भाटवडेकरपुष्पा दामलेभरत जाधव
२०१५क्लासमेट्सकॉलेज प्राचार्यअंकुश चौधरी
२०१६मोहेंजो दरोबिमाहृतिक रोशनहिंदी
२०१७सिमरनकुमुदकंगना राणावत
२०१७मशीनमायामुस्तफा बर्मावाला
२०१७हार्टबीट्सशारदा झिंटाअनीश छाबडा
२०१९पीएम नरेंद्र मोदीइदिरा गांधीविवेक ओबेरॉय
२०१९ब्लँकदेवानची पत्नीसनी देओल
२०२४धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराजराजमाता जिजाऊबाई भोसलेठाकूर अनुप सिंगमराठी
२०२५सिकंदरमिसेस राकेश प्रधानसलमान खानहिंदी

दूरचित्रवाणी मालिका

[संपादन]

मराठी नाटके

[संपादन]
  • मोरूची मावशी
  • दुर्गा झाली गौरी
  • भ्रमाचा भोपळा
  • मी तुझ्या पाठीशी आहे

हिंदी नाटके

[संपादन]
  • आधे अधुरे
  • बेनी अँड बबलू

संदर्भ

[संपादन]
  1. "हे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत किशोरी शहाणे यांचे पती, पहा त्यांचे फोटो". लोकमत. 2019-11-09 रोजी पाहिले.
  2. "Bigg Boss Marathi 2 : शिव ठाकरे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता". एबीपी माझा. 2019-11-09 रोजी पाहिले.