कसबे तडवळे (उस्मानाबाद)
?क.तडवळे तडवळा महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | उस्मानाबाद |
जिल्हा | उस्मानाबाद जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | मराठी |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• 413405 • एमएच/25 |
कसबे तडवळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे.
हे गाव पूर्वी सोलापूर जिल्ह्यात होते.हे पंचक्रोशीत आठवडा बाजारासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात सर्वाधिक शेत-शिवार असलेल्या गावांमध्ये कसबे तडवळे या गावाचा समावेश आहे. तडवळे गावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आणि कसबे तडवळे हे गाव शैक्षणिकदृष्ट्या उस्मानाबाद जिल्ह्यात महत्वाचे मानले जाते. तसेच गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमीदेखील आहे. येथे समर्थांचे शिष्य कल्याणस्वामी (डोमगाव) यांचे शिष्य जगन्नाथ स्वामी यांची समाधी व राममंदिर आहे. या राममंदिर ट्रस्टची अंदाजित अठराशे एकर जमीन आहे . त्याच बरोबर या गावात भैरीसाहेबाची समाधी असून, दर्गाह आहे. मुस्लिम व हिंदूबांधव याला जागृतदेवस्थान मानतात. येथील मानकरी असलेल्या पाच पाटलांना या दर्ग्यात उत्सवाच्या वेळी विशेष मान असतो. गावाजवळच रेल्वे स्थानक आहे. हे स्टेशन कळंब रोड नावाने ओळखले जाते. कळंब जाणारे प्रवासी या मार्गावरून जात असत. त्यामुळे या स्टेशनला कळंब रोड म्हणून ओळखले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कसबे तडवळे येथील ज्या शाळेत दोन दिवस वास्तव्य केले होते. या गावात २२ व २३ फेब्रुवारी १९४१ रोजी एका परिषदेच्या निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दोन दिवस वास्तव्य होते. त्यामुळे दलित समाजबांधवाच्या दृष्टीने या कसबे तडवळे गावाच्या भूमीला विशेष महत्त्व आहे.[१] गावाजवळ गुळाचा व फटाक्यांचा कारखाना आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे.
[संपादन]श्री राम मंदिर
दक्षिणमुखी हनुमान मंदिर बाजारपेठ.
खंडोबा मंदिर बाजार पेठ.
अंबाबाई मंदिर रेल्वेस्टेशन रोड
काळ भैरवनाथ मंदिर
नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]धाराशिव - 25किमी
कळंब -22किमी
लातूर - 55किमी
संदर्भ
[संपादन]- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
- ^ "डॉ. आंबेडकरांचे स्मारक उभारणार". Maharashtra Times. 2022-01-12 रोजी पाहिले.