Jump to content

कपिला वात्स्यायन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Kapila Vatsyayan (es); Kapila Vatsyayan (hu); કપિલા વાત્સ્યાયન (gu); Kapila Vatsyayan (ast); Капила Ватсъяян (ru); Kapila Vatsyayan (de); Kapila Vatsyayan (sq); Կապիլա Վացյայան (hy); Kapila Vatsyayan (da); کپیلا وتسایان (ur); Kapila Vatsyayan (sv); कपिला वात्स्यायनः (sa); कपिला वात्स्यायन (hi); కపిల వాత్స్యాయన్ (te); ਕਪਿਲਾ ਵਾਤਸਯਾਨ (pa); কপিলা বাৎসায়ন (as); Kapila Vatsyayan (cs); கபிலா வாத்ஸ்யாயன் (ta); Kapila Vatsyayan (it); কপিলা বাতস্যায়ন (bn); Kapila Vatsyayan (fr); Kapila Vatsyayan (yo); କପିଳ ବାତ୍ସାୟନ (or); Kapila Vatsyayan (sl); Kapila Vatsyayan (id); Kapila Vatsyayan (nn); Kapila Vatsyayan (nb); Kapila Vatsyayan (nl); കപില വത്സ്യായൻ (ml); Kapila Vatsyayan (ga); Kapila Vatsyayan (en); Kapila Vatsyayan (ca); कपिला वात्स्यायन (mr); كاپيلا ڤاتسيايان (arz) politica e storica dell'arte indiana (it); política i historiadora de l'art índia (ca); indiai politikusnő, művészettörténész (hu); ભારતીય રાજકારણી અને કલા ઇતિહાસકાર (gu); भारतीय शास्त्रीय नृत्य, कला, स्थापत्य आणि कला इतिहासाच्या अभ्यासक (mr); femme politique (fr); Indian politician and art historian (1928-2020) (en); Indiaas politica (nl); Индийский политик (ru); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); indische Politikerin und Kunsthistorikerin (de); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ ଓ ଇତିହାସକାର (or); ভাৰতীয় নৃত্য শিল্পী, অধ্যাপিকা আৰু সাহিত্যিক (as); భారతీయ రాజకీయవేత్త మరియు కళ చరిత్రకారుడు (te); भारतीय राजनीतिज्ञ (hi); India siyaasa nira ŋun nyɛ paɣa (dag) कपिला वात्स्यायन (sa)
कपिला वात्स्यायन 
भारतीय शास्त्रीय नृत्य, कला, स्थापत्य आणि कला इतिहासाच्या अभ्यासक
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावकपिला वात्स्यायन
जन्म तारीखडिसेंबर २५, इ.स. १९२८
दिल्ली
मृत्यू तारीखसप्टेंबर १६, इ.स. २०२०
दिल्ली
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
पद
वैवाहिक जोडीदार
पुरस्कार
  • कलांमध्ये पद्मश्री (इ.स. १९९०)
  • पद्मविभूषण पुरस्कार (इ.स. २०११)
  • जवाहरलाल नेहरू फेलोशिप (इ.स. १९७५)
  • संगीत नाटक अकादमी फेलोशिप
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

कपिला वात्स्यायन (२५ डिसेंबर १९२८ - १६ सप्टेंबर २०२०) एक भारतीय शास्त्रीय नृत्य, कला, स्थापत्य आणि कला इतिहासाच्या अग्रगण्य अभ्यासक होत्या. त्यांनी भारतातील संसद सदस्य म्हणून आणि इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्सचे संस्थापक संचालक म्हणूनही काम केले.

१९७० मध्ये, वात्स्यायन यांना संगीत नाटक अकादमी फेलोशिप मिळाली, जो संगीत, नृत्य आणि नाटक यातील संगीत नाटक अकादमीद्वारे प्रदान केलेला सर्वोच्च सन्मान आहे. यानंतर १९९५ मध्ये त्यांना ललित कला अकादमी फेलोशिप प्रदान करण्यात आली. २०११ मध्ये, भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान बहाल केला.

जीवन

[संपादन]

वात्स्यायन यांचा जन्म दिल्लीत राम लाल आणि सत्यवती मलिक यांच्या पोटी झाला.[] त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एमए मिळवले.[] त्यानंतर, मिशिगन विद्यापीठ येथे शिक्षणात दुसरे एमए आणि बनारस हिंदू विद्यापीठात पीएचडी पूर्ण केली.

कवी आणि कला समीक्षक केशव मलिक हे त्यांचे मोठे भाऊ होते. १९५६ मध्ये त्यांचा विवाह प्रसिद्ध हिंदी लेखक सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन 'अज्ञेय' यांच्याशी झाला. पण १९६९ मध्ये ते वेगळे झाले.

कारकीर्द

[संपादन]

वात्स्यायन यांनी मातृलक्षणम (१९८८), भारत: द नाट्य शास्त्र (१९९६), आणि द स्क्वेअर अँड द सर्कल ऑफ इंडियन आर्ट्स (१९९७), यासह अनेक पुस्तके लिहिली.[]

१९८७ मध्ये, त्या दिल्लीतील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्सच्या संस्थापक विश्वस्त आणि सदस्य सचिव बनल्या.[][] त्यानंतर, १९९३ मध्ये त्यांना शैक्षणिक संचालक बनवण्यात आले, जे पद त्यांनी २००० पर्यंत सांभाळले.[]

त्यांनी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयात सचिव म्हणूनही काम केले आहे, जिथे त्या मोठ्या संख्येने उच्च शिक्षणाच्या राष्ट्रीय संस्थांच्या स्थापनेसाठी जबाबदार होत्या.[] त्या इंडिया इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे एशिया प्रकल्पाच्या अध्यक्षा होत्या.[]

२००६ मध्ये त्यांना राज्यसभेच्या सदस्य म्हणून नामांकित करण्यात आले होते. परंतु त्यानंतर मार्च २००६ मध्ये, त्यांनी त्यांचे नफ्याच्या कार्यालय (इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स) न सोडता राज्यसभेतून राजीनामा दिला.[] एप्रिल २००७ मध्ये, त्यांना राज्यसभेवर नामांकन देण्यात आले होते, ज्याची मुदत फेब्रुवारी २०१२ मध्ये संपुष्टात आली.[]

कपिला वात्स्यायन यांचे १६ सप्टेंबर २०२० रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी नवी दिल्ली येथे त्यांच्या घरी निधन झाले.[][१०]

पुरस्कार

[संपादन]

वात्स्यायन यांना १९७० मध्ये संगीत नाटक अकादमी फेलोशिप मिळाली.[११] त्याच वर्षी त्यांना युनायटेड स्टेट्स आणि इंडोनेशियामधील सांस्कृतिक संस्था आणि समकालीन कला घडामोडींचे सर्वेक्षण करण्यासाठी जॉन डी. रॉकफेलर तिसरा फंडाकडून फेलोशिप देण्यात आली. १९७५ मध्ये त्यांना प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू फेलोशिप प्रदान करण्यात आली होती.[१२]

१९९२ मध्ये आशियाई सांस्कृतिक परिषदेने त्यांना उत्कृष्ट व्यावसायिक कामगिरी आणि भारतातील नृत्य आणि कला इतिहासाची आंतरराष्ट्रीय समज, सराव आणि अभ्यास यासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल जॉन डी. रॉकफेलर तिसरा पुरस्कार देऊन सन्मानित केले.[१३] २००० मध्ये, त्या राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार प्राप्तकर्ता होत्या[१४] आणि २०११ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषणने सन्मानित केले.[१५]

संदर्भग्रंथ

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Members Biodata". Rajya Sabha. 8 July 2013 रोजी पाहिले.
  2. ^ Uttara Asha Coorlawala (12 January 2000). "Kapila Vatsyayan – Formative Influences". narthaki. 8 July 2013 रोजी पाहिले.
  3. ^ a b Bouton, Marshall & Oldenburg, Philip, Eds. (2003). India Briefing: A Transformative Fifty Years, p. 312. Delhi: Aakar Publications.
  4. ^ "About IGNCA". IGNCA. 6 January 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 July 2013 रोजी पाहिले.
  5. ^ "Kapila Vatsyayan: Polymath of the arts". Frontline (इंग्रजी भाषेत). 2020-09-22. 2023-08-08 रोजी पाहिले.
  6. ^ a b "Congress appoints Kapila Vatsyayan as IGNCA chairperson, completes tit-for-tat with NDA". India Today. 31 October 2005. 8 July 2013 रोजी पाहिले.
  7. ^ "Vatsyayan resigns from RS". Rediff.com India News. 24 March 2006. 8 July 2013 रोजी पाहिले.
  8. ^ "Swaminathan, Vatsyayan nominated to Rajya Sabha". द हिंदू. 11 April 2007. 1 October 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 July 2013 रोजी पाहिले.
  9. ^ "'A huge void in the art and culture world': Indians mourn the death of Kapila Vatsyayan". 16 September 2020.
  10. ^ "Kapila Vatsyayan, grand matriarch of cultural research, passes away". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 2020-09-16. ISSN 0971-751X. 2023-08-08 रोजी पाहिले.
  11. ^ "SNA: List of Sangeet Natak Akademi Ratna Puraskar winners (Akademi Fellows)". Official website. 4 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  12. ^ "Official list of Jawaharlal Nehru Fellows (1969-present)". Jawaharlal Nehru Memorial Fund.
  13. ^ "ACC: List of John D. Rockefeller 3rd Awardees". Official website. 26 July 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  14. ^ "Secularism under assault, says Sonia". द हिंदू. 21 August 2001. 10 November 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  15. ^ "Padma Awards Announced" (Press release). Ministry of Home Affairs. 25 January 2011. 25 January 2011 रोजी पाहिले.