कन्हेरसर
कन्हेरसर (५५५८१५) हे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील गाव आहे
भोगोलिक स्थान आणि लोकसंख्या
[संपादन]कन्हेरसर हे १६०४ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ७६५ कुटुंबे असून एकूण लोकसंख्या ३५५८ आहे. गावाच्या सर्वात जवळचे शहर राजगुरुनगर १७ किलोमीटर अंतरावर आहे. कन्हेरसर गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५५८१५ [१] आहे.
साक्षरता
[संपादन]- एकूण साक्षर लोकसंख्या: २४०९ (६७.७१%)
- साक्षर पुरुष लोकसंख्या: १४१५ (७६.४५%)
- साक्षर स्त्री लोकसंख्या: ९९४ (५८.२३%)
शैक्षणिक सुविधा
[संपादन]गावात ७ शासकीय पूर्व-प्राथमिक (अंगणवाडी) शाळा आहेत.
गावात जिल्हा परिषदेच्या ५ प्राथमिक शाळा आहेत.
अंबिका विद्यालय ही गावातील एकमेव सरकारी माध्यमिक शाळा आहे.
पाबळ येथील श्री भैरवनाथ विद्या मंदिर ही सर्वात जवळची उच्च माध्यमिक व अपंगांसाठी खास मतिमंद शाळा कन्हेरसरहून ५ किलोमीटर अंतरावर आहे.
पाबळचे श्री पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालय आणि राजगुरुनगरचे हुतात्मा राजगुरू महाविद्यालय ही सरfवात जवळची काॅलेजे कन्हेरसरपासून अनुक्रमे ५ आणि १७ किलोमीटर अंतरावर आहेत.
गावाला सर्वात जवळची व्यवस्थापन संस्था पुणे येथे ४० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
गावाला सर्वात जवळची व्यावसायिक प्रशिक्षण शाळा चांडोली येथे १७ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
वैद्यकीय सुविधा (शासकीय)
[संपादन]गावात एक प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे.
सर्वात जवळचे पशुवैद्यकीय रुग्णालय गावापासून ३ते४ किलोमीटर अंतरावर आहे.
धार्मिक स्थळे
[संपादन]गावात एकूण ५ मंदिरे आहेत- यमाई माता मंदिर, राम मंदिर, विठ्ठल -रुक्मिणी, मारुती मंदिर, गणपती मंदिर.
श्री यमाई देवस्थान, कन्हेरसर
[संपादन]हि कथा आहे १२०० शतकातील श्री. ज्ञानेश्वर महाराज यांच्या सानिध्यानाने पावन झालेले, केंदूर, शिरूर येथील श्री. संत कान्हूराज महाराज यांच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या रेणुका देवीची. समाधी अवस्थेमधे तल्लीन असताना रेणुका देवीने दर्शन दिले व वर दिला. कान्हूराज महाराज यांनी तुझे दर्शन मला सर्व सदाकाळ व्हावे ही इच्छा व्यक्त केली.हे ऐकून देवीने प्रसन्न चित्ताने तथास्तु म्हणाली परंतु असे सांगितले कि मी प्रकट रूपाने येणार नाही तर गुप्त रूपाने येईन आणि एक अट घालती.मी फक्त तुलाच दिसेल आणि तुझ्या पाठोपाठ येईन पण तू मात्र माझ्या वचनावर विश्वास ठेवून तू प्रवास कर निष्कारण शंका येऊन मागे वळून पाहू नकोस, जर तू मागे वळून पाहिलंस तर मी जेथे असेल त्याच स्थळी वास करून राहील, पुढे येणार नाही. पुढील प्रवास सुरू झाला, पुढे कान्हूराज महाराज व मागे रेणुका देवी चालू लागली, देवीच्या पायातील नुपूरांचा व पैंजणांचा आवाज येत होता आणि अचानक तो आवाज बंद झाला.या क्षणी कान्हूराज महाराज यांनी मागे वळून पहिले असता त्याच क्षणी देवी कन्हेरसर गावच्या ओढ्याच्या काठावर गुप्त झाली त्या वेळीस कान्हूराज महाराज यांनी देवीची स्तुती सुरू केली, देवी तत्काळ प्रकट झाली त्यावेळी कान्हूराज महाराज यांनी देवीला त्यांच्या गावी येण्यास विनंती, देवीला ये माई ये माई अशी विनवणी केली, याच मुळे ह्या देवीला इथे यमाई असे नाव पडले.
परंतु देवीने घातलेल्या अटी प्रमाणे देवी म्हणाली, मी आता याच ठिकाणी वास करून राहील ओढ्याच्या उत्तरेला घनदाट बन आहे तिथे मी निरंतन वास करेन. या ठिकाणी मी भक्तांकडून सेवा करून घेईन व ज्याचे त्याचे भक्ती प्रमाणे मी प्रसन्न होऊन त्यांचे मनोरथ पूर्ण करेन. तुझीही सेवा ह्याच ठिकाणी मी घेईन, हे ठिकाण केंदूर पासून फार दूर नाही म्हणून तुला इथे येणे जाणे सहज जमेल आणि पूजामधे ही अंतर येणार नाही. मातेचा आदेश मानून कान्हूराज महाराज यांनी देवीची कन्हेरसर याच ठिकाणी मनोभावे, नित्य नियमाने पूजा केली. याच यमाईचे मुळपीठ साताऱ्यातील औंध क्षेत्री असून कन्हेरसर येथील यमाई देवीचे उपपीठदेखील तितकेच पूजनीय मानले जाते. अशी ही रेणुका माता, अंबाबाई, जगदंबा इथे अवतीर्ण झाली. कालांतराने या ठिकाणी मंदिर स्थापन केले गेले.
येथे सकाळ संध्याकाळ आरती होते. दर मंगळवारी आरतीने मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते. दर पौर्णिमेस देवीची पालखीतून गावात मिरवणूक निघते.या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार हा शके १८४७-४८ साली झाला.ह्या मंदिराच्या दगडी बांधकामावर असलेले तोंडात एक, शेपटी मध्ये एक व ४ पायामधे असे हत्ती पकडलेले एका प्राण्याचे चित्र आहे हेच चित्र जंजिरा, मुरुड, महाराष्ट्र किल्ल्या मध्येही आढळते.
जत्रा
[संपादन]कन्हेरसर गावी चैत्र पौर्णिमेस गावची जत्रा भरते. चैत्र शुद्ध अष्टमीला देवीची हळद दुपारनंतर लागली जाते, व जमलेल्या लोकांना उंडे वाटले जातात. या दिवशी मंदिरापुढील प्रांगणात मंडप उभारून त्यावर आंबा, उंबर, जांभूळ वगैरे झाडाचे डहाळे टाकतात. हा मंडप चैत्री पौर्णमेपर्यंत असतो.
या शिवाय पौष पौर्णिमेसही जत्रा भरते.
पिण्याचे पाणी
[संपादन]गावात झाकलेल्या विहिरीचे, हॅन्डपंपचे, बोअरवेलचे, नदीचे, कालव्याचे व झऱ्याचे पाणी उपलब्ध आहे. गावात तलाव, तळे, सरोवर आदी नाहीत. गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे; शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही.
स्वच्छता
[संपादन]गावात झाकलेली गटारव्यवस्था आहे. सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जात नाही. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृहे आहेत.
संपर्क व दळणवळण
[संपादन]गावात एक पोस्ट ऑफिस आहे. गावाचा पिन कोड ???? आहे. गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. सर्वात जवळची इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळचे खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. गावात खाजगी बस सेवा नाही. सर्वात जवळची खाजगी बस सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात ऑटोरिक्षा व टमटम आहेत. गावात माणसांची ने-आण करण्यासाठी टॅक्सी, ट्रॅक्टर आहेत. राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला नाही..सर्वात जवळचा राष्ट्रीय महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.. राज्य महामार्ग गावाला जोडलेला आहे.. जिल्ह्यातील मुख्य व दुय्यम रस्ते गावाला जोडलेले आहेत.